mpschistory | Education

Telegram-канал mpschistory - MPSC History

126972

Here u can get useful info about History for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCGeography @MPSCScience @MPSCAlerts @SpardhaGram @MPSCMaterialkatta

Subscribe to a channel

MPSC History

🔹सनावळ्या, ऐतिहासिक घटना, वर्षे व स्थळे

* १८२९ : सती बंदीचा कायदा
* १८४८ः महात्मा फुल्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली.
* १८५६ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा.
* १८५७ : मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना
* १८७६ : वासुदेव बळवंत फडके यांचा सशस्त्र उठाव
* १८८५ : राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना.
* १८९१ : विवाह संती वयाचा कायदा.
* १८९२ : कौन्सिल सुधारणा कायदा संत.
* १८९३ : महात्मा गांधी वकिलीच्या कामानिमित्त द.आफ्रिकेत
* १९०० : ङ्कमित्रमेळाङ्क ही क्रांतिकारी संघटना स्थापन.
* १९०४ : अभिनव भारतची स्थापना
* १९०५ : बंगालची फाळणी व रशिया-जपान युद्ध.
* १९०६ : राष्ट्रीय सभेच्या चतुःसूत्रीची घोषणा.
* १९०६ : मुस्लीम लीगची स्थापना.
* १९०६ : बारींद्रकुमार घोष-भूपेन्द्रनाथांचे युगांतर वृत्तपत्र.
* १९०६ : गांधीजीचा द. आफ्रिकेत अन्यायाविरुद्ध सत्याग्रह
* १९०७ : भारतीय राष्ट्रीय सभेत फूट.
* १९०८ : लो. टिळकांना सहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा.
* १९०९ : मोर्ले- िमंटो सुधारणा.
* १९०९ : नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा खून.
* १९१५ : होरूल लीगची चळवळ.
* १९१५ : गांधींजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले.
* १९१६ : लखनौ करार.
* १९१७ : भारतमंत्री माँटेग्यू यांची घोषणा.
१९१९ : माँटफर्ड कायदा.
* १९१९ : रौलट कायदा, जालियनवाला बागेतील हत्याकांड.
* १९२० : नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीस मंजुरी.
* १९२१ : ब्रिटनचे राजपुत्र भारतात आले.
* १९२२ : चौरीचौरा येथे असहकार चळवळीत िहंसा
* १९२२ः राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना.
* १९२३ : झेंडा सत्याग्रह.
* १९२४ : हदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनङ्कची स्थापना.
* १९२७ : बार्डोली सत्याग्रह
* १९२७ मार्च : महाड सत्याग्रह.
* १९२८ : qहदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
* १९२८ : सायमन कमिशनचे भारतात आगमन, नेहरू रिपोर्ट
* १९२८ : गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना.
* १९३० : पोर्तुगाल शासनाने वसाहतीचा कायदा संत केला.
* १९३० : क्रांतिकारकांचा चितगाव पोलीस शस्त्रागारावर हल्ला.
* १९३० एप्रिल ६ : दांडी येथे मिठाचा कायदा मोडला.
* १९३१ : गांधी-आयर्विन करार.
* १९३१ मार्च २९ : राष्ट्रीय सभेचे कराची अधिवेशन.
* १९३१ ऑगस्ट १५ : गांधीजी दुसèया गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी इंग्लंडला गेले.
* १९३१ : भगतqसग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी.
* १९३२ : वीणा दास ने बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.
* १९३२ : रॅम्से मॅक्डोनॉल्डकडून जातीय निवाडा घोषित
* १९३२ सप्टेंबर २० : येरवडा तुरुंगात गांधीजींचे उपोषण.
* १९३२ सप्टेंबर २५ : गांधीजी व डॉ. आंबेडकर यांच्यात पुणे करार
* १९३४ : समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना.
* १९३५ : गव्हर्नेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट मंजूर.
* १९३६ ऑगस्ट : डॉ. आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन
* १९३६ : राष्ट्रीय सभेचे फैजपूर अधिवेशन.
* १९३७ : १९३५ च्या कायद्यानुसार निवडणुका.
* १९३८ : हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना.
* १९३९ सप्टेंबर ३ : दुसèया महायुद्धाला सुरुवात.
* १९३९ नोव्हेंबर १ : काँग्रेसच्या प्रातिक सरकारांचे राजीनामे.
* १९३९ मे : सुभाषचंद्र बोस- फॉर्वर्ड ब्लॉक गटाची स्थापना
* १९४० : उधमसिंग याने मायकेल ओडवायरचा वध केला.
* १९४० ऑगस्ट १७ : वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात.
* १९४० मार्च : राष्ट्रीय सभेचे रामगढ अधिवेशन.
* १९४० मार्च : क्रिप्स मिशन भारतात आले.
* १९४२ ऑगस्ट ८ : ङ्कछोडो भारतङ्कचा ठराव संत.
* १९४३ ऑक्टोबर २१ : आझाद हिंद सरकार स्थापन.
* १९४३ नोव्हेंबर : जपानने अंदमान व निकोबार ही भारतीय बेटे आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.
* १९४४ मे : आझाद qहद सेनेने ङ्कमॉवडॉकङ्क हे आसाममधील ठाणे qजकले व भारतीय भूीवर पाय ठेवला.
* १९४५ ऑगस्ट १८ : विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू.
* १९४५ : वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांची बैठक.
* १९४५ : मुंबईत गोवा यूथ लीग या संघटनेची स्थापना.
* १९४६ : डॉ. टी. बी. कुन्हा यांना भाषणबंदीचा हुकूम मोडल्याबद्दल गोव्यात ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.
* १९४६ मार्च १५ : लॉर्ड अ‍ॅटली यांनी ब्रिटिश पार्लेंटपुढे भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले.
* १९४६ जुलै : संविधान समितीसाठी भारतात निवडणुका.
* १९४६ ऑगस्ट १६ : बॅ. जिना यांचा आपल्या अनुयायांना ङ्कप्रत्यक्ष कृतिदिनङ्क पाळण्याचा आदेश.
* १९४६ सप्टेंबर २ : पं. जवाहरलाल नेहरूंनी हंगामी सरकार
* १९४६ : घटना समिती अस्तित्वात आली.
* १९४६ फेब्रुवारी १८ : मुंबई येथील ङ्कतलवारङ्क या ब्रिटिश युद्धनौकेवर भारतीय सैनिकांचा उठाव.
* १९४७ फेब्रुवारी २८ : पंतप्रधान अ‍ॅटली यांनी ब्रिटनचे भारताविषयीचे धोरण घोषित केले.
* १९४७ जून ३ : माउंटबॅटन योजनेची घोषणा.

Читать полностью…

MPSC History

नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.

महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्‍या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्‍या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.

अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे.
"संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश "
गाडगेबाबा प्रबोधन काव्य
भुकेलेल्यांना = अन्न
तहानलेल्यांना = पाणी
उघड्यानागड्यांना = वस्त्र
गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
बेघरांना = आसरा
अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार
बेकारांना = रोजगार
पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय
गरीब तरुण-तरुणींचे = लग्न
दुःखी व निराशांना = हिंमत
गोरगरिबांना = शिक्षण
हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!

संक्षिप्त चरित्र :-
गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले.
ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे' मंदिर बांधले.
१९०८ मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला.
१९२५- मुर्तिजापूर येथे गोरक्षण कार्य केले आणि धर्मशाळा व विद्यालय बांधले.
१९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली.
"मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.
गाडगे महाराज गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.
१९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.
गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.
"गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गीत मन्ना डे यांनी गायले.[१]
आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात'
१९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
१९५४- गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली.
गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.
डॉ आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानत असत.
२० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू. गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.

गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते.

गाडगेबाबा आणि बाबासाहेब आंबेडकर :
१४ जुलै १९४१ ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. २ घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणार्‍या बाबांनी बाबासाहेबांकडून २ घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे."
तेव्हा बाबासाहेब म्हणाले "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.

गाडगेबाबांचे विचार :
एकदा गाडगेबाबा रस्त्याने जात असताना...समोर एक व्यक्ती दगडाची पूजा करत असताना त्यांना दिसली. त्याने दगडावर हार चढविला. दुधाने अंघोळ घातली. इतक्यात एक कुत्रा आला आणि मागील पाय वर करून त्या दगडावर मूत्र विसर्जन करू लागला. ती व्यक्ती चिडली. त्याला कुत्र्याचा फार राग आला. तो कुत्र्याला मारण्यासाठी हातात दगड घेऊन धावू लागला. तेव्हा गाडगेबाबा म्हणाले, " बिचार्‍या गरीब मुक्या जनावरांना त्रास का देता ?

Читать полностью…

MPSC History

🔹महाराष्ट्र पोलीस भरती महत्त्वाचे - महिलां विषयक कायदे

1. सतीबंदी कायदा -1829

2. विधवा पुनर्विवाह कायदा -1856

3. धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा -1866

4.भारतीय घटस्फोट कायदा -1869

5. मानवी हक्क संरक्षण कायदा -1993

6. आनंदी विवाह कायदा -1909

7. मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा -1986

8. विशेष विवाह -1954

9. हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956

10. विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959

11.अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956

12. वैद्यकी व गर्भपात कायदा -1929

13. हुंडाप्रतिबंधक कायदा -1929

14. बालविवाह निर्बंध कायदा -1929

15. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा -2005

16. महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा -2005

17. मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961

18. समान वेतन कायदा -1976

19. बालकामगार कायदा -1980

20. अपंग व्यक्ती कायदा -1995

21. मानसिक आरोग्य कायदा -1987

22. कुटुंब न्यायालय कायदा - 1984

23. राष्ट्रीय महिला आयोग कायदा -1990

24. माहिती अधिकार कायदा -2005

25. बालन्याय कायदा - 2000

26. भिक्षा प्रतिबंधक कायदा -1959

27. अनाथालय व धर्मादाय कायदा - 1960

28. हिंदू विवाह कायदा -1955

29. कर्मचारी विमा योजना -1952

30. प्रसूती सुधारणा कायदा -1961

31. अंतरराज्यीय प्रवासी कामगार कायदा - 1979

32. वेश्या वृत्ती निवारण कायदा -1986

33. हुंडा निषेध कायदा - 1986

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉइन करा @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

आज सायंकाळी ठीक 6 वाजता प्रीमियर होईल...

लिंक वर क्लिक करून नोटीफिकेशन ऑन करा...

https://youtu.be/hixil3vjKTk?si=9gDrtubCv20hey1M

Читать полностью…

MPSC History

आज सायंकाळी ठीक 6 वाजता प्रीमियर होईल...

लिंक वर क्लिक करून नोटीफिकेशन ऑन करा...

https://youtu.be/Xt7XQL9dBvk?si=EXVBfzZBt-mdWfgt

Читать полностью…

MPSC History

♦️#MPSC #COMBINE गट ब  आजचा पेपर..

👆👆 आजचा झालेला पेपर PDF
👆👆

जॉइन करा @empsckatta

Читать полностью…

MPSC History

🔴 गट ब साठी
🟢 एक दिवशीय इतिहासाचे मोफत रिव्हीजन Lecture.

🗓 दिनांक: 21 डिसेंबर.
⏰ वेळ: सकाळी 10वा.
🏛 ठिकाण: एन. श्याम सरांची पेरा इन्स्टिटयूट.

टीप: Short Notes Office च्या बाजूला Xerox मध्ये मिळतील.

☎️ संपर्क:
9004611932, 9545600535

Читать полностью…

MPSC History

📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –

🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)
👉  @eMPSCkatta

🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)
👉  @spardhagram

🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)
👉 @ChaluGhadamodi

✍️ मराठी व्याकरण – @Marathi

✍️ इंग्रजी व्याकरण – @MPSCEnglish

📜 इतिहास – @MPSCHistory

🗺️ भूगोल – @MPSCGeography

🏛️ राज्यशास्त्र – @MPSCPolity

💹 अर्थशास्त्र – @MPSCEconomics

🔬 विज्ञान व तंत्रज्ञान-- @MPSCScience

🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths

📢 तुम्ही जॉईन केलं का?

Читать полностью…

MPSC History

https://youtu.be/7M3FQst4Bts?si=K_OvBWmmTCFmn25W

Читать полностью…

MPSC History

व्हॉट्स ऍपवर स्पर्धा परीक्षांच्या लेटेस्ट अपडेटसाठी खालील लिंक वरून जॉइन करा आमचे WhstaApp चॅनेल:

https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c

Читать полностью…

MPSC History

☘ इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे ☘

१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०)  गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन 
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी
७७) संजीवनी - कृष्णकुमार मित्र



✅अशाच महत्वाच्या माहितीसाठी
🔥जॉईन🔥
@MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

/channel/eMPSCkatta?livestream=7cc230b8ad70f25785

Читать полностью…

MPSC History

प्राचीन भारतातील जैन महासभा (Jain Councils)

दोन मुख्य जैन महासभा झाल्या आहेत.

1) पहिली जैन महासभा
काल : इ.स.पू. 3 रे शतक (बुद्धानंतर थोड्याच काळाने)
ठिकाण : पाटलिपुत्र
संरक्षक राजा : चंद्रगुप्त मौर्य
अध्यक्ष : स्थूलभद्र स्वामी (भद्रबाहूंचे शिष्य)
महत्त्व :
जैन धर्म दोन पंथात विभागला :
श्वेतांबर (पांढरे वस्त्रधारी) – पश्चिम भारतात स्थायिक झाले
दिगंबर (नग्न साधू) – दक्षिण भारतात गेले (भद्रबाहूंच्या नेतृत्वाखाली)
ग्रंथांचे संकलन करण्यास प्रारंभ

2) दुसरी जैन महासभा
काल : इ.स. 512
ठिकाण : वल्लभी (सौराष्ट्र, गुजरात)
संरक्षक राजा : गुहसुर राजवंशाचा राजा ध्रुवसेन (ध्रुवसेन प्रथम बलाढ्य)
अध्यक्ष : देवर्धिगणी क्षमाश्रमण
महत्त्व :
श्वेतांबर जैनांचा पवित्र साहित्य संकलित व लिखित स्वरूपात आणले.
12 अंग व इतर उपांगांचे संकलन करून जैन आगम साहित्य तयार केले.

Summary
✔ जैन महासभा फक्त दोन – पाटलिपुत्र (इ.स.पू. 3 रे शतक) व वल्लभी (इ.स. 512).
✔ पाटलिपुत्र महासभा – चंद्रगुप्त मौर्य संरक्षण, स्थूलभद्र अध्यक्ष, दिगंबर–श्वेतांबर विभाजन.
✔ वल्लभी महासभा – ध्रुवसेन संरक्षण, देवर्धिगणी अध्यक्ष, जैन आगम साहित्य संकलन.


राज्यसेवा पूर्व 2025

🔥जॉईन🔥 @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

🔥विविध कट & खटले🔥

🔥जॉईन🔥 @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

📚 हेन्री डेरोजिओ आणि "यंग बंगाल मूव्हमेंट" : १९व्या शतकातील कलकत्त्यातील सामाजिक क्रांती
डेरोजिओचा परिचय
➤ हेन्री डेरोजिओ (1809–1831) हा इंडो-पोर्तुगीज वंशाचा विचारवंत, कवी आणि शिक्षक होता.
➤ १८२६ मध्ये तो कलकत्त्यातील हिंदू कॉलेज (आधुनिक प्रेसिडेन्सी कॉलेज) मध्ये प्राध्यापक झाला.
➤ त्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विचारमुक्ती, विवेक, आधुनिकता आणि विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन विकसित करणे हा होता.

यंग बंगाल चळवळ (Young Bengal Movement)
➤ डेरोजिओच्या शिष्यांना "Derozians" किंवा "Young Bengal" असे म्हणले गेले.
➤ त्यांची वैशिष्ट्ये :
► विचारस्वातंत्र्याचा आग्रह
► सामाजिक-धार्मिक प्रथा व अंधश्रद्धांना विरोध
► स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार
► वसाहतवाद व गुलामीला विरोध
► धर्मनिरपेक्ष, समतावादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन

डेरोजिओच्या विचारांचे महत्त्व
➤ डेरोजिओ म्हणाला की गुलाम माणसाला स्वातंत्र्य म्हणजे काय हे सांगणे आवश्यक आहे.
➤ "स्वातंत्र्य हे प्रत्येक मानवाचे नैसर्गिक हक्क आहे" ही धारणा पसरवली.
➤ यंग बंगालांनी चर्च व धर्मसंस्थांच्या अंधश्रद्धेला आव्हान दिले.
➤ त्यांनी वादविवाद, लेखन, भाषणे याद्वारे सामाजिक सुधारणांचा प्रचार केला.

बौद्धिक व सामाजिक प्रभाव
➤ "Derozians" हे केवळ सुधारक नव्हते, तर विचारप्रवर्तक व क्रांतिकारी होते.
➤ त्यांनी आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून नवा समाज घडवण्याचा प्रयत्न केला.
➤ सामाजिक विषय :
► जातिभेद व अस्पृश्यता यांना विरोध
► स्त्रियांच्या अधिकारांचा पुरस्कार
► लोकशाहीवादी दृष्टीकोन
► विज्ञान व तर्कशास्त्रावर आधारित शिक्षण

साम्राज्यवादी दृष्टीकोनाशी संघर्ष
➤ डेरोजिओ व त्याचे शिष्य हे मॅकॉलेच्या "अँग्लिसायझेशन" धोरणापेक्षा वेगळे होते.
➤ ते इंग्रजी शिक्षणाला साधन मानत, पण त्याद्वारे भारतीय समाजाचा प्रगत विचारांचा विकास व्हावा अशी त्यांची अपेक्षा होती.
➤ इंग्रजी शिक्षणाचा वापर भारतीयांना गुलाम बनवण्यासाठी नव्हे, तर मुक्त विचारांसाठी व्हावा असा त्यांचा आग्रह होता.

डेरोजिओनंतरचे परिणाम
➤ डेरोजिओ फक्त २२ वर्षांचा असतानाच (१८३१) मृत्यू पावला, पण त्याची विचारधारा जिवंत राहिली.
➤ यंग बंगालांचे पुढील शिष्य नंतरच्या समाजसुधारकांना प्रेरणा देत राहिले.
➤ त्यांचा प्रभाव ब्रह्मो समाज, भारतीय राष्ट्रवाद, समाजसुधारणा चळवळींवर स्पष्ट दिसून येतो.

डेरोजिओच्या चळवळीचे मर्यादित स्वरूप
➤ त्यांचा प्रभाव मुख्यतः उच्चवर्गीय, इंग्रजी शिकलेल्या तरुणांमध्ये होता.
➤ ग्रामीण व खालच्या वर्गातील समाजावर त्याचा थेट परिणाम कमी.
➤ प्रत्यक्ष सामाजिक सुधारणांच्या अंमलबजावणीत त्यांचे यश मर्यादित राहिले.

पूरक माहिती
➤ डेरोजिओ याला "भारताचा पहिला आधुनिक बंडखोर शिक्षक" असे म्हटले जाते.
➤ त्याच्या विचारसरणीचा पुढे गांधी, नेहरू, विवेकानंद अशा अनेक विचारवंतांवर अप्रत्यक्ष परिणाम झाला.
➤ यंग बंगालांनी भारतीय समाजात "तर्कशीलतेचा बीज" रोवले, जे पुढे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अंकुरले.
➤ त्यांच्या चळवळीने भारतीय बुद्धिजीवींमध्ये "राष्ट्रवादाची बीजे" पेरली.

✅ निष्कर्ष :
हेन्री डेरोजिओ आणि यंग बंगालांनी अल्पावधीत भारतीय समाजाला विचारस्वातंत्र्य, तर्कशक्ती आणि आधुनिकतेचा नवा मार्ग दाखवला. जरी त्यांची चळवळ अल्पजीवी ठरली, तरी तिच्या प्रभावाने पुढील शतकात भारतीय समाजसुधारणा आणि राष्ट्रवादी जागृती यांचा पाया मजबूत झाला.

🔥जॉईन🔥 @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

त्याला हे कुठं माहीत आहे की, माणसांचा देव दगड असतो म्हणून ?"
पंढरपुरात एकदा टिळकाचे भाषण होते. तेवढ्यात बाबा समोरून येत होते. सगळ्यांच्या माना वळल्या. श्रोत्यांच्या मनातले ओळखून टिळकांनी बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द बोलायला सांगितले. टिळकांचे अथणीला झालेले भाषण बाबांना ठाऊक होते.. स्टेजवर येताच बाबांनी टिळकांच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाले "टिळक महाराज मी चुकलो. आम्ही हयातभर तुमची कापडं धुतली, इस्त्री केली. तवा आम्ही कसे मार्गदर्शन करू? महाराज काय बी करा पण आम्हालाबी ब्राह्मण करा."

गाडगे महाराज यांच्यावरील पुस्तके :
The Wandering Saint (वसंत शिरवाडकर) - श्री गाडगे बाबा प्रकाशन समिती, मुंबई
आपले संत (एस.ए. कुलकर्णी) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९३)
कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे) -लोकवाड्मय गृह, मुंबई (१९९२)
गाडगेबाबा (वसंत पोतदार) -अक्षर प्रकाशन, मुंबई (१९९९)
गाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी) - विजयश्री प्रकाशन, अमरावती (१९९३)
गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार) -योगेश प्रकाशन, पुणे (१९९३)
दिव्याला गाडगे महाराज (गो. भट) -नवलवय मुद्रणालय, अहमदाबाद (१९८२)
मानवता के पुजारी संत श्री गाडगे बाबा (स्यमंत सुधाकर) -गाडगेबाबा प्रकाशन समिती, मुंबई (१९९०)
मुलांचे गाडगेबाबा (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला कोल्हापूर (१९९२)
लोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)
लोकोत्तर गाडगेबाबा जीवन आणि कार्य (द.ता. भोसले) -ग्रंथाली, मुंबई (२००७)
श्री. संत गाडगे महाराज (मधुकर केचे) -साकेत प्रकाशन, औरंगाबाद (२००४)
श्री. संत गाडगे महाराज (गो.नी. दांडेकर) -मॅजेस्टिक, प्रकाशन मुंबई (१९९५)
श्री. संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पा.बा. कवडे) -अण्णासाहेब कोरपे चॉरिटेबल ट्रस्ट, अकोला (१९९४)
श्री. गाडगे महाराज गौरव ग्रंथ (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)
श्री. गाडगे महाराज शेवटचे कीर्तन (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९५)
श्री. गाडगेबाबांचे विचार (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला, कोल्हापूर (१९९६)
श्री. गाडगेबाबांची पत्रे (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९१)
श्री. संत गाडगेबाबा विचार धन (ह.रा. हिवरे) -नारायणराव अमृतराव लभडे प्रकाशन (१९९९)
संत गाडगे महाराज (डॉ. श्याम दयार्णव कोपर्डेकर) - (१९९६)
संत गाडगे बाबांच्या आठवणी (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)

संकीर्ण :
डेबू हा चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे.
देवकीनंदन गोपाळा हाही चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे.

पुरस्कार :
गाडगेबाबा यांच्या नावाने ग्राम स्वच्छता अभियान चालवले जाते. त्यांच्या नावाने काही पुरस्कारही देण्यात येतात.
१. महाराष्ट्र सरकारतर्फे गाडगेबाबा निर्मल ग्राम पुरस्कार
२. पिंपरी शहर लॉन्ड्री संघटनेचे (अ) राष्ट्रसंत गाडगेबाबा सामाजिक जाणीव पुरस्कार.(ब) राष्ट्रसंत गाडगेबाबा युवा समाजभूषण पुरस्कार.

Читать полностью…

MPSC History

गाडगे महाराज

गाडगे महाराज (जन्म: फेब्रुवारी २३, १८७६- मृत्यु: २० डिंसेंबर १९५६ ) हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.

बालपण :
गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते.
डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींचे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.

सामाजिक सुधारणा :
१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकर्‍यांना शिकविला.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.

त्यांनी

Читать полностью…

MPSC History

https://youtu.be/xjGJZMcwMEs?si=tQzNOJv8_KNght7A

Читать полностью…

MPSC History

आज सायंकाळी ठीक 6 वाजता प्रीमियर होईल...

लिंक वर क्लिक करून नोटीफिकेशन ऑन करा...

https://youtu.be/IBpsjK98C6g?si=RirGV3-6v36OGywg

Читать полностью…

MPSC History

🔴आज झालेले संयुक्त गट क पूर्व परीक्षा पेपर

जॉइन करा @eMPSCkatta

Читать полностью…

MPSC History

🟣   इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये  🟣

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले


◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन


◾️“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड

◾️स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता


◾️राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम


◾️“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह


️“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.
t.me/MPSCHistory

◾️” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.


◾️” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष


◾️” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन


◾️” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी


◾️” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी


◾️” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय


◾️‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले
‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक

◾️” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी


◾️“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर


◾️“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार


◾️” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”
– गारेट ब्रिटीश इतिहासकार.


◾️” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु


◾️क्रांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.


◾️“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.


◾️” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.


◾️“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे


◾️“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.


◾️“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही. 
भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक


◾️इंग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी

◾️असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.

◾️सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.

◾️“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक


◾️खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना


◾️1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स

📌📌जॉईन -
t.me/MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

♦️आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर
२०२५

👉 ९ नोव्हेंबर २०२५


जॉइन करा @eMPSCkatta

Читать полностью…

MPSC History

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024

आज झालेला GS पेपर


जॉइन करा @empsckatta

Читать полностью…

MPSC History

राज्यसेवा पूर्व परीक्षा । Last 28 Days Strategy By आशिष सर

लिंक: https://youtu.be/qQo7f9yVvTc?si=ZDt0GU0g1VbAJQzl

आज सकाळी 8 वाजता @eMPSCkatta YouTube चॅनेल वर

Читать полностью…

MPSC History

★ महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे ★

★ विद्यापीठाचे नाव - स्थळ - स्थापना ★

मुंबई विद्यापीठे -  मुंबई  -  १८५७

◆ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठे - नागपूर  - 1923

◆ पुणे विद्यापीठ ( सावित्रीबाई फुले) - पुणे  -1949

◆ डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ - औरंगाबाद - 1958

◆ शिवाजी विद्यापीठ - कोल्हापूर - 1962

◆ कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ - अमरावती - 1983

◆ Y. C. M. मुक्त विद्यापीठ - नाशिक - 1989

◆ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ - जळगाव  - 1990

◆ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ - नांदेड - 1993

◆ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ - पुणे - 1921

◆ सोलापूर विद्यापीठ (अहिल्याबाई होळकर) - सोलापूर - 2004

◆ गौंडवाना विद्यापीठ - गडचिरोली - 2011


🔥जॉईन🔥 @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

Old 11 वी state बोर्ड💐💐

एकदा वाचून घ्या आणि नोट्स तयार करून ठेवा

🔥जॉईन🔥 @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

/channel/eMPSCkatta?livestream=7cc230b8ad70f25785

Читать полностью…

MPSC History

✅✅प्राचीन भारतातील चार बौद्ध परिषदा (Buddhist Councils)

1) पहिली बौद्ध परिषद (First Buddhist Council)
इ.स.पू. 483 (बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 3 महिन्यांनी)
ठिकाण : राजगृह (राजगीर, बिहार)
संरक्षक राजा : अजातशत्रू (मगध साम्राज्य)
अध्यक्ष : महाकश्यप
महत्त्व :
बुद्धांच्या उपदेशांचे संकलन करण्यात आले.
उपालीने विनयपिटक वाचून दाखवला.
आनंदाने सुत्तपिटक वाचून दाखवला.

2) दुसरी बौद्ध परिषद (Second Buddhist Council)
इ.स.पू. 383
ठिकाण : वैशाली
संरक्षक राजा : कालासोक (शिशुनाग वंश)
अध्यक्ष : सब्बकमि
महत्त्व :
भिक्षूंमध्ये शिस्त व आचारसंहिता यावर वाद.
बौद्ध संघात पहिली फूट पडली:
✔ स्थविरवादिन (थेरवाद) – कडक आचारसंहितेचे समर्थक
✔ महासांघिक – उदारमतवादी

3) तिसरी बौद्ध परिषद (Third Buddhist Council)
इ.स.पू. 250
ठिकाण : पाटलिपुत्र (पाटणा)
संरक्षक राजा : अशोक मौर्य
अध्यक्ष : मोग्गलिपुत्त तिस्स
महत्त्व :
बौद्ध संघातील अप्रामाणिक भिक्षू काढून टाकले.
अभिधम्म पिटक संकलित झाला.
मोग्गलिपुत्त तिस्स यांचा "कठावस्तु" ग्रंथ रचला गेला.
बौद्ध धर्म प्रचारासाठी अशोकाने धर्मदूत विविध देशात पाठवले (श्रीलंका, ग्रीस, इजिप्त इ.).

4) चौथी बौद्ध परिषद (Fourth Buddhist Council)
इ.स. 72 (किंवा इ.स. 1 शतक)
ठिकाण : कुंदलवन विहार, काश्मीर
संरक्षक राजा : कनिष्क (कुषाण साम्राज्य)
अध्यक्ष : वसुबंधु/वसु मित्र (काही ग्रंथांनुसार वसुबंधू; बहुधा वसु मित्र प्रमुख)
महत्त्व :
बौद्ध धर्म दोन मुख्य पंथात विभागला :
हीनयान – थेरवाद परंपरा
महायान – नवीन उदारमतवादी विचार
बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय प्रसार

Summary:
पहिली परिषद – राजगृह, अजातशत्रू, महाकश्यप, विनयपिटक व सुत्तपिटक.
दुसरी परिषद – वैशाली, कालासोक, फूट – स्थविरवादिन व महासांघिक.
तिसरी परिषद – पाटलिपुत्र, अशोक, मोग्गलिपुत्त तिस्स, अभिधम्मपिटक, कठावस्तु, धर्मदूत.
चौथी परिषद – काश्मीर, कनिष्क, वसु मित्र, हीनयान व महायान विभाजन.

राज्यसेवा पूर्व 2025

🔥जॉईन🔥 @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –

🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)
👉  @eMPSCkatta

🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)
👉  @spardhagram

🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)
👉 @ChaluGhadamodi

✍️ मराठी व्याकरण – @Marathi

✍️ इंग्रजी व्याकरण – @MPSCEnglish

📜 इतिहास – @MPSCHistory

🗺️ भूगोल – @MPSCGeography

🏛️ राज्यशास्त्र – @MPSCPolity

💹 अर्थशास्त्र – @MPSCEconomics

🔬 विज्ञान व तंत्रज्ञान-- @MPSCScience

🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths

📢 तुम्ही जॉईन केलं का?

Читать полностью…

MPSC History

🎯 Rajyaseva Pre 2025 Countdown 🎯

🗓️ 44 DAYS TO GO 🗓️


📌 तयारी कशी चाललीये?
✅ अभ्यास व्यवस्थित होतोय ना?
✅ PYQ daily करताय का?
✅ Plan केलेला फॉलो करत आहात का?
✅ Paper Practice सुरू केली का?
✅ Time Management जमतंय का?
✅ Revision कधी सुरू करणार?

असे बरेच प्रश्न तुमच्या मनात असतीलच...

म्हणूनच 👇

📢 आज संध्याकाळी ⏰ 7 वाजता


✨ Special Open Session ✨

👉 Short & Crisp Session
👉 Revision Strategy + Doubts

📍⏳ जास्त वेळ घेणार नाही, पण परिक्षेच्या शेवटच्या टप्प्यात आवश्यक असलेले मार्गदर्शन मिळेल!

🔗 @eMPSCkatta

Читать полностью…
Subscribe to a channel