eMPSCkatta च्या अपडेट्स इन्स्टाग्रामवर मिळवण्यासाठी खालील लिंक वरून eMPSCkatta ला इन्स्टाग्रामवर फॉल्लो करा : https://www.instagram.com/eMPSCkatta
Читать полностью…जागतिक स्तरावरील विकासाचे निर्देशांक –
जागतिक स्तरावर ‘संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम’ (UNDP) ने विविध निर्देशांकांची रचना केली आहे. त्या आधारे देशांची तुलना करणे शक्य झाले आहे.
यु.एन.डी.पी. मार्फत दरवर्षी ‘मानव विकास अहवाल’ (Human Development Report) जाहीर केला जातो. या अहवालात विविध देशांसाठी पुढील 4 प्रमुख निर्देशांकांची गणना केली जाते.
1) मानव विकास निर्देशांक,
2) असमानता-समायोजित मानव विकास निर्देशांक
3) जेंडर असमानता निर्देशांक, आणि
4) बहुआयामी दारिद्रय निर्देशांक
🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
विकासाचे सामाजिक निर्देशक (Social indicators) –
शिक्षण व आरोग्य हे मनवी विकासाचे महत्वाचे घटक आहेत. यावरून, विकासाचे महत्वाचे सामाजिक सूचक पुढीलप्रमाणे आहेत.
शिक्षणविषयक निर्देशक –
देशातील शैक्षणिक स्तर दर्शविण्यासाठी साक्षरता दर, विशेषत: महिलांची साक्षरता, विभिन्न वयोगटातील शाळकरी मुलांचे स्थूल व निव्वळ पटसंख्या प्रमाण (Drop out ratio,) विधार्थी-शिक्षक प्रमाण यांसारखे सूचक वापरले जातात.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
उत्पन्न व संपत्तीची समानता/ विषमता :
कोणत्याही देशात उत्पन्न व संपत्तीची पूर्ण समानता असणे शक्य नाही. यावरून उत्पन्न व संपत्तीच्या असमानतेचे प्रमाण मोजण्यासाठी लॉरेंझ वक्ररेषा व गिनी गुणांकाचा वापर केला जातो. लॉरेंझ वक्ररेषेवरुन काढलेला गिनी गुणांक जेवढा कमी तेवढे उत्पन्न/संपत्तीचे वितरण अधिक समान असते, तर याउलट गिनी गुणांक जेवढा जास्त तेवढे हे वितरण अधिक असमान असते.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
दर डोई उत्पन्न :
दर डोई उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न भगिले लोकसंख्या होय. म्हणजेच, एका व्यक्तिमागील राष्ट्रीय उत्पान्न होय. दरडोई उत्पन्न हा अधिक चांगला निर्देशक मनाला जातो, मात्र तो एक साधा सरासरी असतो, त्यातून उत्पन्नाचे खरे वितरण समजून येत नाही.
देशाचे दरडोई उत्पन्न जास्त असले तरी मात्र त्याचे व्यक्तिनिहाय वितरण अत्यंत असमान असू शकते.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
विकासाचे आर्थिक व सामाजिक निर्देशक (Economic and Social Indicators of Development) :
विकासाचे आर्थिक निर्देशक (Economic indicators)-
विकासाचे अंतिम उद्दिष्ट्य मानवी प्रगती आहे आणि हे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी आर्थिक वृद्धी हे एक महत्वाचे माध्यम आहे. त्यामुळे एखाधा देशाला झालेला किंवा होत असलेला आर्थिक विकास मोजण्यासाठी ज्या घटकांचा वापर केला जातो, त्यांना ‘विकासाचे आर्थिक निर्देशक’ असे म्हणतात. त्यामध्ये पुढील निर्देशकांचा/सूचकांचा समावेश होतो.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
महाराष्ट्र अराजपत्रित (गट 'ब' व गट 'क')
सेवा संयुक्त (Combine) पूर्व आणि मुख्य परीक्षा 2023साठी उपयुक्त संदर्भ...
गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 87 वी आवृत्ती के सागर
गट ब व गट क 2022 च्या पेपरसह
31 जानेवारी 2023 रोजी प्रकाशित
https://ksagar.com/product/gat-b-va-gat-c-sanyukt-purva-pariksha-combine/मानव विकास अहवाल 2021 /2022
जागतिक भूक निर्देशांक 2022
जागतिक शांतता निर्देशांक 2022
जागतिक विकास अहवाल 2022
लेटेस्ट सर्वे व रिपोर्ट 2022-2023
आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार रचना केलेले अचूक व पूर्णतः अभ्यासक्रमाला न्याय देणारे परीक्षाभिमुख संदर्भ
अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यासलेले व अनेक यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांच्या बुकलिस्टमधील यशस्वी संदर्भ
Pre booking start
जॉईन करा @MPSCMaterialKatta
आरोग्यविषयक निर्देशक –
शिक्षणातून प्राप्त केलेली कौशल्ये वापरण्याची क्षमता आरोग्याच्या स्तरावर अवलंबून असते. दीर्घ जीवनकाल (longevity) दर्शविणार्या निर्देशकांमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो: जन्माच्या वेळेचे आयुर्मान, अर्भक मृत्यू दर, बालमृत्यू दर, माता मृत्यू दर, पोषण दर्जा, स्वच्छतेची स्थिती इत्यादी.
लोकसंख्येच्या वाढीचा दर –
आर्थिक विकास न लोकसंख्येच्या वाढीचा दर यांत जवळचा संबंध असतो. पारंपरिक व न्यून-विकसित समाजात लोकसंख्येच्या वाढीचा दर उच्च असतो. लोकसंख्येचा वाढीचा दर जन्म दर, मृत्यू दर, जनन दर यांसारख्या दारांवरून ठरत असतो.
🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀
लिंगविषयक विकास निर्देशक –
महिलांच्या विकासाचा स्तर परिगणित करण्यासाठी लिंगविषयक विकास सूचक वापरले जातात. उदा. जेंडर असमानता निर्देशांक.
🍀🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀🌺
दारिद्रयाचा स्तर :
दारिद्रयाचा उच्च स्तर आर्थिक विकासाची कमतरता दर्शवितो. दरिद्रयाचा स्तर दारिद्रय रेषेने दर्शविला जातो. दारिद्रयाच्या स्तरावरून जीवनाच्या गुणवत्तेचा स्तर, उपासमार, कुपोषण, निरक्षरता व पर्यायाने मानवी विकास स्तराचा अंदाज येतो.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
उत्पन्न व संपत्तीची समानता/ विषमता :
कोणत्याही देशात उत्पन्न व संपत्तीची पूर्ण समानता असणे शक्य नाही. यावरून उत्पन्न व संपत्तीच्या असमानतेचे प्रमाण मोजण्यासाठी लॉरेंझ वक्ररेषा व गिनी गुणांकाचा वापर केला जातो. लॉरेंझ वक्ररेषेवरुन काढलेला गिनी गुणांक जेवढा कमी तेवढे उत्पन्न/संपत्तीचे वितरण अधिक समान असते, तर याउलट गिनी गुणांक जेवढा जास्त तेवढे हे वितरण अधिक असमान असते.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
राष्ट्रीय उत्पाद व उत्पन्न :
देशातील आर्थिक क्रियांचा स्तर मोजण्यासाठी राष्ट्रीय उत्पाद व राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली जाते. राष्ट्रीय उत्पाद बाजारभावला मोजले जाते, तर राष्ट्रीय उत्पन्न घटक किमातींना मोजले जाते.
केवळ वस्तू-सेवांच्या किंमतींमध्ये वाढ झाल्यानेही राष्ट्रीय उत्पाद वाढते. मात्र ही खरी वाढ नसते, म्हणून राष्ट्रीय उत्पाद चालू तसेच स्थिर किंमतींना मोजले जाते.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
मानव विकास निर्देशांक
जनतेची सुस्थिती (well-being) हे विकासाचे ध्येय असते. केवळ पैसा लोकांची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा अंगांनी सुस्थिती निर्माण करू शकत नाही. त्यामुळे संयुक्त राष्ट्राने (UN) ‘मानव विकास’ या संकल्पनेचा पुरस्कार केला आहे.
संयुक्त राष्ट्राने मानवी विकासाची व्याख्या ‘लोकांच्या निवडींच्या विस्ताराची प्रक्रिया’ (Process of enlarging people’s choices) अशी केली आहे.
मानवी विकासाच्या सर्वात महत्वाच्या घटकांमध्ये दीर्घ व आरोग्यावन जीवन, शिक्षण व उत्तम राहिणीमानाचा दर्जा, यांचा समावेश होतो. इतर निवडींमध्ये (choices) राजकीय स्वातंत्र्य, मानवी हक्कांची हमी आणि स्वावलंबन व आत्मप्रतिष्ठेचे विविध घटक, यांचा समावेश होतो. या अत्यावश्यक निवडी (essential choices) आहत, कारण त्यांच्या अभावी इतर अनेक संधीपासून वंचित रहावे लागू शकते, यावरून, मानवी विकास ही लोकांच्या निवडींच्या विस्ताराच्या प्रक्रियेबरोबरच सुस्थिती उंचवण्याचीही प्रक्रिया आहे.
म्हणून, विकास लोकांभोवती रचला पाहिजे, लोक विकासाच्या भोवती नाही. तसेच विकास हा सहभागायुक्त (participatory) असावा, आणि त्यासाठी लोकांना आपल्या क्षमातांमध्ये (आरोग्य, शिक्षण व प्रशिक्षणविषयक) सुधारणा करण्यासाठी गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध असाव्या. तसेच लोकांना आपल्या क्षमता वापरण्याच्याही संधी उपलब्ध असाव्या, त्यासाठी सामुदायिक निर्णयांमध्ये (community decisions) पूर्ण सहभाग घेता यावा आणि तसेच मानवी, आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्याचा लाभ प्राप्त व्हावा.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
महाराष्ट्र अराजपत्रित (गट 'ब' व गट 'क')
सेवा संयुक्त (Combine) पूर्व आणि मुख्य परीक्षा 2023साठी उपयुक्त संदर्भ...
गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 87 वी आवृत्ती के सागर
गट ब व गट क 2022 च्या पेपरसह
31 जानेवारी 2023 रोजी प्रकाशित
https://ksagar.com/product/gat-b-va-gat-c-sanyukt-purva-pariksha-combine/मानव विकास अहवाल 2021 /2022
जागतिक भूक निर्देशांक 2022
जागतिक शांतता निर्देशांक 2022
जागतिक विकास अहवाल 2022
लेटेस्ट सर्वे व रिपोर्ट 2022-2023
आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार रचना केलेले अचूक व पूर्णतः अभ्यासक्रमाला न्याय देणारे परीक्षाभिमुख संदर्भ
अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यासलेले व अनेक यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांच्या बुकलिस्टमधील यशस्वी संदर्भ
Pre booking start
जॉईन करा @MPSCMaterialKatta