अदृश्य/ प्रच्छन्न बेरोजगारी (Disguised Unemployment) –
आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून एखादे काम जेवढे व्यक्ती करू शकतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या कामात गुंतलेले असल्यास ते जास्तीचे व्यक्ती अदृश्यपणे/प्रच्छन्नपणे बेरोजगार आहेत असे म्हटले जाते.
उदा. शेतीचे एक क्षेत्र जर एक व्यक्ती आपल्या क्षमतेचा वापर करून पिकवू शकतो तर त्याऐवजी 4-5 लोक तेथे काम करीत असल्यास ते प्रच्छन्नपणे बेरोजगार असतात.
सकृतदर्शनी या व्यक्तींचे काम उत्पादक स्वरूपाचे मुळीच नसते.
म्हणजेच त्यांची सीमान्त उत्पादकता (Marginal Productivity) शून्य किंवा नाममात्र असते.
कारण अशा व्यक्तींना व्यासायातून बाजूला सारले तरी त्यामुळे उत्पादनाच्या पातळीवर मुळीच विपरीत परिणाम होत नाही.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
मध्यवर्ती वस्तू –
एका उद्योगाने पुनर्विक्रीसाठी खरेदी केलेल्या वस्तूंना मध्यवर्ती वस्तू म्हणतात.
अंतिम वस्तु –
ज्या वस्तूची खरेदी अंतिम उपभोगासाठी केली जाते अशा वस्तूंना अंतिम वस्तू असे म्हणतात. राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करताना केवळ अंतिम वस्तू व सेवा यांच्या किमतीचेच मोजमाप केले जाते.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
उत्पन्न –
अर्थशास्त्रीय भाषेत राष्ट्रीय उत्पन्न विविध स्रोतांमधून येते. त्यामध्ये वेतन, व्याज, नफा अशा गोष्टींचा समावेश होतो. काही प्रकारच्या उत्पन्नात कष्ट करावे लागतात.तर काही प्रकारचे उत्पन्न मिळवण्यास कष्ट करावे लागत नाही. उदा. व्याज, देणग्या इ.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
फिंडले शिरास
१९११ मध्ये राष्ट्रीय उत्पन्न १९४२ कोटी तर दरडोई उत्पन्न ८० रु.
व्ही. के. आर. व्ही. राव
सर्वप्रथम वैज्ञानिक पध्दतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप
स्वातंञ्यपूर्व राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप
दादाभाई नौरोजी
राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न.
अर्थव्यवस्थेचे कृषी व बिगर कृषी क्षेञ असे विभाजन.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय
स्थापना – १९५० मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण म्हणून
१९७० मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना म्हणून पुनर्रचना
NSSO मार्फत १. घरगुती सर्वेक्षण २. उपक्रम सर्वेक्षण ३. ग्राम सुविधा ४. भूमी व पशुधन धारणा या चार प्रकारची सर्वेक्षणे करण्यात येतात.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
राष्ट्रीय उत्पन्न
राष्ट्रीय उत्पन्न सामान्यत: विशिष्ट कालावधीत (सामान्यत: एक वर्ष) देशात उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य म्हणून परिभाषित केले जाते.
खालील राष्ट्रीय
उत्पन्नाचे उपाय आहेत- (A) GDP (एकूण देशांतर्गत उत्पादन)
(B) GNP (एकूण राष्ट्रीय उत्पादन)
(C) NNP (Net National Product)
(D) PI (वैयक्तिक उत्पन्न)
(E) DPI (डिस्पोजेबल वैयक्तिक उत्पन्न)
🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
संघटित बँक व्यवसाय
संघटित क्षेत्र हे RBI च्या नियंत्रणाखाली असून त्यात सार्वजनिक क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातील, सहकारी क्षेत्रातील तसेच, परकीय बँकांचा समावेश होतो.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
भारतीय भांडवल बाजार –
वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात मध्यम तसेच दीर्घकालीन निधींची देवाण-घेवाण होते, त्याला भांडवल बाजार असे म्हणतात.
भांडवल बाजारात 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीचे कर्ज व्यवहार होतात. साधारणत: 5 वर्षापर्यंतच्या कालावधीला मध्यमकालीन तर त्यापेक्षा जास्त 20-25 वर्षापर्यंतच्या कालावधीला दीर्घ-कालीन समजले जाते.
भारतीय भांडवल बाजारात वित्त पुरवठा करणार्या व इतर वित्तीय सेवा प्रदान करणार्या संस्थांमध्ये खालील संस्थांचा समावेश होतो.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
भारतीय वित्तीय व्यवस्था
कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास त्या देशातील वित्तीय व्यवस्थेच्या विकासावर अवलंबून असतो.
विकसित अर्थव्यवस्थेतील वित्तीय व्यवस्था विकसित असते. उलटपक्षी, वित्तीय व्यवस्था न्यूनविकसित असल्यास अर्थव्यवस्थेच्या विकास प्रक्रियेस मर्यादा येतात.
अर्थ – व्यापक दृष्टीने, वित्त म्हणजे कर्जाने दिला-घेतला जाणारा पैसा होय. अशा वित्ताची गरज व्यक्ती, कुटुंबे, व्यापारी, व्यावसायिक, उद्योगपती, शेतकरी तसेच, विविध सरकारे इत्यादींना असते.
उदा. व्यक्ती व कुटुंबांना वित्ताची गरज दैनंदिन गरजा भागविण्यासाठी तसेच गृह बांधणीसाठी असते.
व्यापार्यांना वित्ताची गरज आपला माल विकत घेण्यासाठी तसेच, साठवण्यासाठी असते. तर, उद्योगपतींना आपल्या स्थिर व खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी वित्त आवश्यक असते.
सरकारला सुद्धा आपला चालू खर्च भागविण्यासाठी विकासात्मक कार्यासाठी तसेच, युद्धसज्जतेसाठी पैशाची आवश्यकता असते.
अशा विविध कारणांसाठी वापरण्यात येणार्या वित्ताच्या देवाणघेवाणीतून निर्माण होणार्या व्यवस्थेस ‘वित्तीय व्यवस्था’ (Financial System) असे म्हणतात.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
शाखांच्या संख्येनुसार या बँकांचा क्रम पुढीलप्रमाणे –
बँक ऑफ बडोदाच्या 20 देशांमध्ये मिळून सर्वाधिक म्हणजे 46 शाखांसहित 59 परकीय कार्यालये आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 29 देशांमध्ये मिळून 42 शाखांसहित 59 परकीय कार्यालये आहेत.
बँक ऑफ इंडियाच्या 14 देशांमध्ये मिळून 24 शाखांसहित 33 परकीय कार्यालये आहेत. जगातील देशांनुसार भारतीय बँकांच्या सार्वधिक म्हणजे शाखा U.K. मध्ये तर त्याखालोखाल शाखा फिजी या देशामध्ये आहे.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
परकीय व्यापारी बँका –
भारतात ब्रिटिश कालावधीपासून परकीय बँका कार्यरत होत्या. 1993 मध्ये बँकिंग व्यवसायावरील नियंत्रण शिथिल करण्यात आल्यानंतर बर्याच परकीय बँकांनी भारतात प्रवेश केला.
नवीन धोरणानुसार परकीय बँकेला भारतात पहिली शाखा काढण्यासाठी किमान 1 कोटी डॉलर्स ($10 Million) भारतात आणावे लागतात. दुसरी व तिसरी शाखा काढण्यासाठी अनुक्रमे 1 कोटी डॉलर्स व 0.5 कोटी डॉलर्स आणावे लागतात.
भारतात फेब्रुवारी, 2013 मध्ये 24 देशातील 34 परकीय बँका आपल्या 315 शाखांसहित कार्य करीत होत्या. सध्या स्टँडर्ड चार्टड या इंग्लंडच्या बँकेच्या सर्वाधिक शाखा भारतात आहेत. त्याखालोखाल HSBC बँक व सिटी बँक यांचा नंबर लागतो. इतर बँकांच्या 10 पेक्षाही कमी शाखा आहेत. परकीय बँकांची एकही शाखा ग्रामीण भागात नाही.
2010 अखेर इंडस्ट्रियल कमर्शियल बँक ऑफ चायना (ICBC) या चीनी बँकेने मुंबईत शाखा काढण्याचा निर्णय घेतला. शाखांच्या संख्येच्या बाबतीत या बँकेचा जगात पहिला क्रमांक लागतो. त्याखालोखाल भारतीय स्टेट बँकेचा दूसरा क्रमांक लागतो.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
जागतिक स्तरावरील विकासाचे निर्देशांक –
जगातील विविध देशातील मानवी विकासात अंतर मोजण्यासाठी विविध निर्देशांकाची रचना केली आहे ही रचना संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP)ने केली आहे. UNDP मार्फत दरवर्षी मानव विकास निर्देशांक जाहीर केला जातो.
🌸🌸🍀🍀🌸🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀🌸
बेरोजगारी (Unemployment) :
अर्थ: रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल.
रोजगार मिळविण्यासाठी उत्सुक असलेली ही व्यक्ती त्यासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या समर्थ असावी, तिची काम करण्याची इच्छा असावी, तसेच समाजातील प्रचलित वेतन दरावर काम करण्याची तिची इच्छा असावी.
या तिन्ही अटी पूर्ण करण्यात व रोजगार मिळविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केल्यानंतरही रोजगार न मिळालेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
राष्ट्रीय –
राष्ट्रीय म्हणजे एकतर क्षेत्राबाबत संदर्भ दिला जातो.किंवा नागरिकांच्याबाबत त्यांच्या अदिवासाच्या किंवा नागरिकत्वाबाबत वापरला जातो.
भारताच्या नागरीकांचा निवास व देशाचे आर्थिक क्षेत्र यांचा एकत्रित विचार करून उत्पन्नाचे मोजमाप करणे याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणता येऊ शकते.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
आर. सी. देसाई.
१९३०-३१ साठी राष्ट्रीय उत्पन्न २८०१ व दरडोई उत्पन्न ७२ रु.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
१९६७-६८ मध्ये राष्ट्रीय उत्पन्न ३४० कोटी तर दरडोई उत्पन्न २० रु.
वैज्ञानिक पध्दत मानली गेली नाही.
विल्यम डिग्बी
१९९७-९८ मध्ये राष्ट्रीय उत्पन्न ३९० कोटी तर दरडोई उत्पन्न १७ रु.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय
स्थापना – १९५० मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण म्हणून
१९७० मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना म्हणून पुनर्रचना
NSSO मार्फत १. घरगुती सर्वेक्षण २. उपक्रम सर्वेक्षण ३. ग्राम सुविधा ४. भूमी व पशुधन धारणा या चार प्रकारची सर्वेक्षणे करण्यात येतात.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
स्वतंञ भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमापे
राष्ट्रीय उत्पन्न समिती
स्थापना – ४ आॅगस्ट १९४९
अध्यक्ष – पी. सी. महालनोब्रिस
सदस्य – डी. आर. गाडगीळ, व्ही. के. आर. व्ही. राव
अहवाल सादर – पहिला १९५१ मध्ये व अंतिम १९५४ मध्ये
या समितीने शिफारस केल्यानुसार १९५० मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण तर १९५४ मध्ये केंद्रीय सांख्यिकीय संघटना यांची स्थापना करण्यात आली.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
भारतीय बँक व्यवसायाची रचना –
भारतीय बँक-व्यवसायाचे वर्गीकरण खालील दोन भागांमध्ये करण्यात येते.
1. असंघटित बँक व्यवसाय
यामध्ये सावकार व सराफी पेढीवाले यांचा समावेश होतो.
उदा. भारतात पूर्वीपासून कर्ज व्यवहार करणारे महाजन, सेठ, श्रेष्ठ, शेट्टी, चेट्टियार, सराफ इ.
RBI ने सावकार व सराफ पेढीवाल्यांना संघटित क्षेत्रात आणण्याचे बरेच प्रयत्न केले असतांना सुद्धा ते या क्षेत्राचा पूर्ण हिस्सा बनू शकले नाही.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
भारतीय वित्तीय व्यवस्थेची रचना –
वित्ताच्या कालावधीनुसार भारतीय वित्तीय व्यवस्थेचे दोन भाग पडतात.
1. भारतीय नाणे बाजार –
वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात अल्पकालीन निधींची देवाण-घेवाण होते, त्याला नाणे बाजार असे म्हणतात.
नाणे बाजारात कर्ज व्यवहार 1 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी होतात. मात्र, कृषीसाठी हा अल्प कालावधी 15 ते 18 महिन्यांपर्यंतचा असू शकतो.
भारताच्या नाणे बाजारात असंघटित क्षेत्राचा तसेच, संघटित क्षेत्राचा समावेश होतो.
असंघटित क्षेत्रात सावकार, सराफी पेढीवाले तसेच, बँकेतर वित्तीय संस्थांचा समावेश होतो.
संघटित क्षेत्रात व्यापारी बँकांचा समावेश होतो. त्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातील, सहकारी क्षेत्रातील तसेच, परकीय बँकांचा समावेश होतो.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
शाखांच्या संख्येनुसार या बँकांचा क्रम पुढीलप्रमाणे –
बँक ऑफ बडोदाच्या 20 देशांमध्ये मिळून सर्वाधिक म्हणजे 46 शाखांसहित 59 परकीय कार्यालये आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 29 देशांमध्ये मिळून 42 शाखांसहित 59 परकीय कार्यालये आहेत.
बँक ऑफ इंडियाच्या 14 देशांमध्ये मिळून 24 शाखांसहित 33 परकीय कार्यालये आहेत. जगातील देशांनुसार भारतीय बँकांच्या सार्वधिक म्हणजे शाखा U.K. मध्ये तर त्याखालोखाल शाखा फिजी या देशामध्ये आहे.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
परदेशात कार्य करणार्या भारतीय बँका :
सप्टेंबर 2011 मध्ये 22 भारतीय बँका (16 सार्वजनिक क्षेत्रातील व 6 खाजगी क्षेत्रातील) परदेशातील कार्य करीत होत्या. अशारितीने या भारतीय बँका 47 देशांमध्ये कार्य करीत आहेत.
त्यांची एकूण 233 परकीय कार्यालयाचे असून त्यांमध्ये 148 शाखा, 7 संयुक्त उद्योग, 23 संलग्न संस्था आणि 55 प्रातिनिधीक कार्यालये यांचा समावेश आहे.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
मानव विकास निर्देशांक (Human Development Index) – मानव विकास अहवाल 1990 मध्ये यू.एन.डी.पी. ने पहिल्यांदाच जाहीर केला. मानव विकास निर्देशांकाची संकल्पना महबुब उल हक आणि अमर्त्य सेन यांची होती. महबुब उल हक यांना मानव विकास निर्देशांकाचे जनक म्हणून ओळखले जाते.
पुढील तीन निकषांच्या आधारे मानव विकास निर्देशांक काढला जातो. आरोग्य, शिक्षण, जीवनमानाचा दर्जा.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
विकासाचे सामाजिक निर्देशक –
1) शिक्षण विषयक निर्देशक – देशातील शिक्षणाचा दर्जा शिक्षणाची सुगमता, एकूण साक्षरता दर, यामध्ये स्त्री साक्षरता पुरुष साक्षरता, शालेय गळतीचे प्रमाण कमी असणे, यासारख्या घटकांचा अभ्यास करून शिक्षण विषयक निर्देशांक मांडला जातो. शिक्षण विषयक निर्देशांक हा एक सामाजिक विकासाचा निर्देशांक समजला जातो.
2) आरोग्यविषयक निर्देशांक- पोषण दर्जा स्वच्छतेची स्थिती जन्माच्या वेळचे आयुर्मान अर्भक मृत्युदर बालमृत्यूदर माता मृत्यू दर यांच्या स्थितीवरून आरोग्यविषयक निर्देशांक समजतो. देशातील जनतेची आरोग्यविषयक स्थिती सामाजिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.
3) लोकसंख्येच्या वाढीचा दर – आर्थिक विकास व लोकसंख्या वाढीचा दर यांचा परस्पर संबंध खूप महत्त्वाचा असतो कमी विकसित समाजात लोकसंख्या वाढीचा दर अधिक असतो. वाढत्या लोकसंख्येमुळे वितरण व्यवस्थेवर ताण निर्माण होऊन त्याचा परिणाम आर्थिक विकासावर होतो पर्यायाने सामाजिक विकासावर देखील होतोच.
🍀🍀🍀🍀☘☘☘☘☘☘☘☘☘