आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi
🌷🌷३. उद्गारार्थी वाक्य 🌷🌷
ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.
उदाहरणार्थ
अबब ! केवढी प्रचंड आग ही !
🌷🌷वाक्यांचे प्रकार 🌷🌷
१. विधानार्थी वाक्य
ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात.
उदाहरणार्थ
माझे वडील आज परगावी गेले.
🌷🌷iii) पूर्ण भविष्यकाळ🌷🌷
जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला 'पूर्ण भविष्यकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी आंबा खाल्ला असेल.
b. मी गावाला गेलो असेल.
c. पूर्वाने अभ्यास केला असेल.
d. दिप्तीने गाणे गायले असेल.
🌷🌷i) साधा भविष्यकाळ🌷🌷
जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी 'साधा भविष्यकाळ' असतो.
उदा.
a. उधा पाऊस पडेल.
b. उधा परीक्षा संपेल.
c. मी सिनेमाला जाईल.
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 1
मराठी व इंग्रजी
जॉइन करा @Marathi & @MPSCEnglish
🌷🌷iii) पूर्ण भूतकाळ🌷🌷
एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पुर्णपणे संपलेली असते, असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला 'पूर्ण भूतकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. सिद्धीने गाणे गाईले होते.
b. मी अभ्यास केला होता.
c. त्यांनी पेपर लिहिला होता.
d. राम वनात गेला होता.
🌷🌷i) साधा भूतकाळ🌷🌷
एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास 'साधा भूतकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. रामने अभ्यास केला
b. मी पुस्तक वाचले.
c. सिताने नाटक पहिले.
🌷🌷iv) रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ🌷🌷
वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला 'रीती वर्तमानकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी रोज फिरायला जातो.
b. प्रदीप रोज व्यायाम करतो.
c. कृष्णा दररोज अभ्यास करतो.
🌷🌷ii) अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ🌷🌷
जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळात असून ती अपूर्ण किंवा चालू असे तेव्हा त्या वर्तमान काळाला 'अपूर्ण किंवा चालू वर्तमानकाळ'म्हणतात.
उदा.
a. सुरेश पत्र लिहीत आहे.
b. दिपा अभ्यास करीत आहे.
c. आम्ही जेवण करीत आहोत.
🌿🌿वर्तमानकाळ :🌿🌿
क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ 'वर्तमानकाळ' असतो.
उदा.
a. मी आंबा खातो.
b. मी क्रिकेट खेळतो.
c. ती गाणे गाते.
d. आम्ही अभ्यास करतो.
वर्तमानकाळाचे 4 उपप्रकार घडतात.
3. अनुनासिक वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात.
🌿
· उदा. ड, त्र, ण, न, म
🌿1. कठोर वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.
· उदा. क, ख
· च, छ
· ट, ठ
· त, थ
· प, फ
🌷3.व्यंजन : एकूण व्यंजन 34 आहेत.
· ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात.
· व्यंजनाचे पाच प्रकारात वर्णन केले जाते.
1. स्पर्श व्यंजन (25)
2. अर्धस्वर व्यंजन (4)
3. उष्मा, घर्षक व्यंजन (3)
4. महाप्राण व्यंजन (1)
5. स्वतंत्र व्यंजन (1)
🍀🍀स्वरांचे इतर प्रकार🍀🍀
🌷· 1. सजातीय स्वर : एकाच उच्चार स्थांनामधून जाणार्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.
· अ-आ, उ-ऊ, ओ-औ, इ-ई, ए-ऐ
🌷· 2. विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणार्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.
· अ-ई, उ-ए, ओ-ऋ
· 🌸 3. संयुक्त स्वर : दोन स्वर मिळून तयार होणार्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात.
· याचे 4 स्वर आहेत.
· ए - अ+इ/ई
· ऐ - आ+इ/ई
· ओ - अ+उ/ऊ
· औ - आ+उ/ऊ
❇️ एक शब्दाबद्दल शब्दसमूह ❇️
● कृतज्ञ : उपकार जाणणारा
● असंख्य,अमाप : संख्या मोजता न घेता येणारा
● मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा
● वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा
● गुप्तहेर : गुप्त बातम्या कढणारा
● विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता
● दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा
● कवयित्री : कविता करणारी
● तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत
● स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा करू
पाहणारा
● तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा
● दानशूर : खूप दानधर्म करणारा
● दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा
● अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे
● गुराखी : गुरे राखणारा
● निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा
● अंगण : घरापुढील मोकळी जागा
● गवंडी : घरे बांधणारा
● चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा
🌷🌷२. प्रश्नार्थी वाक्य 🌷🌷
ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.
उदाहरणार्थं
तू मुंबईला केंव्हा जाणार आहेस ?
🌷🌷iv) रीती भविष्यकाळ / चालू पूर्ण भविष्यकाळ🌷🌷
जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल, तर त्याला 'रीती/ चालू पूर्ण भविष्यकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी रोज व्यायाम करत जाईल.
b. पूर्वी रोज अभ्यास करत जाईल.
c. सुनील नियमित शाळेत जाईल.
🌷🌷ii) अपूर्ण / चालू भविष्यकाळ🌷🌷
जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला 'अपूर्ण भविष्यकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी आंबा खात असेल.
b. मी गावाला जात असेल.
c. पूर्वी अभ्यास करत असेल.
d. दिप्ती गाणे गात असेल.
🌷🌷भविष्यकाळ :🌷🌷
क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला 'भविष्यकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी सिनेमाला जाईल.
b. मी शिक्षक बनेल.
c. मी तुझ्याकडे येईन.
🌷🌷iv) रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ🌷🌷
भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. अशा काळाला 'चालू-पूर्ण भूतकाळ' किंवा 'रीती भूतकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी रोज व्यायाम करीत होतो/असे.
b. ती दररोज मंदिरात जात होती/असे.
c. प्रसाद नियमित शाळेत जात होता/असे.
🌷🌷ii) अपूर्ण/चालू भूतकाळ🌷🌷
एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला 'अपूर्ण भूतकाळ/चालू भूतकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी आंबा खात होतो.
b. दीपक गाणे गात होता.
c. ती सायकल चालवत होती.
🌷🌷भूतकाळ :🌷🌷
जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला 'भूतकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. राम शाळेत गेला.
b. मी अभ्यास केला.
c. तिने जेवण केले.
भूतकाळचे 4 उपप्रकार पडतात.
🌷🌷iii) पूर्ण वर्तमान काळ🌷🌷
जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला 'पूर्ण वर्तमानकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी आंबा खाल्ला आहे.
b. आम्ही पेपर सोडविला आहे.
c. विधार्थ्यांनी अभ्यास केला आहे.
i) साधा वर्तमान काळ
🌿जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळात घडते तेव्हा त्याला 'साधा वर्तमानकाळ' असे म्हणतात.
उदा.
a. मी आंबा खातो.
b. कृष्णा क्रिकेट खेळतो.
c. प्रिया चहा पिते.
🌷🌷काळ व त्याचे प्रकार🌷🌷
·🌿 वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला 'काळ'असे म्हणतात.
·🌿 काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात.
1. वर्तमान काळ
2. भूतकाळ
3. भविष्यकाळ
🌿2. मृद वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात.
· उदा. ग, घ
· ज, झ
· ड, ढ
· द, ध
· ब ,भ
🌿1. स्पर्श व्यंजन : एकूण व्यंजन 25 आहेत.
· ज्याचा उच्चार करतांना फुफुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडतांना टाळू, कंठ, मुर्धा, दात, व ओठ यांचा स्पर्श
· करून बाहेर निघते म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन म्हणतात.
· उदा. क, ख, ग, घ, ड
· च, छ, ज, झ, त्र
· ट, ठ, ड, द, ण
· त, थ, द, ध, न
· प, फ, ब, भ, म
·🌺 2. स्वरादी : ज्याचा उच्चार करण्याअधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात.
· स्वर + आदी - स्वरादी
· दोन स्वरादी - अं, अः
· स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो.
· दोन नवे स्वरदी : ओ, औ
· हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत.
· उदा. बॅट, बॉल
🌿🌿वर्णमाला🌿🌿
🌷· वर्ण - आपल्या तोंडावाटे पडणार्या मूल ध्वनीला वर्ण असे म्हणतात.
· मराठीत एकूण 48 वर्ण आहेत.
1. स्वर
2. स्वरादी
3. व्यंजन
· 🌺 1. स्वर : ज्यांचा उच्चार करतांना जिभेचा मुखातील कोठल्याही अवयवांशी स्पर्श होत नाही त्यांना स्वर असे म्हणतात.
· अ, आ, इ, ई, ल्र, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ऋ
· स्वरांचे मुख्य प्रकार दोन आहेत.
· 🌾 1. र्हस्व स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना र्हस्व स्वर असे म्हणतात.
· अ, इ, ऋ, उ
·🌾 2. दीर्घ स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.
· आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ
❇️ मराठी व्याकरण - समानार्थी म्हणी ❇️
● गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून
● काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे
● घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच
● चोरावर मोर - शेरास सव्वाशेर
● जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम
● पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
● नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस
● नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा
● बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला
● पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
● वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला
● वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━