प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष
प्रत्यक्ष करांच्या बाबतीत कराचा दर कितीही असला तरी वस्तू व सेवांच्या बाजारभावावर त्याचा परिणाम होत नाही. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना प्रत्यक्ष करांना विचारात घेणे आवश्यक नाही.
घटक किमतीला राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना अप्रत्यक्ष कर हे बाजारभावाला मोजलेल्या उत्पन्नातून वजा करावे लागतात. कारण अशा करांची गणना दोनदा होते. प्रथम ग्राहकांच्या उत्पन्नामध्ये(ग्राहक स्वतःच्या निव्वळ उत्पन्नातून अप्रत्यक्ष कर भरतात) व दुसऱ्यांदा सरकारच्या कर उत्पन्नात.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
देशाला परदेशातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे स्ञोत पुढीलप्रमाणे आहेत-
परकीय व्यापार (व्यापार तोल)– देशाच्या एकूण आयात व निर्यातीतून मिळणारे उत्पन्न धनात्मक किंवा ऋणात्मक असते. भारताच्या बाबतीत हे उत्पन्न नेहमीच ऋणात्मक राहिलेले आहे (२०००-२००३ या कालावधीचा अपवाद वगळता). याचे मुख्य कारण भारताकडून मोठ्या प्रमाणात होणारी तेलाची आयात हे आहे.
परकीय कर्जावरील व्याज – भारताने परकीय देशांना दिलेल्या कर्जावरील मिळणारे व्याजाचे उत्पन्न. माञ भारत हा निव्वळ कर्जबाजारी देश असल्याने भारत मोठ्या प्रमाणात व्याज परकीय देश/संस्थांना पाठवतो. त्यामुळे याबाबतीत भारताचे एकूण उत्पन्न हे नेहमीच ऋणात्मक राहिलेले आहे.
अनिवासी नागरिकांनी पाठविलेल्या रकमा- परदेशात काम करणाऱ्या भारतीय नागरिकांनी भारतात पाठविलेल्या रकमा हा एक परदेशातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक स्ञोत आहे. माञ यातून परकीय नागरिकांनी भारतातून परदेशात पाठविलेल्या रकमा वजा कराव्या लागतात. वजा करून राहिलेली रक्कम धनात्मक किंवा ऋणात्मक असू शकते. भारताच्या बाबतीत हा आकडा नेहमीच धनात्मक राहिला आहे. किंबहूना 2015 मध्ये भारत हा अनिवासी नागरिकांनी पाठविलेल्या रकमांच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर होता.
शेवटी या तिन्ही घटकांची बेरीज धनात्मक किंवा ऋणात्मक असू शकते. भारताच्या बाबतीत ही नेहमीच ऋणात्मक राहिली आहे. म्हणजेच भारताच्या बाबतीत-
स्थूल राष्ट्रीय उत्पाद = स्थूल देशांतर्गत उत्पाद + परदेशातून मिळालेले उत्पन्न
हे सूञ
स्थूल राष्ट्रीय उत्पाद = स्थूल देशांतर्गत उत्पाद + (-परदेशातून मिळालेले उत्पन्न)
असे बनते.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता संमती विकल्प सादर करण्याकरीता दि. २० ते ३० मे २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8914