221198
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi
मराठी म्हणी भाग
@marathi
अगं अगं म्हशी मला कोठे नेशी -
स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे.
आपला हात जगन्नाथ -
आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.
अति तेथे माती -
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.
आयत्या बिळात नागोबा -
दुसर्याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे.
आईजीच्या जीवावर बाईजी उदार -
दुसर्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे.
आपल्याच पोळीवर तूप ओढणे -
फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे.
आंधळे दळते कुत्रं पीठ खाते -
एकानं काम करावं आणि दुसर्यांनं त्याचा फायदा घ्यावा.
आधी पोटोबा मग विठ्ठोबा -
आदी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा.
अडला हरी गाढवाचे पाय धरी -
एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.
आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे -
अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.
अति शहाणा त्याचा बैल रिकामा -
जो माणूस फार शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही.
आधी शिदोरी मग जेजूरी -
आधी भोजन मग देवपूजा
असतील शिते तर जमतील भुते -
एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.
आचार भ्रष्टी सदा कष्टी -
ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो.
आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली -
अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती.
आईचा काळ बायकोचा मवाळ -
आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास -
मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
आपलेच दात आपलेच ओठ -
आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे.
अंथरूण पाहून पाय पसरावे -
आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
आवळा देऊन कोहळा काढणे -
क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.
आलीया भोगाशी असावे सादर -
कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे
अचाट खाणे मसणात जाणे -
खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो.
आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते -
अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते.
आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला -
ज्या दोषाबद्दल आपण दुसर्याला हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे.
आपला तो बाब्या दुसर्याचं ते कारटं -
स्वत:चे चांगले आणि दुसर्यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे.
अळी मिळी गुप चिळी -
रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे.
अहो रूपम अहो ध्वनी -
एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे.
🔰प्रास्ताविका भाग-1
✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
👤 Prof. Sagar Sir
🗓 दिनांक:- 12 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.
🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.
लिंक
https://youtu.be/L8i2HQmN0WM?si=SVdOLEysF9XwqBV9
https://youtu.be/L8i2HQmN0WM?si=SVdOLEysF9XwqBV9
========
🎯 Like, Share & Subscribe
🎯परीक्षेत हमखास विचारणारे पुस्तके 🎯
पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव
*प्लेईंग टू विन - सायना नेहवाल
*हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे
*टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख
*हाफ गर्लफ्रेंड- चेतन भगत
*प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर
*आय डेअर - किरण बेदी
*ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा
*इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद
*सनी डेज - सुनिल गावस्कर
*द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग
*झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्वास पाटील
*छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत
*श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई
*वाट तुडविताना - उत्तम कांबळे
*अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे
*एकच प्याला - राम गणेश गडकरी
*कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे
*यमुना पर्यटन - बाबा पद्मजी
*पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे
*सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर
*गिताई - विनोबा भावे
चल्या - लक्ष्मण गायकवाड
*उपरा - लक्ष्मण माने
*एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
*भिजली वही - अरूण कोल्हटकर
*नटसम्राट - वि.वा.शिरवाडकरमाझी जन्मठेप - वि.दा.सावरकर
*श्यामची आई - साने गुरूजी
*धग - उध्दव शेळके
*ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर
*एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्वास बेडेकर
*गोतावळा, झोंबी - आनंद यादव
*जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर
&ज्वाला आणि फुले - बाबा आमटे
*बलूतं - दया पवार
*बारोमास - सदानंद देशमुख
*आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे
*शाळा - मिलींद बोकील
*चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके
*बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर
गोलपीठा - नामदेव ढसाळ
जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल
*मी कसा झालो - प्र.के.अत्रे
*मी कसा घडलो - आर.आर.पाटील
*सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर
*ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील
*उनिकी - सी. विद्यासागर राव
*मुकुंदराज - विवेक सिंधू
*दासबोध, मनाचे श्लोक - समर्थ रामदास
*बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर -सावित्रीबाई फुले
*गीतारहस्य - लोकमान्य टिळक
*बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे
माझे विद्यापीठ, सनद, जाहिरनामा - नारायण सुर्वे
*फकिरा - अण्णाभाऊ साठे
*रामायण - वाल्मीकी
*मेघदूत - कालीदास
*पंचतंत्र - विष्णू शर्मा
*मालगुडी डेज - आर.के.नारायण
*माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी
*महाभारत - महर्षी व्यास
*अर्थशास्त्र - कौटील्य
*अन् हॅपी इंडीया - लाला लजपतराय
*माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी
*रोमान्सिंग विथ लाईफ - देव आनंद
*प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
*आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव
*दास कॅपीटल - कार्ल मार्क्स
*एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दालद.
*गाईड - आर.के.नारायण
*हॅम्लेट - शेक्सपिअर
*कर्हेचे पाणी - आचार्य अत्रे
*कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण
*ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी
*शतपत्रे - भाऊ महाजन
*प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण
*माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर
*निबंधमाला - विष्णुशास्त्री चिपळूणकर
*दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम
*स्पीड पोस्ट - शोभा डे
*पितृऋण - सुधा मूर्ती
*माझे गाव माझे तीर्थ - अण्णा हजारे
*एक गाव एक पानवटा - बाबा आढाव
*लज्जा - तस्लीमा नसरीन
*मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग
*कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ
*गोल्डन गर्ल - पी.टी.उषा
*राघव वेळ - नामदेव कांबळे
*आकाशासी जुळले नाते - जयंत नारळीकर
*गोईन - राणी बंग
*सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग
🌍 विज्ञान: पेशी
🪐 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
🌞 By Rutuja Kirtane
🗓 दिनांक:- 11 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.
🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.
लिंक
https://youtu.be/B21NfQ_legw?si=meB1-0yDEUfLJBju
========
🎯 Like, Share & Subscribe
🔹कवी, साहित्यिक व त्यांची टोपण नावे साहित्य
-------- -------- -------- -------- --------
१)यशवंत दिनकर पेंढारकर
------ यशवंत
२)मोरोपंत रामचंद्र पराडकर
-------- मोरोपंत
३)नारायण सूर्याजीपंत ठोसर
-------- रामदास
४)दत्तात्रय कोंडो घाटे
-------- दत्त
५)चिंतामण त्र्यंबक खानोलकर
---------आरती प्रभू
६)नारायण मुरलीधर गुप्त
-------- बी
७)गोपाल हरी देशमुख
-------- लोकहितवादी
८)शंकर काशिनाथ गर्गे
-------- दिवाकर
९)माधव त्रंबक पटवर्धन
-------- माधव जुलियन
१०)दिनकर गंगाधर केळकर
--------अज्ञातवासी
११)आम्ताराम रावजी देशपांडे
-------- अनिल
१२)कृष्णाजी केशव दामले
-------- केशवसुत
१३)सौदागर नागनाथ गोरे
-------- छोटा गंधर्व
१४)रघुनाथ चंदावरकर
-------- रघुनाथ पंडित
१५)हरिहर गुरुनाथ कुलकर्णी
-------- कुंजविहारी
१६)दासोपंत दिगंबर देशपांडे
-------- दासोपंत
१७)सेतू माधवराव पगडी
-------- कृष्णकुमार
१८)नारायण वामन टिळक
-------- रेव्हरंड टिळक
१९)माणिक शंकर गोडघाटे
-------- ग्रेस
२०)वसंत ना. मंगळवेढेकर
-------- राजा मंगळवेढेकर
-------- -------- -------- --------
२१)कृष्ण शास्त्री चिपळूणकर
-------- मराठीचे जॉन्सन
२२)केशवसुत-आधुनिक मराठी काव्याचे
-------- कवितेचे जनक
२३)बा.सी. मर्ढेकर
-------- -मराठी नवकाव्याचे/कवितेचे जनक, निसर्गप्रेमी
२४)सावित्रीबाई फुले
-------- आधुनिक मराठी कवितेच्या जननी
२५)संत सोयराबाई
-------- पहिली दलित संत कवयित्री
२६)त्रंबक बापुजी ठोंबरे
-------- बालकवी
२७)ना.धो.महानोर
-------- रानकवी
२८)यशवंत दिनकर पेंढारकर
-------- महाराष्ट्र कवी
२९)ना. चि. केळकर
-------- साहित्यसम्राट
३०)न. वा. केळकर
-------- मुलाफुलाचे कवीशिक्षक पात्रता परीक्षा उत्तरतालिकाउपलब्ध
३१)ग. त्र.माडखोलकर
-------- राजकीय कादंबरीकार
३२)शाहीर राम जोशी
-------- शाहिरांचा शाहीर
३३)दादोबा पांडुरंग तर्खडकर
-------- मराठी भाषेचे पाणिनी
३४)वि.वा. शिरवाडकर
-------- कुसुमाग्रज
३५)राम गणेश गडकरी
-------- गोविंदाग्रज/बाळकराम
३६)प्रल्हाद केशव अत्रे
-------- केशवकुमार
३७)काशिनाथ हरी मोदक
-------- माधवानुज
३८)विनायक जनार्दन करंदीकर
-------- विनायक
३९)विष्णुशास्त्री चिपळूणकर
-------- मराठी भाषेचे शिवाजी
-------- -------- -------- -------- --------
¶¶ काव्य ग्रंथ व कवी ¶¶
-------- -------- -------- -------- --------
१) यथार्थदीपिका - वामन पंडित
२)बिजली- वसंत बापट
३) दासबोध व मनाचे श्लोक -समर्थ रामदास
४)शिळ- ना. घ. देशपांडे
५)गीतरामायण- ग. दि. माडगुळकर
६)ज्वाला आणि फुले- बाबा आमटे.
७)स्वेदगंगा- वि.दा करंदीकर
८)भावार्थदीपिका-संत ज्ञानेश्वर
९)केकावली-मोरोपंत
१०)नलदमयंती स्वयंवराख्यान - रघुनाथ पंडित
११)अभंगगाथा- संत तुकाराम
१२)भावार्थ रामायण-संत एकनाथ
१३)महाभारत-व्यासमुनी
१४)गीता- व्यासमुनी
१५)मुद्राराक्षस- विशाखादत्त
१६)मृच्छकटिका- शूद्रक
_________________________________
जॉईन करा @Marathi
_________________________________
🔹काही समानार्थी म्हणी
आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा
आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले
साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच
कामा पुरता मामा - ताकापुरती आजी
काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी
खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे
खाण तशी माती - बाप तसा बेटा
आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू
गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून
काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे
घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच
चोरावर मोर - शेरास सव्वाशेर
जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम
पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस
नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा
बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला
पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला
वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण
---------------------------------------------
आमचे मराठी व्याकरण चॅनेल जॉईन करण्यासाठी @Marathi येथे क्लिक करा , त्यानंतर चॅनेल ओपन होईल , चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा.
telegram.me/Marathi
🔹शुद्ध शब्द:
अशुद्ध शब्द - शुद्ध शब्द
1) तरून - तरुण
2) तांत्रीक - तांत्रिक
3) तरका - तारका
4) बंकेश्वर - त्र्यंबकेश्वर
5) थाठ - थाट
6) थेरला - थोरला
7) दिर्घ - दीर्घ
8) दाण - दान
9) दागीना - दागिना
10) दक्षीणा - दक्षिणा
11) दूसरा - दुसरा
12) दिलगीरी - दिलगिरी
13) दरारोज - दररोज
14) दिर्घोद्योग - दीर्घोदयोग
15) दत्पर - दप्तर
16) धिकार - धिक्कार
17) धण - धन
18) धनूष्य - धनुष्य
19) धुर्त - धूर्त
20) धोपटर्माग - धोपटमार्ग
21) ध्यानधारना - ध्यानधारणा
22) धारीष्ट - धारिष्ट
23) नोर्झर - निर्झर
24) नीष्कारण - निष्कारण
25) नियूक्त - नियुक्त
🔹मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*प्रश्न १: हरि-हर या शब्दात कोणते चिन्ह वापरले?*
*१) प्रश्नचिन्ह*
*२) उद्गारवाचक चिन्ह*
*३) संयोगचिन्ह* ✅
*४) अवतरण चिन्ह*
*प्रश्न २: 'कर्णमधुर' याचा विरूध्दार्थी शब्द कोणता?*
*१) कर्णपटू* ✅
*२) कमाल*
*३) कृपण*
*४) कृश*
*प्रश्न ३: पुढील वाक्प्रचार व अर्थाच्या जोड्यांमधून अयोग्य जोडी ओळखा*
*१) पालथ्या घागरीवर पाणी - निष्फळ श्रम*
*२) त्राटिका - कजाख बायको*
*३) कळीचा नारद- भांडणे लावणारा*
*४) उंबराचे फूल - नेहमी भेटणारी व्यक्ती* ✅
*प्रश्न ४: दोन वस्तूंतील साम्य चमत्कृतिपूर्ण रीतीने जिथे वर्णन केलेले असते, तेथे माझी निर्मिती होते.*
*१) यमक*
*२) उत्प्रेक्षा अलंकार*
*३) उपमा अलंकार* ✅
*४) अनुप्रास अलंकार*
*प्रश्न ५: आमच्या गावचे पाटील कर्णासारखे दानशूर आहेत. यातील अलंकार ओळखा*
*१) उपमा* ✅
*२) उत्प्रेक्षा*
*३) दृष्टांत*
*४) रूपक*
*प्रश्न ६: 'मराठी भाषा गुदमरते आहे.' विधेय ओळखा*
*१) मराठी*
*२) भाषा*
*३) गुदमरते आहे* ✅
*४) यांपैकी नाही*
*प्रश्न ७: होकार, प्रतिकार, करू, करून यांसारखे शब्द बनवितात त्यांना .......... म्हणतात*
*१) तत्सम शब्द*
*२) प्रत्यय*
*३) सिध्द शब्द*
*४) साधित शब्द* ✅
*प्रश्न ८: संकटात सापडलेली मी देवाची प्रार्थना करीत होते. या वाक्यातील काळ ओळखा?*
*१) साधा भूतकाळ*
*२) पूर्ण भूतकाळ*
*३) अपूर्ण भूतकाळ* ✅
*४) रीति भूतकाळ*
*प्रश्न ९: 'ईण' प्रत्यय लागून तयार झालेले स्त्रीलिंगी प्राणीवाचक शब्द ओळखा*
*१) वानर*
*२) माळी*
*३) सुतारीण* ✅
*४) बेडकी*
*प्रश्न १०: समासात किमान किती शब्द व पदे एकत्र येतात?*
*१) अनेक शब्द, पदे*
*२) एक शब्द व अनेक पदे*
*३) दोन शब्द किंवा पदे* ✅
*४) ठराविक शब्दच असतात*
@marathi
@marathi
समानार्थी शब्द :
खंड - भाग, तुकडा, दंड, अनेक देशांचा समूह
खाट - बाज, खाटले, बाजले
खास - खुद, स्वत:विशेष, मुद्दाम
खूण - संकेत, ईशारा, चिन्ह
खूळ - गडबड, छंद, वेड
खेळकुडी - थट्टा, खेळ, गंमत
गणपती - गजवदन, गजानन, गणराज, लांबोदर
विनायक - विघ्नहर्ता, गौरीनंदन, हेरंब, अमेय
गर्व - अभिमान, घंमेड, अंहकार
गाय - धेनु, गोमाता, गो, कामधेनू
गरज - निकड, आवश्यकता, जरूरी
गृह - धाम, घर, सदन, भवन, निवास
गरुड - वैनतय, खगेद्र, दविराज
गोपाळ - गिरीधर, मुरलीधर, गोविंद
गावठी - अडाणी, आडमुठा, खेडवळ, गावंढळ
घमेंडखोर - अंहकारी, गर्विष्ठ, बढाईखोर
घृणा - शिसारी, किळस, तिटकरा
घोर - काळजी, चिंता, विवंचना
घेर - चक्कर, प्रदक्षिणा, फिरणे
घट - मडक, पात्र, भांडे, तूट
घडी - घटका, पडदा, पट, घडयाळ
घात - नारा, हंगाम, वध, समसंख्याचा गुणाकार
घाणेरडा - ओंगळ, घामट, गलिच्छ,
घोट - चूळ, आवंडा, घुटका
चंडिका - दुर्गा, उग्र, निर्दय
समानार्थी शब्द :
तापट - संतापी, चलाख
ताकीद - बजावून सांगणे, जरब, आज्ञा
ताठपणा - गर्व, अहंकार, उद्धटपणा
तिरस्कार - कंटाळा, वीट, तिटकारा
तेज - चकाकी, टवटवी, तजेला
तारणे - वाचविणे, सांभाळणे, सोडविणे
तळं - तलाव, धरण, तटाक
तरुण - जवान, यौवन, युवक
तोंड - मुख, वदन, आनन
त्रास - वैताग, ज्वर, ताप
थट्टा - चेष्टा, मस्करी, विनोद
थोर - श्रेष्ठ, मोठा, महान
थंड - गार, शीत, शीतल
दंग - मग्न, गुंग, आश्चर्यचकित
दंडक - नियम, चाल, वहिवाट
दामटणे - धमकी देणे, कोबणे
दरवेशी - फिरताभिक्षेकरी, माकड किंवा अस्वल घेऊन पोट भरणारा
दीन - दुबळा, गरीब, नम्र
देव - ईश, सुर, परमेश्वर, ईश्वर, अमर
देवालय - देऊळ, राऊळ, मंदिर
दुर्धर - अवघड, गहन, श्रीमंत
धनु - कमठा, कोदंड, चाप, धनुष्य
धनाढ्य - सधन, धनिक, श्रीमंत
@marathi
समानार्थी शब्द :
तापट - संतापी, चलाख
ताकीद - बजावून सांगणे, जरब, आज्ञा
ताठपणा - गर्व, अहंकार, उद्धटपणा
तिरस्कार - कंटाळा, वीट, तिटकारा
तेज - चकाकी, टवटवी, तजेला
तारणे - वाचविणे, सांभाळणे, सोडविणे
तळं - तलाव, धरण, तटाक
तरुण - जवान, यौवन, युवक
तोंड - मुख, वदन, आनन
त्रास - वैताग, ज्वर, ताप
थट्टा - चेष्टा, मस्करी, विनोद
थोर - श्रेष्ठ, मोठा, महान
थंड - गार, शीत, शीतल
दंग - मग्न, गुंग, आश्चर्यचकित
दंडक - नियम, चाल, वहिवाट
दामटणे - धमकी देणे, कोबणे
दरवेशी - फिरताभिक्षेकरी, माकड किंवा अस्वल घेऊन पोट भरणारा
दीन - दुबळा, गरीब, नम्र
देव - ईश, सुर, परमेश्वर, ईश्वर, अमर
देवालय - देऊळ, राऊळ, मंदिर
दुर्धर - अवघड, गहन, श्रीमंत
धनु - कमठा, कोदंड, चाप, धनुष्य
धनाढ्य - सधन, धनिक, श्रीमंत
🔹समानार्थी शब्द
अलक्ष - परमेश्वर, ईश्वर, देव, अलख, ईश, भगवान
अमृत - सुधा, पीयूष, संजीवनी
अरण्य - वन, जंगल, रान, विपिन
अग्नी - विस्तव्य, पावक, निखारा, हुताशन, अनल
अश्व - तुरंग, घोडा, वारू, वाजी
अर्जुन - पार्थ, फाल्गुन, धनंजय, भारत
अमर्याद - असंख्य, अगणित, अमित
अंबर - गगन, नभ, अंतरिक्ष, आकाश, आभाळ
अपयश - पराभव, हार, अपमान, अयश
अवधी - समय, वेळ, काळ, अवकाश
आई - जननी, माऊली, माय, माता, जन्मदात्री
आठवण - ध्यान, स्मरण, संस्मरण, स्मृती
आकांत - हंबरडा, आक्रोश, रुदन
आनंद - उल्हास, हर्ष, संतोष, मोद
आशय - भावार्थ, अर्थ, तात्पर्य
आशा - आस, इच्छा, अपेक्षा, वासना, आकांक्षा
इंद्र - वज्रपाणी, शक्र, वासव, देवेंद्र, सहस्त्राक्ष
इष्ट - आवडते, प्रिय मानलेले
*इब्लिस - बदमाश, खोडकर, विचित्र
उकल - उलगडा, सुटका, मोकळे
उधळणे - फेकणे, पसरणे, फाजील खर्च करणे, स्वैर धावणे
उपाय - तजवीज, इलाज, उपचार
उमाळा - तरंग, लोट, उकळी
ऊब - आधार, सुख, उष्णता, वाफ
उत्कर्ष - प्रगती, संपन्नता, भरभराट, चलती एक
*समास*
*4) बहुर्वीही समास:*
*ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्वाची नसून, त्या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तसेच हा सामासिक शब्द त्या तिसऱ्याच पदाचे विशेषण असते, त्या सामासिक शब्दास बहुर्वीही समास म्हणतात.*
या समासाचे चार प्रकार पडतात:
*अ)विभक्ती बहुर्वीही:*
विभक्ती बहुर्वीही समासाचे दोन प्रकार पडतात.
१} *सामानाधीकरण:*
विग्रह करताना यातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात.
1)लक्ष्मीकांत
लक्ष्मी आहे कांता ज्याची
विष्णू (प्रथमा)
2)वक्रतुंड
वक्र आहे तुंड (तोंड) ज्याचे तो
गणपती (प्रथमा)
3)नीलकंठ
नील आहे कंठ ज्याचे तो
शंकर (प्रथमा)
4)भक्तप्रिया
भक्त आहे प्रिय जयला तो
देव (प्रथमा)
5)जितेंद्रिय
जीत आहेत इंद्रिय ज्याने तो
मारुती (प्रथमा)
6)लंबोदर
लांब आहे उदार ज्याचे असा तो
गणपती (प्रथमा)
7पांडुरंग
पांडूर आहे रंग ज्याचे असा तो
विठ्ठल (प्रथमा)
२ } *व्याधीकरण:*
विग्रह करताना दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात.
1)सुधाकर
सुधा आहे करत असा तो (चंद्र) (प्रथमा/ सप्तमी)
2)गजानन
गजाचे आहे आनन ज्याला तो (गणेश) (षष्ठी/ प्रथमा)
3)भालचंद्र
भाळी आहे चंद्र ज्याच्या तो (शंकर) (सप्तमी/ प्रथमा)
4)चक्रपाणी
चक्र आहे पानीत असा तो ( विष्णू) (प्रथम/ सप्तमी)
*आ) नत्र बहुर्वीही समास:*
*ज्या बहुर्वीही समासाचे पहिले पद अ, अन, न, नि, असे नकारदर्शक असेल तर, त्यास नत्र बहुर्वीही समास म्हणतात.*
१)अव्यय
नाही व्यय ज्याला ते
२)अनंत
नाही अंत ज्याला ते
३)निर्धन
गेले आहे धन ज्याच्या पासून असा तो
४)निरास
नाही रस ज्यात ते
५)नाक
नाही एक (दु:ख) ज्यात ते
६)अनादी
नाही आदी ज्याला तो
७)अखंड
नाही खंड ज्याला असे ते
८)अनियमित
नियमित नाही असे ते
९)अनाथ
जयला नाथ नाही असा तो
१०)अस्पृश्य
यला स्पर्श करत नाही असे ते
११)निर्बळ
निघून गेलेले आहे बळ ज्यापासून तो
१२)निर्बुद्ध
ज्याला बुद्धी नाही असा तो
१३)अकर्मक
नाही कर्म जयला असे ते
१४)नास्तिक
नाही आस्तिक असा तो
*इ) सहबहुर्वीही समास:*
*जय बहुर्वीही समासाचे पहिले पद 'सह' किंवा 'स' अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाद्या विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुर्वीही समास म्हणतात.*
१)सदर
आदराने सहित असा तो
२)सफल
फळाने सहित असे ते
३)सवर्ण
वर्णासहित असा तो
४)सहपरिवार
परिवारासहित असा तो
५)सबल
बलाने सहित असा तो
*ई)प्रादि बहुर्वीही समास:*
*ज्या बहुर्वीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, सु, दूर, वि अशा उपसर्गानी युक्त असते त्यास प्रादि बहुर्वीही समास म्हणतात.*
१)सुमंगल
पवित्र आहे असे ते
२)दुर्गुणी
गुणापासून दूर असलेला
३)प्रबळ
अधिक बलवान असा तो
४)विख्यात
विशेष ख्याती असलेला तो
५)निर्घुण
निघून गेली आहे घृणा ज्यातून तो
मराठी व्याकरण
🔹लिंगविचार
🏀 *आकारान्त पुल्लिंगी* *प्राणिवाचक नामाचे स्त्रीलिंगी रुप*
*ईकारान्त* होते व त्याचे नपुसकलिंग
रुप एकारांत होते
उदा....
मुलगा -- मुलगी - मुलगे
पोरगा -- पोरगी - पोरगे
🏀 *काही प्राणिवाचक पुल्लिंगी शब्दास *ईण* प्रत्यय लागून त्यांची
स्त्रीलिंगी रुपे होतात.
उदा...
कुंभार -- कुंभारीण
सुतार -- सुतारीण
पाटील -- पाटलीण
वाघ -- वाघीण
माळी -- माळीण
🏀 *काही प्राणिवाचक अकारान्त पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रुपे ईकारान्त होतात*.
उदा...
दास - दासी
वानर -- वानरी
तरुण - तरुणी
🏀 *काही आकारान्त पुल्लिंगी पदार्थ*
*वाचक नामांना *ई* प्रत्यय लागून
त्यांची लघुत्वदर्शक स्त्रीलिंगी रुपे बनतात.उदा...
लोटा - लोटी
गाडा - गाडी
दांडा -दांडी
🏀 *संस्कृत मधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रुपे *ई* प्रत्यय
लागून होतात.
उदा....
श्रीमान -- श्रीमती
युवा - युवती
भगवान - भगवती
🏀वरील बाबींचा सराव पाठातील
जितके जास्त शब्द घेवून करता येईल
तितके करावे.
🏀वर्तमानपत्र , उतारा यांचा वापर
करता येईल .
🔹सराव प्रश्नसंच
1. क्रियापदावरून फक्त काळाच बोध होत असेल म्हणजेच फक्त क्रियापदाचा मूळ अर्थ समजत असेल तर अशा क्रियापदाला ........ क्रियापद असे म्हणतात.
स्वार्थ
आज्ञार्थ
विध्यर्थ
संकेतार्थ
उत्तर : स्वार्थ
2. वाक्याचा काळ ओळखा - 'मी नदीकाठी खेळत असतो'
साधा भूतकाळ
अपूर्ण भूतकाळ
पूर्ण भूतकाळ
रिती भूतकाळ
उत्तर : पूर्ण भूतकाळ
3. विधर्थी क्रियापदावरून कोणता आख्यातविकार ओळकता येतो?
ऊ-आख्यात
ई-लाख्यात
लाख्यात
वाख्यात
उत्तर : ऊ-आख्यात
4. 'चमचम' - हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे?
गतिदर्शक
अनुकरणदर्शक
निश्चयदर्शक
प्रकारदर्शक
उत्तर : गतिदर्शक
5. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविणार्या अविकारी शब्दाला ....... अव्यय असे म्हणतात.
शब्दयोगी
उभयान्वयी
केवलप्रयोगी
शब्दसिद्धी
उत्तर : केवलप्रयोगी
6. कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणात ....... असे म्हणतात.
क्रिया विशेषण
प्रयोग
अव्यय
आख्यात विकार
उत्तर : अव्यय
7. ज्या तत्पुरुषात पूर्वपदाच्या सप्तमीच्या 'ई' विभक्ती प्रत्याचा लोप होत नाही, त्यास ....... तत्पुरुष असे म्हणतात.
अलुक
उपपद
कृदत
नत्र
उत्तर : कृदत
8. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा ...... हा अलंकार होतो.
पर्यायोक्ती
सार
अन्योक्ती
भ्रांतिमान
उत्तर : भ्रांतिमान
9. अक्षरगण वृत्ताचे प्रकार ओळखा - अक्षरे - 12, गण - य,य,य,य.
1
1
1
1
उत्तर : 1
10. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
आशिर्वाद
आकृती
विहीर
अंतर्मुख
उत्तर : आकृती
-----------–--------------------------
मराठी व्याकरण विषयक अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे @marathi चॅनेल.
Telegram.me/marathi
🔹उपसर्ग जोडून येणारे शब्द
मूळ शब्दाआधी जे अक्षर किंवा शब्द जोडला जातो, त्याला उपसर्ग म्हणतात.
(१) अ + चूक = अचूक
(२) अ + मर = अमर
(३) अ +पार =अपार
(४) अ + नाथ = अनाथ
(५) अ + पात्र = अपात्र.
(६) अ + चल = अचल
(७) अ + शांत = अशांत
(८) अ +ज्ञान = अज्ञान
(९) अ + माप = अमाप
(१०) अ +शुभ = अशुभ
(११) अ + सत्य = असत्य
(१२) अ + बोल = अबोल
(१३) अ + खंड =अखंड
(१४) अं + धार = अंधार
(१५) अ + समान = असमान
(१६) अ + स्थिर = अस्थिर
(१७) अ + न्याय = अन्याय
(१८) अ + पचन = अपचन
(१९) अ + जय = अजय
(२०) अ + प्रगत = अप्रगत
(२१) अ + मोल = अमोल
(२२) अ + योग्य = अयोग्य
(२३) कु + रूप = कुरूप
(२४) सु + काळ = काळ
(२५) सु + गंध = सुगंध
(२६) सु + पुत्र = सुपुत्र
(२७) सु + मार्ग = सुमार्ग
(२८) सु + यश = सुयश
(२९) सु + योग्य = सुयोग्य
(३०) वि + नाश = विनाश
(३१) आ + मरण = आमरण
(३२) ना + खूष = खूष
(३३) ना + पसंत = नापसंत
(३४) ना + पास = नापास
(३५) ना + बाद = नाबाद
(३६) बिन + चूक = बिनचूक
(३७) बिन + पगारी = बिनपगारी
(३८) गैर + हजर = गैरहजर
(३९) अप + मान = अपमान
(४०) अप + यश अपयश
-------------------------------------
जॉईन करा आमचे चॅनेल @marathi
🔹वर्ण
अर्धस्वर:
य्,र्,ल्,व् यांची उच्चारस्थाने अनुक्रमे इ,ऋ,लृ,उ, या स्वरांच्या उच्चरस्थानासारखीच असल्याने या व्यंजनांचा वरील स्वरांशी निकटचा संबंध आहे. म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात. अर्धस्वर एकूण चार आहेत, स्वरांच्या क्रमानुसार अर्धस्वरांचा क्रम य,व,र,ल असा आहे.
उष्मे:
श्,ष्,स यांना उष्मे म्हणतात. वरील वर्णाचा उचार करतांना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते,. त्यामुळे त्यांना उष्मे घर्षक असे म्हणतात.
महाप्राण :
ह् वर्णाचा उच्चार करताना फुफ्फूसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून या वर्णाला महाप्राण असे म्हणतात.
,ख्,घ्,छ,झ्,ठ,ढ,थ्,ध,फ,भ्,श्,ष्,स, या वर्णात ह, या वर्णाची छटा असल्याने त्यांना सुध्दा महाप्राण असे म्हणतात. मराठीतील जो वर्ण इंग्रजीत लिहीतांना H अक्षर वापरावे लेगते त्या सर्व वर्णाना महाप्राण म्हणातात. बाकीचे अल्पप्राण आहेत.
उदा. ख – kh महाप्राण, ग – g अल्पप्राण ,
अपवाद : स – s महाप्राण, च – ch अल्पप्राण
क्,ग्,ङ,च्,ज्,त्र,ट,ड,ण्,त्,द,न्,प्,ब्,म्,य,र,ल्,व्,ळ, या व्यंजनाना अल्पप्राण असे म्हणतात. या वर्णात ह, ची छटा नसते,
स्वतंत्र वर्ण : ळ, हा मराठीतील स्वतंत्र वर्ण मानला जातो, तो इतर भाषेकडून घेतलेला नाही.
🔹अलंकार भाग
*९) अतिशयोक्ती:-*
अतिशयोक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
अलंकारात प्रत्यक्षात असणारी कल्पना ही फारच फुगवून सांगितलेली असते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो.
उपमा, उत्प्रेक्षा, रुपक, व्यतिरेक ह्या अलंकारात अतिशयोक्ती असतेच पण कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करुन सांगितलेली असते तेव्हा हा अलंकार होतो.
उदा:
जो अंबरी उफळता खुर लागलाहे
तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे
काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर
*१०) अनन्वय:-*
अनन्वय हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते.
उदा:
आहे ताजमहाल एक जगती तो तोच
त्याच्यापरी या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान
*११) भ्रान्तिमान:-*
उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होणे.
उदा:
भृंगे विराजित नवी अरविंदपत्रे
पाहूनि मानूनी तिचीच विशाल नेत्रे
घालीन अंजन अशा मतिने तटाकी
कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी
भुंग्यांनी सुशोभित झालेली कमलपत्रे हे
दमयंतीचे नेत्रच आहेत असे समजून तिच्या डोळ्यात
अंजन घालावयास निघालेला नलराजा पुढे सरसावला आणि पाण्यामुळे भिजला.
*१२) ससंदेह:-*
उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा संदेह निर्माण होणे भ्रान्तिमानात हा भ्रम निश्चित
असतो.
उदा:
कोणता मानू चंद्रमा ?
भूवरीचा की नभीचा?
चंद्र कोणता? वदन कोणते?
शशांक मुख की मुख शशांक ते?
निवडतील निवडोत जाणते
मानी परी मन सुखद संभ्रमा- मानू
चंद्रमा कोणता?
*१३) दृष्टान्त:-*
एखादा विषय पटवून सांगताना दाखला देणे.
उदा:
लहानपण दे गा देवा,
मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर,
त्यासी अंकुशाचा मार
*१४) अर्थान्तरन्यास:-*अर्थान्तरन्यास हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
एखाद्या विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे देणे आणि सिद्धान्त मांडणे. (अर्थान्तर- दुसरा अर्थ, न्यास- शेजारी ठेवणे )
उदा:
तदितर खग भेणे वेगळाले पळाले
उपवन-जल-केली जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो कठिण समय
येता कोण कामास येतो?
*१५) स्वभावोक्ती:-*
एखाद्या व्यक्त्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे, स्वाभाविक स्थितीचे, हालचालीचे यथार्थ पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन.
उदा:
गणपतवाणी विडी पिताना चावायाचा नुसतीच
काडी म्हणायचा अन मनाशीच
की या जागेवर बांधीन
माडी मिचकावुनी मग
उजवा डोळा आणि उडवूनी डावी भिवई
भिरकावुनि ती तशिच द्यायचा लकेर बेचव जैसा गवई
*१६) अनुप्रास:-*
एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन
त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.
उदा:
गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले शितलतनु चपलचरण
अनिलगण निघाले रजनीतल,ताम्रनील
स्थिर पल जल पल सलील
हिरव्या तटि नावांचा कृष्ण मेळ खेळे.
पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी गळ्यामधे
गरिबच्या गाजे संतांची वाणी
@Marathi
🌍 भूगोल: विषय सोपा कसा करावा
🪐 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
🌞 By Prof. Arun Tupe Sir
🗓 दिनांक:- 10 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.
🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.
लिंक
https://youtu.be/LHaawk6qZM0?si=qdu3mMwpE2IOaswp
========
🎯 Like, Share & Subscribe
🔹लिंग विचार
नामाच्या रूपावरुन एखादी वस्तु वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची आहे की, स्त्रीजातीची आहे की, दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात.
मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार पडतात.
1. पुल्लिंगी 2. स्त्रीलिंगी 3. नपुसकलिंगी
पुल्लिंगी : मुलगा, शिक्षक, घोडा, चिमणा, सूर्य, चंद्र, सागर, दगड, कागद, पंखा इ.
स्त्रीलिंगी : मुलगी, शिक्षिका, घोडी, चिमणी, खुर्ची, शाळा, नदी, वही, खिडकी, इमारत, पाटी इ.
नपुंसकलिंगी: पुस्तक, घर, वासरू, पाखरू, लेकरू, झाड, शहर, घड्याळ, वाहन इ.
*लिंग भेदामुळे नामांच्या रूपात होणारे बदल*
नियम : 1
'अ' कारान्त पुल्लिंगी प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप 'ई' कारान्त होते व त्याचे नपुसकलिंगी 'ए' कारान्त होते.
उदा : 1. मुलगा - मुलगी - मूलगे
2. पोरगा - पोरगी - पोरगे
3. कुत्रा - कुत्री - कुत्रे
नियम : 2
काही प्राणीवाचक पुल्लिंग नामांना ईन प्रत्यय लागून त्यांचे स्त्रीलिंगी रूप होतात.
उदा : 1. सुतार - सुतारीन
2. माळी - माळीन
3. तेली - तेलीन
4. वाघ - वाघीन
नियम : 3
काही प्राणीवाचक 'अ' कारान्त, पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रुपे 'ई' कारान्त होतात.
उदा : 1. हंस - हंसी
2. वानर - वानरी
3. बेडूक - बेडकी
4. तरुण - तरुणी
नियम : 4
काही आ कारान्त पुल्लिंगी पदार्थ वाचक नामांना ई प्रत्यय लावून त्यांची स्त्रीलिंगी रूप बनतात.
उदा : 1. लोटा - लोटी
2. खडा - खडी
3. दांडा - दांडी
4. विळा - विळी
5. डबा - डबी
नियम : 5
संस्कृतातून मराठी आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूप ई प्रत्यय लागून होतात.
उदा : 1. युवा - युवती
2. श्रीमान - श्रीमती
3. ग्रंथकर्ता - ग्रंथकर्ती
नियम : 6
काही नामांची स्त्रीलिंगी रुपे स्वतंत्ररीतीने होतात.
उदा : 1. वर - वधू 2. पिता - माता
3. राजा - रानी 4. पती - पत्नी 5. दीर - जाऊ 6. सासरा - सासू
7. बोकड - शेळी 8. मोर - लांडोर
नियम : 7
मराठीतील काही शब्द निरनिराळ्या लिंगात आढळतात.
उदा : 1. वेळ - वेळ 2. बाग - बाग
3. वीणा - वीणा 4. मजा - मजा 5. टेकर - टेकर 6. तंबाखू - तंबाखू
नियम : 8
परभाषेतून आलेले शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या शब्दांच्या लिंगावरून ठरवितात.
उदा : 1. बुट(जोडा) - पुल्लिंगी
2. क्लास(वर्ग) - पुल्लिंगी
3. पेन्सिल (लेखनी) - स्त्रीलिंगी
4. कंपनी(मंडळी) - स्त्रीलिंगी
5. बूक(पुस्तक) - नपुसकलिंगी
नियम : 9
सामासिक शब्दांचे लिंग हे शेवटच्या लिंगाप्रमाणे असते.
उदा : 1. साखरभात - पुल्लिंगी
2. मिठभाकरी - स्त्रीलिंगी
3. भाजीपाला - पुल्लिंगी
4. भाऊबहीण - स्त्रीलिंगी
5. देवघर - नपुसकलिंगी
नियम : 10
काही नामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही उल्लेख पुल्लिंगीच करतात.
उदा .1. गरुड 2. मासा 3. सुरवड
4. साप 5. होळ 6. उंदीर
नियम : 11
काही नामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही त्यांचा उल्लेख केवळ स्त्रीलिंगी करतात.
उदा 1. घुस 2. पिसू 3. माशी
4. ऊ 5. सुसर 6. खार
7. घार 8. पाल
जॉईन करा आमचे चॅनेल @marathi
🔹शुद्ध शब्द
अशुद्ध शब्द - शुद्ध शब्द
1) चाह - चहा
2) छपर - छप्पर
3) जागार - जागर
4) जागर्त - जागृत
5) ज्यादुगार - जादूगार
6) जीज्ञासू - जिज्ञासू
7) ज्योस्त्ना - ज्योत्स्ना
8) तिर्थरूप - तीर्थरूप
9) त्रीभूवन - त्रिभुवन
10) ततसम - तत्सम
11) जागतीक - जागतिक
12) हूंकार - हुंकार
13) हिंदू - हिंदु
14) हारजित - हारजीत
जॉईन करा : @marathi
समानार्थी शब्द :
निकड - गरज, जरूरी, लकडा
निका - चांगला, पवित्र, योग्य, शुद्ध
निमंत्रण - अवतण, आमंत्रण, बोलावण
पंगत - भोजन, रांग, ओळ
पत्नी - भार्या, बायको, अर्धांगी, अस्तुरी
पान - पर्ण, पत्र, दल
परंपरा - प्रथा, पद्धत, चाल, रीत
प्रभात - उषा, पहाट, प्रात:काल
पाठ - नियम, धडा, पुन्हा-पुन्हा म्हणने, पार्श्वभाग
पार्वती - उमा, दुर्गा, गौरी, भवानी
पुष्प - कुसुम, सुमन, फूल
पिता - जनक, तीर्थरुप, बाप, वडील
प्रताप - शौर्य, बहादुरी, पराक्रम, सामर्थ्य
पुरुष - मर्द, नर, मनुष्य
पाखरू - पक्षी, खग, द्विज, विहंग
पुरातन - जुनाट, प्राचीन, पूर्वीचा
प्रख्यात - ख्यातनाम, प्रसिद्ध, नामांकित
पाय - चरण, पाऊल, पद
पोपट - शुक, रावा, राघू, कीर
प्रौढ - प्रगल्भ, घीट, शहाणा
प्रवाह - पाझर, धार, प्रस्त्रव
फाकडा - माणीदार, हुशार, ऐटबाज, रुबाबदार
फट - चीर, खाच, भेग
फोड - सूज, फुगलेला भाग, फुगारा
फरक - अंतर, भेद
@marathi
समानार्थी शब्द :
चढण - चढ, चढाव, चढाई
चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई
चवड - ढीग, रास, चळत
चव - रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ
चंद्रिका - कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना
चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष
चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत
छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली
छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला
छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच
छिद्र - छेद, दोष, भोक, कपट
छडा - तपास, शोध, माग
जतावणी - सूचना, इशारा, ताकीद
जन्म - उत्पति, जनन, आयुष्य
जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति
जबडा - तोंड, दाढ
जुलूम - जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय
जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक
जल - जीवन, तोय, उदक, पाणी, नीर
झाड - वृक्ष, पादप, दुम, तरु
झुंज - टक्कर, संघर्ष, लढा
झुणका - बेसन, पिठले, अळण
झटका - झोक, डौल, शरीराचा तोल, कल
जॉईन करा @marathi
समानार्थी शब्द :
झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ
झरा - निर्झर, ओहळ, ओढा
झगडा - कलह, भांडण, तंटा
टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
टणक - निबर, कठिण, धट्टाकट्टा
टिळा - तिलक, टिळक, ठिपका
टूक - कुशलता, युक्ती, टक
टाळाटाळ - र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ
ठराव - नियम, सिद्धांत, निकाल
ठळक - स्पष्ट, मोठे, जाड
ठाम - पक्का, कायम, दृढ
ठिकाण - पत्ता, स्थान, खूण
डोके - माथा, मस्तक, शिर
डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू
डगर - उतरण, टेकडी, ढळ
डौल - रुबाब, दिमाख, ऐट
ढग - घन, जलद, मेघ, नीरद
ढाळणे - गाळणे, आतणे, अभिषेक करणे
ढेकूळ - ढेप, पेंड, भेली
ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई, हयगय
ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा
ढोल - नगारा, डंका, पडघम
तक्रार - वाद, भांडण, हरकत
तट - काठ, किनारा, बाजू, भांडण
तत्व - सत्य, तात्पर्य, अंश
आमच्या चॅनेल वर जॉईन होण्यासाठी @marathi यथे क्लीक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा.
🔹समानार्थी शब्द
एकता - ऐक्य, एकी, एकजूट, एकमेळ
ऐश्वर्य - सता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य
ओज - तेज, पाणी, बळ
ओढ - कल, ताण, आकर्षण
ओवळा - अपवित्र, अमंगल, अशुद्ध
ओळख - माहिती, जामीन, परिचय
कच्छ - कासव, कूर्म, कमट, कच्छप
कळकळ - चिंता, काळजी, फिकीर, आस्था
श्रीकृष्ण - वासुदेव, कन्हैया, केशव, माधव
कपाळ - ललाट, भाल, निढळ
कमळ - पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज
कृपण - चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार
काक - कावळा, वायस, एकाक्ष
किरण - रश्मी, कर, अंशू
काळोख - तिमिर, अंधार, तम
कलंक - बट्टा, दोष, डाग, काळिमा
करुणा - दया, माया, कणव, कृपा कसब - कौशल्य, प्राविण्य, नैपुण्य, खुबी
कर्तबगार - कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण
कुरूप - विद्रूप, बेढब, विरूप
कोमल - मृदु, हळवा, मऊ, नाजुक
खग - शकुंत, पक्षी, व्दिज, अंडज, पाखरू
खजिना - द्रव्य, कोष, भांडार, तिजोरी
खच - गर्दी, दाटी, रास खट्याळ - खोडकर, व्दाड, खट
🔹समास व त्याचे प्रकार
✴✴✴बहुव्रीही समास✴✴✴
✳ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.
✴उदा.
❇नीलकंठ - ज्याचा कंठ निळा आहे असा (शंकर)
❇वक्रतुंड - ज्याचे तोंड वक्र आहे असा (गणपती)
❇दशमुख - ज्याला दहा तोंड आहे असा (रावण) बहुव्रीही समासाचे खालील 4 उपपक्रार पडतात.
🔵i) विभक्ती बहुव्रीही समास -
✳ज्या समासाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते.
✳अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.
✴उदा.
❇प्राप्तधन - प्राप्त आहे धन ज्याला तो – व्दितीया विभक्ती
❇जितेंद्रिय - जित आहे इंद्रिये ज्याची तो – षष्ठी विभक्ती
❇जितशत्रू - जित आहे शत्रू ज्याने तो – तृतीया विभक्ती
❇गतप्राण - गत आहे प्राण ज्यापासून तो – पंचमी विभक्ती
🔵ii) नत्र बहुव्रीही समास -
✳ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नत्र बहुव्रीही समास असे म्हणतात.
या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नि अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो.
✴उदा.
❇अनंत - नाही अंत ज्याला तो
❇निर्धन - नाही धन ज्याकडे तो
❇नीरस - नाही रस ज्यात तो
🔵iii) सहबहुव्रीही समास -
✳ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाधा विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास म्हणतात.
✴उदा.
❇सहपरिवार - परिवारासहित असा जो
❇सबल - बलासहित आहे असा जो
❇सवर्ण - वर्णासहित असा तो
🔵iv) प्रादिबहुव्रीही समास -
✳ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि अशा उपसर्गानी युक्त असेल तर त्याला प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात.
✴उदा.
❇सुमंगल - पवित्र आहे असे ते
❇सुनयना - सु-नयन असलेली स्त्री
❇दुर्गुण - वाईट गुण असलेली व्यक्ती
📖केवल प्रयोगी अव्यय📖
आपल्या मनातील दु:ख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणार्या शब्दांच्या केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हणतात.
1. हर्षदर्शक : अहाहा, वाहवा, वा, अहा, वा-वा, ओ-हो
📄उदा. अहाहा! किती सुंदर दृश्य आहे.
2. शोकदर्शक : आई ग, अगाई, हाय, हायहाय, ऊं, अं, अरेरे
📄उदा. अरेरे! खूप वाईट झाले.
3. आश्चर्यदर्शक : ऑ, ओहो, अबब, अहाहा, बापरे, ओ, अरेच्या
📄उदा. अबब! केवढा मोठा साप
4. प्रशंसादर्शक : छान, वाहवा, भले, शाब्बास, ठीक, फक्कड खाशी
📄उदा. शाब्बास! तू दिलेले काम पूर्ण केलेस.
5. संमतीदर्शक : ठीक, जीहा, हा, बराय, अच्छा
📄उदा. अछा! जा मग
6. विरोधदर्शक : छेछे, अहं, ऊं, हू, हॅट, छट, छे, च
📄उदा. छे-छे! असे करू नकोस.
7. तिरस्कारदर्शक : शी, शु, शिक्क, इश्श, हुडत, हुड, फुस, हत, छत, छी
📄उदा. छी! ते मला नको
8. संबोधनदर्शक : अग, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे
📄उदा. अहो! एकलत का ?
9. मौनदर्शक : चुप, चुपचाप, गप, गुपचुप
📄उदा. चुप! जास्त बोलू नको
✳️✏️✳️✏️✳️✏️✳️
♻संधी व त्याचे प्रकार♻
✍जोडाक्षरे:
ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास 'जोडाक्षर' म्हणतात.
❇उदा.
1. विधालय : धा : द + य + आ
2. पश्चिम : श्चि : श + च + इ
3. आम्ही : म्ही : म + ह + ई
4. शत्रू : त्रू : त + र + ऊ
🌀 संधी:
❇स्वरसंधी -
जोडशब्द्ध तयार करतांना पहिल्या शब्दातील शेवटचे वर्ण व दुसर्या शब्दातील पहिले वर्ण हे एकमेकांत मिसळतात व त्या दोघांबद्दल एक वर्ण तयार होतो वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास 'संधी' असे म्हणतात.
❇उदा.
1. ईश्र्वरेच्छा = ईश्र्वर + इच्छा
2. सूर्यास्त = सूर्य + अस्त
3. सज्जन = सत् + जन
4. चिदानंद = चित् + आनंद
🌀 संधीचे प्रकार:
संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत.
❇स्वर संधी -
एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना
'स्वरसंधी' असे म्हणतात किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वरसंधी असे म्हणतात.
♻दिर्घत्व संधी -
1. अ + अ = आ
2. आ + आ = आ
3. आ + अ = आ
4. इ + ई = ई
5. ई + ई = ई
6. इ + इ = ई
7. उ + ऊ = ऊ
8. उ + उ = ऊ
♻नियम -
(1) 'अ' किंवा 'आ' यांच्यापुढे इ+ई आल्यास त्या दोघांऐवजी 'ए' येतो आणि 'उ' किंवा 'ऊ' आल्यास 'ओ' येतो व ऋण आल्यास 'र' येतो.
❇उदा.
ईश्र्वर+ईच्छा (अ+इ=ए) ईश्र्वर+ए+च्छा=ईश्र्वरेच्छा
गण+ईश (अ+इ=ए) गण+ए+श=गणेश
उमा+ईश (आ+इ=ए) उम+ए+श=उमेश
चंद्र+उदय (अ+उ=ओ) चंद्र+ओ+दय=चंद्रोदय
महा+ऋर्षी (आ+ऋ=अर) महा+अर+र्षी=महर्षी
देव+ऋर्षी (अ+ऋ=अर) देव+अर+र्षी=देवर्षी
(2) अ/आ यांच्यापुढे 'ए/ऐ' हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल 'ऐ' येतो आणि 'अ' किंवा 'अ' किंवा 'आ' या स्वरापुढे 'ओ/औ' स्वर आल्यास त्याबद्दल 'आ' येतो.
❇उदा.
एक+एक्य (अ+ए+=ऐ) एक+ऐ+अ= एकैक्य
सदा+ऐव (आ+ऐ=ऐ) सदा+ ऐ+व= सदैव
मत+एक्य (अ+ऐ=ऐ) मत+ऐ+क्य= मतैक्य
प्रजा+ऐक्य (आ+ऐ=ऐ) प्रज+ऐ+क्य= प्रजैक्य
जल+औघ (अ+ओ=औ) जल+औ+घ= जलौघ
गंगा+औघ (आ+औ=औ)
गंगा+औ+घ= गंगौघ
(3) इ.उ,ऋ (र्हवस्व/दीर्घ) यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास 'इ/ई' बद्दल 'य' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'उ/ऊ' बद्दल 'व' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'ऋ' बद्दल 'र' हा मिसळून संधी होते.
❇उदा.
प्रीती+अर्थ (ई+अ+र्थ) प्रीत्यर्थ
इति+आदी (इ+आ+दी) इत्यादी
अति+उत्तम (इ+उ+त्तम) अत्युतम
प्रति+एक (इ+ए+क) प्रत्येक
मनू+अंतर (उ+अ+तर) मन्वंतर
पितृ+आज्ञ (ऋ+आ+ज्ञा) पित्राज्ञा
(4) ए,ऐ,ओ,औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे अय,आय,अवी.आवि असे आदेश होवून पुढील त्यात मिसळतो.
❇उदा.
🗒ने+अन (ए+अ=अय) न+अय+न = नयन
🗒गै+अन (ऐ+अ=आय) ग+आय+न = गायन
🗒गो+ईश्र्वर (ओ+ई=अवी) ग+अवी+श्वर = गवीश्र्वर
🗒नौ+इक ( औ+इ=आवि) न+आवि+क = नाविक
🌀व्यंजन संधी :
एका पाठोपाठ एक येणारे व्यंजन किंवा स्वर यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला 'व्यंजनसंधी' म्हणतात.
उदा.
1. सत्+जन = सज्जन (व्यंजन + व्यंजन = व्यंजन संधी)
2. चित्+आनंद = चिदानंद (व्यंजन + स्वर = व्यंजन संधी)
♻नियम -
(1) पहिल्या 5 वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापूढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो. यालाच 'प्रथम व्यंजन संधी' असे म्हणतात.
❇उदा.
विपद्+काल = द्+क= त्क = विपत्काल
वाग्+पति = ग्+प= क्प = वाक्पती
क्षुध्+पिपासा= ध्+प्= त्+प्= त्प = क्षुत्पिपासा
(2) पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापूढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदु व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते त्याला 'तृतीय व्यंजन संधी' असे म्हणतात.
क्रमशः