◾️व्यवस्थापन
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कारभारावर मुख्य नियंत्रण हे बोर्ड ऑफ गव्हर्नर्स चे असते. प्रत्येक सभासद देशाचा एक गव्हर्नर व तसेच एक पर्यायी गव्हर्नर या मंडळावर घेण्यात येतो.गव्हर्नरांचे मंडळ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे धोरण ठरविणारी मुख्य चौकट असते साधारणतः वर्षातून एक वेळा या मंडळाची बैठक होते .या मंडळाद्वारे कार्यकारी संचालक मंडळाची निवड केली जाते. संचालक मंडळ वीस सदस्यांचे असते. व त्यापैकी चौदा निर्वाचित व सहा अधिकतम कोटा देणारे सदस्य असतात. रोजचे व्यवस्थापन संचालक मंडळाद्वारे चालते. संचालक मंडळातून एक व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवडला जातो.सभासद देशांना त्यांच्या कोट्याच्या प्रमाणात मताचा अधिकार दिलेला असतो. एकूण ८५ % मताधिक्याने धोरण बदलण्यात येते.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
◾️आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (इंग्लिश International Monetary Fund लघुरूप IMF, आयएमएफ) ही सदस्य राष्ट्रांना मुख्यतः विनिमय दरावर आणि देवघेवींच्या ताळेबंदावर प्रभाव टाकणार्या बृहत-अर्थशास्त्रीय धोरणांबाबत पाठपुरावा करावयास लावून जागतिक वित्तीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. आंतरराष्ट्रीय विनिमय दरांमध्ये स्थिरता आणणे आणि कर्जे, पुनर्रचना किंवा मदतीच्या मोबदल्यात इतर राष्ट्रांना आपली आर्थिक धोरणे अधिक उदार बनवावयास लावून विकास घडवून आणण्याचे घोषित ध्येय असणारी ही संस्था आहे. मुख्यतः गरीब राष्ट्रांना ती दीर्घमुदतीची कर्जे देते. तिचे मुख्यालय संयुक्त संस्थानातील वॉशिंग्टन, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलम्बिया इथे आहे.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
🔹विविध राज्यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या योजना
------------------------------------------------
राजश्री योजना : राजस्थान
कन्याश्री योजना : पश्चिम बंगाल
भाग्यलक्ष्मी योजना : कर्नाटक
लाडली लक्ष्मी योजना : मध्य प्रदेश
लाडली : दिल्ली व हरियाणा
मुख्यमंत्री लाडली योजना : उत्तर प्रदेश
मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना : बिहार
किशोरी शक्ति योजना : ओडिशा
ममता योजना : गोवा
सरस्वती योजना : छत्तीसगढ
माझी कन्या भाग्यश्री योजना : महाराष्ट्र
नंदा देवी कन्या योजना : उत्तराखंड
देशाला परदेशातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे स्ञोत पुढीलप्रमाणे आहेत-
परकीय व्यापार (व्यापार तोल)– देशाच्या एकूण आयात व निर्यातीतून मिळणारे उत्पन्न धनात्मक किंवा ऋणात्मक असते. भारताच्या बाबतीत हे उत्पन्न नेहमीच ऋणात्मक राहिलेले आहे (२०००-२००३ या कालावधीचा अपवाद वगळता). याचे मुख्य कारण भारताकडून मोठ्या प्रमाणात होणारी तेलाची आयात हे आहे.
परकीय कर्जावरील व्याज – भारताने परकीय देशांना दिलेल्या कर्जावरील मिळणारे व्याजाचे उत्पन्न. माञ भारत हा निव्वळ कर्जबाजारी देश असल्याने भारत मोठ्या प्रमाणात व्याज परकीय देश/संस्थांना पाठवतो. त्यामुळे याबाबतीत भारताचे एकूण उत्पन्न हे नेहमीच ऋणात्मक राहिलेले आहे.
अनिवासी नागरिकांनी पाठविलेल्या रकमा- परदेशात काम करणाऱ्या भारतीय नागरिकांनी भारतात पाठविलेल्या रकमा हा एक परदेशातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक स्ञोत आहे. माञ यातून परकीय नागरिकांनी भारतातून परदेशात पाठविलेल्या रकमा वजा कराव्या लागतात. वजा करून राहिलेली रक्कम धनात्मक किंवा ऋणात्मक असू शकते. भारताच्या बाबतीत हा आकडा नेहमीच धनात्मक राहिला आहे. किंबहूना 2015 मध्ये भारत हा अनिवासी नागरिकांनी पाठविलेल्या रकमांच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर होता.
शेवटी या तिन्ही घटकांची बेरीज धनात्मक किंवा ऋणात्मक असू शकते. भारताच्या बाबतीत ही नेहमीच ऋणात्मक राहिली आहे. म्हणजेच भारताच्या बाबतीत-
स्थूल राष्ट्रीय उत्पाद = स्थूल देशांतर्गत उत्पाद + परदेशातून मिळालेले उत्पन्न
हे सूञ
स्थूल राष्ट्रीय उत्पाद = स्थूल देशांतर्गत उत्पाद + (-परदेशातून मिळालेले उत्पन्न)
असे बनते.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
◾️आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पार्श्वभूमी
संपूर्ण जगात इ.स. १९२९ साली मंदीची लाट पसरली होती. त्यानंतर इ.स. १९३१ मध्ये इंग्लंडने सुवर्णचलन बंद केले. पुन्हा नंतर यात दुसऱ्या महायुद्धाचीही भर पडली. या तिन्ही घटनांचे विविध देशांच्या अर्थव्यवस्थेवर, चलनात्मक धोरणावर व आंतरराष्ट्रीय व्यापारावर विपरीत परिणाम घडून आले. अनेक देशांनी आपापले चलनविषयक वेगवेगळे धोरण सुरू केले. यामुळे संपूर्ण आंतरराष्ट्रीय व्यापार अडचणीत आला. अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडून पडली. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन लॉर्ड जे. एम. केन्स याने आंतरराष्ट्रीय सलोखा प्रस्थापित होण्यासाठी एक योजना सादर केली. या योजनेवर विचार करण्याससाठी अमेरिकेतील ब्रेटनवूड येथे जुलै इ.स. १९४४ मध्ये एक परिषद बोलाविण्यात आली. या परिषदेला ४४ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर परिषदेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (इंटरनॅशनल मॉनेटरी फंड) व आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण व विकास बॅंक (जागतिक बॅंक) स्थापण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना २७ डिसेंबर, इ.स. १९४५ रोजी झाली. व प्रत्यक्ष कामकाज १ मार्च, इ.स. १९४७ रोजी सुरू झाले.आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेणारा पहिला देश फ्रान्स होता , हळूहळू आंतरराष्टीय नाणेनिधीची सदस्यसंख्या वाढून १८९ झाली आहे. जे जागतिक बॅंकेचे सदस्य असतात ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचेही सदस्य असतात ,१२ एप्रिल २०१६ ला ' नौरू प्रजासत्ताक ' या देशाला सदस्यत्व मिळाल्यामुळे आंतरराष्टीय नाणेनिधीची सदस्यसंख्या १८९ झाली आहे .
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
🌹तिसरी पंचवार्षिक योजना 🌹
कालावधी:1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966
भर:-कृषी व मूलभूत उद्योग
1962 ला संरक्षण व विकास केला
प्रतिमान:-महालनोबिस व सुखमाय चक्रवर्ती
राजकीय घडामोडी:-
1962 भारत चीन युद्ध
1962 गोवा मुक्त
1963 नागालँड
योजना
1964-65:-सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम
1965:-कृषी मूल्य आयोग स्थापन
अद्यक्ष:-प्रो.दांतवाला
शिफारस:-एल के झा समिती
1965 भारतीय अन्न महामंडळ
1964 IDBI स्थापन
1964 UTI स्थापन
✍सर्वाधिक अपयशी योजना
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष
प्रत्यक्ष करांच्या बाबतीत कराचा दर कितीही असला तरी वस्तू व सेवांच्या बाजारभावावर त्याचा परिणाम होत नाही. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना प्रत्यक्ष करांना विचारात घेणे आवश्यक नाही.
घटक किमतीला राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना अप्रत्यक्ष कर हे बाजारभावाला मोजलेल्या उत्पन्नातून वजा करावे लागतात. कारण अशा करांची गणना दोनदा होते. प्रथम ग्राहकांच्या उत्पन्नामध्ये(ग्राहक स्वतःच्या निव्वळ उत्पन्नातून अप्रत्यक्ष कर भरतात) व दुसऱ्यांदा सरकारच्या कर उत्पन्नात.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹