mpschistory | Education

Telegram-канал mpschistory - MPSC History

155982

Here u can get useful info about History for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCGeography @MPSCScience @MPSCAlerts @MPSCCSAT @MPSCMaterial @MPSCHRD @MPSCCsat @MahaTalathi

Subscribe to a channel

MPSC History

799 : 2 800 : 3

801 : 4 802 : 2

803 : 2 804 : 1

805 : 1 806 : 3

Читать полностью…

MPSC History

🌺राजा राममोहन रॉय🌺

🌸२२ मे १७७२ रोजी बंगालमधील राधानगर येथे जन्मलेल्या राममोहन यांच्या जडणघडणीत त्यांच्या माता-पित्यांच्या घराण्यांचा संबंध फार मोठा आहे. वडीलांकडील सर्व मंडळी आधुनिक शिक्षण घेतलेली आणि बहुतांश सरकार दरबारी मोठ्या हुद्द्यावर नोकरी करणारी होती.

🌺त्यामुळेे त्यांच्या वडीलांनी वयाच्या नवव्या वर्षी त्यांना अरबी, फारसी या त्याकाळच्या सरकारात / व्यवहारात वापरल्या जाणार्‍या भाषा आणि शास्त्र शिकण्यासाठी पाटण्याच्या एका मदरशात (मुक्तब) पाठवल.

🌺मदरशामधे अरबी आणि फारसी भाषांबरोबरच त्यांनी इस्लाम धर्म आणि सुफी पंथ, शायर आणि शायरी यांचादेखील अभ्यास केला. हाफीज आणि सादी हे त्यांचे आवडते शायर होते.तिथ शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षी आईच्या प्रभावामुळे, ज्यांच्या माहेरची मंडळी प्रामुख्यान पौरोहित्य करणारी होती, धार्मिक शिक्षण घेण्यासाठी म्हणून बनारस (काशी) इथ त्यांना पाठवण्यात आल. तिथ त्यांनी संस्कृत भाषेबरोबरच वेद, वेदांत, उपनिषदे अशा गोष्टींचा अभ्यास केला. सोळाव्या वर्षापर्यंत त्यांनी बनारस मधे वास्तव्य केल. हे अस दोन टोकाच्या किंवा पूर्ण वेगवेगळ्या व्यवस्थेत शिक्षण घेउन राम मोहन वयाच्या सोळाव्या वर्षी घरी परत आले. घरी परतल्यावर त्यांनी तुहफतूल मुवाहीद्दीन (एकेश्ववरवाद्यांना भेट) नावाचा अरबीत प्रस्तावना असणारा एक लेख फारसीमधे लिहीला. यामधे त्यांनी मूर्तीपूजेवर कडाडून टीका केली होती. त्यांच्यामते मूर्तीपूजा ही वेदांच्या शिकवणुकीच्या विरुद्ध होती. त्या लेखामुळ वडीलांशी त्यांचे पटेनास झाल आणि स्वत्:च घर सोडून निघून गेले.


🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

Читать полностью…

MPSC History

एमपीएससी पूर्व परीक्षा इतिहास : 4

Читать полностью…

MPSC History

📚 YCMOU Books 📚

HIS 220 आधुनिक महाराष्ट्राचा/भारताचा इतिहास

आगामी राज्यसेवा / PSI / STI पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे पुस्तक , प्रत्येकाने वाचाच.

Join us @MPSCMaterial
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Читать полностью…

MPSC History

दादाभाई पालनजी नवरोजी चार वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. आईनेच त्यांचे पालनपोषण केले. तत्कालीन प्रथेप्रमाणे वयाच्या ११ व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. १८४५ मध्ये ते पदवीधर झाले. एलफिन्स्टन महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. पुढे याच महाविद्यालयात ते गणित व तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक झाले. अशा प्रकारची नेमणूक होणारे ते सर्वप्रथम हिंदी व्यक्ती होत. प्राध्यापकी सुरू असतानाच मूळचा चळवळ्या स्वभाव त्यांना शांत बसू देईना. आपण काहीतरी वेगळे केले पाहिजे, हा विचार पुन: पुन्हा मनात येत होता. यातूनच १८५५-५६ च्या सुमारास कामा कंपनीच्या भागीदारीमुळे त्यांना इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली. तेथील वास्तव्यामुळे जगाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनच बदलून गेला. तिथेही त्यांनी अनेक गोष्टींत रस घ्यायला सुरुवात केली. यातूनच मंॅचेस्टर कॉटन सप्लाय असोसिएशन, कौन्सिल ऑफ लिव्हरपूल, अथेनियम, नॅशनल इंडियन असोसिएशन या संस्थांच्या कार्यात त्यांनी भाग घेतला. जोडीला काही काळ लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गुजरातीचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत राहिले. पुढील दोन दशके त्यांचे भारत-इंग्लंड असे येणे-जाणे राहिले.

Читать полностью…

MPSC History

🌸संस्थात्मक योगदान: महात्मा फुले🌸

3 ऑगस्ट 1848– पुणे येथे भिंडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.

4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.

1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.

1855 – प्रौढांसाठी रात्र शाळा.

1863 – बालहत्या प्रतिबंधक गृह.

1877 – दुष्काळपिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्प.

10 सप्टेंबर 1853 – महार, मांग इ. लोकांस विद्या शिकवणारी संस्था.

24 सप्टेंबर 1873 – सत्यशोधक समाजाची स्थापना.

व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना.

1880 – म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन :

1855 – ‘तृतीय रत्न‘ नाटक (शुद्रांच्या स्थितीचे वर्णन).

1868 – ‘ब्राम्हणांचे कसब‘

1873 – ‘गुलामगिरी‘ हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्त करणार्‍या लोकांना अर्पण केला.

1873 – अस्पृश्यता निवारणाचा पहिला कायदा.

1 जानेवारी 1877 – ‘दीनबंधू‘ मागासलेल्या दिनाच्या दु:खाला वाचा फोडणारे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णाराव भालेकर यांनी सुरू केली.

1880 पासून लोखंडे दिन बंधुचे व्यवस्थापन सांभाळले.

1883 – शेतकर्‍यांचा आसूड हा ग्रंथ.

1885 – इशारा सत्सार “The Essense Of Truth” सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. या ग्रंथास विश्व कुटुंब वादाचा जाहीर नामा म्हणतात.

अस्पृश्यांची कैफियत.

शिवाजी महाराजांचा पोवाडा. 

☘☘☘☘🌾🌾🌾🌾🌱☘☘☘☘

Читать полностью…

MPSC History

🌺🌺लाला लजपतराय🌺🌺

🌿 लालाजींना ‘पंजाब केसरी’ म्हणूनही गौरवण्यात आले होते.

🌸फेब्रुवारी १९२८ मध्ये ‘सायमन कमिशनवर’ सर्व ब्रिटिश सदस्य नेमल्याबद्दल सरकारचा निषेध करणारा ठराव लजपतरायांनी मांडला होता, नोव्हेंबरच्या सुरुवातीस पंजाबमध्ये कमिशन आल्यावर लालाजींनी निदर्शनाचे नेतृत्व केलं, जमाव पांगवण्यासाठी ब्रिटीशांनी मोर्च्यावर लाठीहल्ला केला.
लालाजींवरही लाठीहल्ला करण्यासाठी ब्रिटीश जराही कचरले नाही. लाठी हल्ल्यात झालेल्या जबर मारहाणीने १७ नोव्हेंबरला त्यांचा मृत्यू झाला. पण लालाजींचे बलिदान क्रांतीकारकांनी व्यर्थ जाऊ दिले नाही, त्यांच्या बलिदाननंतर स्वातंत्र्याची चवळवळ अधिक प्रकर्षाने वाढू लागली.

☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘

Читать полностью…

MPSC History

✳️राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन✳️

Читать полностью…

MPSC History

श्री. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून सात मैल दूर मुघलसराई या लहान रेल्वे गावात झाला. लाल बहादूर शास्त्री केवळ दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. विशीतील त्यांची आई आपल्याड तीन मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाली.

🌾🌾🔶🔶🔶🌾🌾🌾🔶🔶🔶🌾🌾

Читать полностью…

MPSC History

🌺🌺लाल बहादुर शास्त्री🌺🌺

श्री. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून सात मैल दूर मुघलसराई या लहान रेल्वे गावात झाला. लाल बहादूर शास्त्री केवळ दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. विशीतील त्यांची आई आपल्याड तीन मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाली.

लहान गावात लालबहादूर यांचे शालेय शिक्षण यथातथाच झाले. मात्र तरीही गरीबीतही त्यांचे बालपण काही प्रमाणात सुखात गेले.
उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे, यासाठी त्यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले. घरी सर्वजण त्यांना “नन्हे” नावाने हाक मारीत. ते कित्येक मैल अनवाणी चालत शाळेला जायचे. कडक उन्हाळयातही तापलेल्या रस्त्यावरुन ते शाळेत जायचे. वयात आल्यावर, लाल बहादूर शास्त्री यांना परकीयांच्या गुलामीमधून देशाला मुक्त करण्याच्या लढयात रुची निर्माण झाली. भारतात ब्रिटीश राजवटीला पाठिंबा देणाऱ्या भारतीय राजांची महात्मा गांधी यांनी केलेल्या निंदेमुळे ते अत्यंत प्रभावित झाले. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री केवळ अकरा वर्षांचे होते, आणि तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करण्याबाबतची प्रक्रिया त्यांच्या मनात घोळू लागली.

गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले, त्यावेळी लाल बहादूर शास्त्री सोळा वर्षांचे होते. गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून‍ शिक्षण सोडून देण्याचा विचार एकदा त्यांनी केला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या आईच्या आशा आकांक्षांना हादरा बसला. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगून त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ते प्रयत्न असफल ठरले. लाल बहादूर शास्त्री यांचा निर्धार ठाम होता. त्यांच्या निकटच्या व्यक्तींना माहित होते की एकदा निर्णय घेतला की ते तो कधीही बदलणार नाहीत, कारण बाहेरुन मृदू वाटणारे शास्त्री आतून एखादया खडकासारखे कणखर होते.

ब्रिटीश राजवटीच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या अनेक राष्ट्रीय संस्थांपैकी एक वाराणसीतील काशी विद्यापीठात ते सामील झाले. येथे अनेक महान विद्वान आणि देशभक्तीचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडला. विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पदवीचे नाव “शास्त्री” होते. मात्र लोकांच्या मनात त्यांच्या नावाचा एक भाग म्हणून शास्त्री हे नाव कोरले गेले.

1927 मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांची पत्नी ललिता देवी हया त्यांच्याच शहराजवळील मिर्झापूर येथील होत्या. त्यांचा विवाह पारंपारिक पध्दतीने पार पडला. हुंडा म्हणून एक चरखा आणि हाताने विणलेले काही मीटर कापड होते. यापेक्षा अधिक त्यांना आणखी काही नको होते.
1930 मध्ये, महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा केली आणि मिठाचा कायदा मोडला. या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती आली. लाल बहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढयात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांनी अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व केले आणि एकूण सात वर्षे ब्रिटीश तुरुंगवासात घालवली. स्वातंत्र्याच्या या संग्रामाने ते अधिक परिपक्व झाले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस जेव्हा सत्तेवर आली, त्यापूर्वीच राष्ट्रीय संग्रामातील नेत्यांना नम्र आणि विनित लाल बहादूर शास्त्री यांचे महत्त्व लक्षात आले होते. 1946 मध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाले, तेव्हा या “छोटया डायनॅमो”ला देशाच्या कारभारात रचनात्मक भूमिका पार पाडण्यासाठी सांगण्यात आले. त्यांना त्यांच्या उत्तर प्रदेश राज्याचे संसदीय सचिव नियुक्त करण्यात आले आणि लवकरच ते गृहमंत्री पदावर आरुढ झाले. त्यांची कठोर मेहनत करण्याची क्षमता आणि त्यांची कार्यक्षमता उत्तर प्रदेशात एक लोकोक्ती बनली. 1951 मध्ये ते नवी दिल्लीत आले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वे मंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उदयोग मंत्री, गृहमंत्री आणि नेहरुंच्या आजारपणात बिनखात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांची प्रतिष्ठा निरंतर वाढतच होती. एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे त्यांनी स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला. देश आणि संसदेने त्यांच्या अभूतपूर्ण निर्णयाची प्रशंसा केली. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी या घटनेबाबत संसदेत बोलताना लालबहादूर शास्त्री यांची इमानदार वृत्ती आणि उच्च आदर्शमूल्यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की शास्त्री यांचा राजीनाम मी स्वीकारत आहे कारण यामुळे घटनात्मक मर्यादेमध्ये एक उदाहरण कायम राहील. जे काही घडले त्याला शास्त्री जबाबदार नाहीत. रेल्वे अपघातावरील दीर्घ चर्चेला उत्तर देताना लाल बहादूर शास्त्री म्हणाले “कदाचित माझी उंची कमी असल्यामुळे तसेच नम्र असल्यामुळे लोकांना वाटत असावं की कणखर होऊ शकत नाही. जरी मी शारीरिकदृष्टया धडधाकट नसलो तरी मला वाटते की मी आतून इतका कमकुवतही नाही.”
आपल्या मंत्रालयीन का

Читать полностью…

MPSC History

विजयालक्ष्मी पंडित 

🌸जन्म : अलाहाबाद,
१८ ऑगस्ट १९००; मृत्यू : डेहराडून, १ डिसेंबर १९९०)

🌸या मोतीलाल नेहरू यांच्या कन्या व जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी होत्या.

☘☘☘🌺🌺🌺☘☘☘🌺🌺🌺

Читать полностью…

MPSC History

🌺🌺लाला लजपतराय🌺🌺

🌸लालाजींचा जन्म पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात धुंढिके गावात २८ जानेवरी १८६५ मध्ये झाला.

🌿लहानपाणापासूनच ते अत्यंत हुशार होते. अरबी, उर्दू अशा अनेक भाषांचे त्यांना सखोल ज्ञान होतं. एल्एल्‌. बी. ची पदवी मिळवलेले लालाजी अल्पकाळातच यशस्वी वकील म्हणून नावारुपास आले.

🌸 बाल विवाह, हुंडा यांना त्यांनी कडाडून विरोध केला. स्त्री शिक्षणाचे ते समर्थक होते. बंगालच्या विभाजनाला लालांजींनी तीव्र विरोध केला.
🌿सायमन कमिशनच्या निषेधार्थ मोठा जमाव लाहोरमध्ये जमला होता. ब्रिटीश पोलीस अधिकारी सांडर्स यांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्जचे आदेश दिले यात झालेल्या मारहाणीत लालाजी आजारी पडले आणि काही दिवसांत त्यांच्या मृत्यू झाला.

🌸एक महिन्यातच चंद्रशेखर आजाद, भगत सिंह, राजगुरु, सुखदेव यांनी लालाजींच्या हत्येचा बदला घेतला. ब्रिटींशांच्या सत्तेचा पाया खिळखिळा करण्यात लालाजींचा वाटाही तितकाच मोठा होता.


🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿

Читать полностью…

MPSC History

🌺🌺 नेहरू रिपोर्ट 🌺🌺

भारतात सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला जात असता व त्याचे सारखे निषेध होत असता भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड त्या कमिशनचे समर्थन करीत होते. असेच समर्थन करीत असता त्यांनी भारतीय नेत्यांना आव्हान दिले की, भारतीय राजकीय संघटनांनी एकत्र येऊन भारताची भावी घटना कशी असावी याविषयी एकमताने मसुदा तयार करून सरकारकडे द्यावा. सरकार तो पार्लमेंटकडे पाठवेल.

लॉर्ड बर्कनहेड यांची अशी कल्पना होती की, भारतीय राजकीय संघटनांत व नेत्यांत एकमत होणे केवळ अशक्य आहे; परंतु त्याची कल्पना चुकीची ठरली. भारताने ते आव्हान स्वीकारले व काँग्रेस, मुस्लीम लीग, हिंदू महासभा इत्यादि राजकीय संघटनांची सर्वपक्षीय परिषद मुंबईत डॉ. अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली 19 मे 1928 रोजी भरविण्यात आली.

भारताची भावी घटना कोणत्या तत्वानुसार निर्माण व्हावी हे ठरविण्यासाठी परिषदेने पं. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली. या समितीत सर तेजबहादूर सप्रू, सर अली इमाम, बापूसाहेब अणे, सुभाषचंद्र बोस इत्यादि व्यक्ती घेण्यात आल्या.

समितीने मोठ्या परिश्रमाने देशातील राजकीय व घटनात्मक समस्यांचा अभ्यास व चर्चा करून आपला अहवाल तयार केला. समितीने मध्यबिंदू गाठला. साम्राज्यांतर्गत स्वराज्य भारताला लगेच मिळावे व नंतर लगेच दुसरी पायरी पूर्ण स्वातंत्र्यांची असावी असे समितीने निश्चित केले.

नेहरू रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी कलकत्ता येथे सर्वपक्षीय सभा भरली (डिसेंबर 1928). मुस्लीम लीगच्या वतीने बॅ. जीनांनी अनेक दुरुस्त्या मांडल्या, जवळ-जवळ त्या सर्व फेटाळण्यात आल्या. मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या हक्कावर पानी सोडण्यास मुस्लीम लीग तयार नव्हती.

केंद्रात व प्रांतात तिला पुरेसे प्रतिनिधीत्व जातीय पायावर हवे होते. मार्च 1929 मध्ये लीगने अधिवेशन भरवून त्यात काही अटींवर नेहरू रिपोर्ट स्वीकारण्यात आला. खुद्द काँग्रेसमध्येही नेहरू रिपोर्टवर मोठा वाद झाला. पं. जवाहरलाल व सुभाषचंद्र बोस यांनी ‘संपूर्ण स्वातंत्र्य’ या ताबडतोबीच्या ध्येयाचा आग्रह धरला.

महात्माजींनी मध्यस्थी करून काँग्रेसला एकमताने नेहरू रिपोर्टचा स्वीकार करावयास लावला आणि त्याची अंमलबजावणी सरकारने 1929 हे वर्ष संपण्यापूर्वी करावी, असा ठराव पास करून घेतला. त्यामुळे जवाहरलाल व बोस यांच्या सारखे तरुण नेते थोडे शांत झाले. गांधीजी पुन्हा आता राजकारणाकडे वळले. एका वर्षाच्या अवधीत साम्राज्यांतर्गत स्वराज्य न मिळाल्यास ते स्वातंत्र्य आंदोलन उभारणार होते.

Читать полностью…

MPSC History

🌸डॉ बाबासाहेब आंबेडकर🌸

Читать полностью…

MPSC History

🌸डॉ बाबासाहेब आंबेडकर🌸

Читать полностью…

MPSC History

Video : विडिओ

विषय: इतिहास

घटक- भारतीय स्वातंत्र्य चळवळ - शेवटचा टप्पा ( मराठी मधून )
- अविनाश धर्माधिकारी सर
----------------------------------------------
आणखी मटेरियल साठी जॉईन करा @MPSCMaterial

Читать полностью…

MPSC History

797 : 1 798 : 3

Читать полностью…

MPSC History

📚 YCMOU Books 📚

HIS 220 आधुनिक महाराष्ट्राचा/भारताचा इतिहास

आगामी राज्यसेवा / PSI / STI पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे पुस्तक , प्रत्येकाने वाचाच.

Join us @MPSCMaterial

Читать полностью…

MPSC History

दादाभाई अजरामर झाले ते ‘पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया’ या ग्रंथामुळे. इंग्रजी राज्याला दैवी वरदान समजण्याच्या कालखंडात आपल्या अवनतीला आणि शोषणाला ब्रिटिशच कसे जबाबदार आहेत, हे दादाभाईंनी या ग्रंथात दाखवून दिले. या ग्रंथात त्यांनी दारिद्रय, भारताचे राष्ट्रीय उत्पन्न, करनीती, भारताचे आर्थिक शोषण याबद्दल सविस्तर विवेचन केले आहे. त्यांनी हे दाखवून दिले की, वार्षिक उत्पन्न (दरडोई) वीस रुपये, तर राहणीचा वार्षिक खर्च ३४ (चौतीस) रुपये आहे. यामुळे भारतीयांना जीवनावश्यक गरजासुद्धा भागवता येत नाहीत. सैन्य, रेल्वे, ब्रिटिशांचे पगार, भत्ते यांवरच्या खर्चामुळे भारत मेटाकुटीला आला आहे. ब्रिटिश प्रशासन पद्धती अंतिमत: कशी सर्वानाच घातक आहे, हेही त्यांनी दाखवून दिले. भारतातील करांचा पैसा भारतात राहिला असता तर भारताचे एक वेळ भले झाले असते, परंतु हा कराचा पैसा इंग्लंडमध्ये नेल्याने जी अवस्था झाली, ती भीषण आहे. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची आणि त्यामधील विविध विभागांच्या वाटय़ांची गणती करणारे ते पहिले भारतीय होत. ‘इंडियन इकॉनॉमिस्ट’ या समकालीन नियतकालिकावर त्यांनी आकडेवारीच्या अपूर्णतेसंदर्भात टीका केली. पुढे अर्थशास्त्रज्ञांनी दादाभाईंच्या मोजणी पद्धतीवर, प्रत्यक्ष शेती-उद्योगात व व्यवसायात किती माणसे गुंतली आहेत याचा विचार न करणे, देशाच्या एकूण उत्पादनातून विविध प्रकारच्या सेवांचे उत्पादन वगळणे यावर टीका केली. अर्थात, असे असले तरी ग्रंथातील हा अपुरेपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला उणेपणा आणत नाही.

Читать полностью…

MPSC History

1. यूरोपियन – कोलंबस

राष्ट्र – स्पेन

वर्ष – 1493

वखारी – त्याने वेस्ट इंडिज बेटाचा शोध लावला.

2. यूरोपियन – वास्को-डी-गामा

राष्ट्र – पोर्तुगल

वर्ष – 1498

वखारी – कलिकत (भारतात येणारा पहिला यूरोपियन)

3. यूरोपियन – कॅप्टन हॉकीन्स

राष्ट्र – ब्रिटिश

वर्ष – 1607

कंपनी – ईस्ट इंडिया कंपनी

वखारी – पहिली वखार सूरत येथे स्थापन केली.

4. यूरोपियन – हृहृ

राष्ट्र – डच

वर्ष – 1602

कंपनी – युनायटेड ईस्ट इंडिया

वखारी – सूरत, मच्छलीपट्टणम, नागपट्टणम, वेगूर्ला

5. यूरोपियन – हृहृ

राष्ट्र – फ्रेंच

वर्ष – 1664

कंपनी – फ्रेंच ईस्ट इंडिया

वखारी – सूरत, मच्छलीपट्टणम, पोंडेचेरी, चंद्रनगर, कोरोमंडल इत्यादि ठिकाणी आपल्या वखारी स्थापन केल्या.

Читать полностью…

MPSC History

🌺🌺लाला लजपतराय🌺🌺

🌸लालाजींचा जन्म पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात धुंढिके गावात २८ जानेवरी १८६५ मध्ये झाला.

🌿लहानपाणापासूनच ते अत्यंत हुशार होते. अरबी, उर्दू अशा अनेक भाषांचे त्यांना सखोल ज्ञान होतं. एल्एल्‌. बी. ची पदवी मिळवलेले लालाजी अल्पकाळातच यशस्वी वकील म्हणून नावारुपास आले.

🌸 बाल विवाह, हुंडा यांना त्यांनी कडाडून विरोध केला. स्त्री शिक्षणाचे ते समर्थक होते. बंगालच्या विभाजनाला लालांजींनी तीव्र विरोध केला.
🌿सायमन कमिशनच्या निषेधार्थ मोठा जमाव लाहोरमध्ये जमला होता. ब्रिटीश पोलीस अधिकारी सांडर्स यांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्जचे आदेश दिले यात झालेल्या मारहाणीत लालाजी आजारी पडले आणि काही दिवसांत त्यांच्या मृत्यू झाला.

🌸एक महिन्यातच चंद्रशेखर आजाद, भगत सिंह, राजगुरु, सुखदेव यांनी लालाजींच्या हत्येचा बदला घेतला. ब्रिटींशांच्या सत्तेचा पाया खिळखिळा करण्यात लालाजींचा वाटाही तितकाच मोठा होता.


🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿

Читать полностью…

MPSC History

792 : 1 793 : 3

794 : 2 795 : 4

796 : 1

Читать полностью…

MPSC History

🌺महात्मा फुले🌺

Читать полностью…

MPSC History

मकाजादरम्यान, काँग्रेस पक्षाशी संबंधित व्यवहाराकडेही त्यांनी लक्ष दिले आणि त्यात भरीव योगदानही दिले. 1952, 1957 आणि 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकांमधील पक्षाच्या निर्णायक आणि जबरदस्त यशामध्ये त्यांचे संघटनात्मक कौशल्य आणि एखाद्या गोष्टीची जवळून पारखण्याची त्यांची क्षमता यांचे मोठे योगदान होते.

तीसहून अधिक वर्षे आपल्या समर्पित सेवेदरम्यान लाल बहादूर शास्त्री निष्ठा, क्षमतेसाठी जनमानसांत लोकप्रिय झाले. नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी लोकांची भावना समजून घेणारे खऱ्या अर्थाने त्यांचे मित्र बनले. त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. लाल बहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता. आपले गुरु महात्मा गांधीच्या शैलीत ते एकदा म्हणाले. “कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे.” महात्मा गांधी यांची परंपरा कायम राखणारे लाल बहादूर शास्त्री यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले

Читать полностью…

MPSC History

🌺विजयालक्ष्मी पंडित🌺

Читать полностью…

MPSC History

✳️महात्मा फुले✳️

Читать полностью…

MPSC History

🌺🌺नेहरू रिपोर्ट : शिफारशी🌺🌺

भारताला साम्राज्यांतर्गत स्वराज्य लगेच मिळावे, तद्नंतर पूर्ण स्वातंत्र्य हेच भारताचे ध्येय राहील.

भारत संघराज्यात्मक राज्य असेल. प्रांतांना आवश्यक तेवढी स्वायत्ताता मिळेल. प्रांतांना फक्त एकच कायदेमंडळ असावे. राज्यकारभाराच्या विषयांची वाटणी केंद्र व प्रांत यांच्यात व्हावी.

भारत हे निधर्मी राष्ट्र असेल व ते जातीय समस्या समाधानकारक सोडवेल. अल्पसंख्याकांच्या संस्कृतीचे व राजकीय हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे. परंतु त्यासाठी जातीय मतदारसंघाची आवश्यकता नाही. अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा असाव्यात, परंतु स्वतंत्र मतदारसंघ नसावेत.

सिंध हा स्वतंत्र प्रांत करावा. वायव्य सरहद्द प्रांताला इतर प्रांतांसारखा दर्जा द्यावा.

जगातील इतर लोकांप्रमाणेच भारतीय लोकांनाही जन्मत:च स्वतंत्र्य व मूलभूत हक्क प्राप्त झालेले असून घटनेत त्यांचा समावेश झाला पाहिजे. (अहवालात 19 मूलभूत हक्कांची यादी देण्यात आलेले होती.)

इंग्लंडचा राजा व कायदेमंडळाची दोन गृहे यांची मिळून भारतीय पार्लमेंट तयार होईल. प्रांतांचे प्रतिनिधी वरिष्ठगृहात बसतील तर कनिष्ठगृहातील प्रतिनिधी हे प्रौढ मतदान पद्धतीने लोकांनी निवडून दिलेले असतील.

आता सध्या भारतीय संस्थानांवर ब्रिटिश सरकारचे जसे अधिकार चालतात तसेच भारतीय पार्लमेंटचे अधिकार त्यांच्यावर चालतील. काही संघर्ष पैदा झाल्यास गव्हर्नर जनरल सुप्रीम कोर्टाकडे तो तंटा सोपवेल.

गव्हर्नर जनरलने प्रधानमंत्र्यांची निवड करावी व त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करावी. गव्हर्नर जनरलने मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने कारभार करावा. मंत्रिमंडळ हे पार्लमेंटला जबाबदार असेल.

प्रांतांच्या गव्हर्नरांची नियुक्ती इंग्लंडच्या राजाकडून होईल. गव्हर्नरांनी मुख्यमंत्र्यांची निवड करावी. त्यांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळ तयार करावे. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने गव्हर्नराने कारभार करावा. प्रांतीय कायदेमंडळाची मुदत पाच वर्ष असावी व ती वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार गव्हर्नराला असावा.

गव्हर्नर जनरलने सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करावी. त्यांना दूर करण्याचा हक्क फक्त पार्लमेंटलाच असावा.

प्रधानमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, सरसेनापती इत्यादींची संरक्षण समिती गव्हर्नर जनरलने नेमावी. देशाच्या संरक्षणाविषयी त्या समितीने गव्हर्नर जनरलला सल्ला द्यावा.

Читать полностью…

MPSC History

eMPSCkatta च्या अपडेट्स इन्स्टाग्रामवर मिळवण्यासाठी खालील लिंक वरून eMPSCkatta ला इन्स्टाग्रामवर फॉल्लो करा : https://www.instagram.com/eMPSCkatta

Читать полностью…

MPSC History

784 : 2 785 : 1

786 : 4 787 : 2

788 : 1 789 ; 1

790 : 2 791 : 1

Читать полностью…

MPSC History

🔷🔷बाबासाहेबांच्या कार्याबद्दल फारशा चर्चिल्या न गेलेल्या गोष्टी : 🔷🔷


दुसऱ्या महायुद्धानंतर भारताची आर्थिक घडी बसवण्यात बाबासाहेबांचे मोठे योगदान होते. त्यासाठी नेमलेल्या रिकन्स्ट्रक्शन कमिटी ऑफ काऊन्सिलचे (आरसीसी) सदस्य होते. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्यावर सिंचन आणि विजेच्या प्रश्नांबाबत जबाबदारी सोपवली होती., ‘दामोदर नदी खोरे’ आणि ‘सोने नदी खोरे’ प्रकल्प तसेच देशातील सर्वात मोठ्या ‘हिराकुड धरण’ प्रकल्पाचे काम बाबासाहेबांच्या अखत्यारित झाले.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)च्या स्थापनेत बाबासाहेबांचा मोठा वाटा होता. ‘जय भीम’ या घोषणेनंतर देशात ‘जय हिंद’ ही घोषणा सुरु झाली.

🔷🌸🔷🌸🔷🌸🔷🌸🔷🌸🔷🌸🔷

Читать полностью…
Subscribe to a channel