marathi | Education

Telegram-канал marathi - मराठी व्याकरण

208706

आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi

Subscribe to a channel

मराठी व्याकरण

🌿🌿ब) प्रत्ययघटित शब्द :-   🌿🌿   

प्रत्ययघटीत शब्द शब्दांच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही शब्द तयार होतात अशा अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात.  

धातूच्या किंवा शब्दांच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून प्रत्यय तयार होतात व तयार होणार्‍या शब्दांना 'प्रत्ययघटित शब्द' असे म्हणतात.

जन या धातूला प्रत्यय लागून जनन, जननी, जनता, जन्य यासारखे शब्द बनतात. या शब्दात न,क,ता,नी,य हे प्रत्यय होत. अशा त-हेचे प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना प्रत्ययघटीत शब्द असे म्हणतात.        

उदा.  

जनन, जनक, जननी, जनता, झोपाळू, ओढा         

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌿🌿साधित शब्द 🌿🌿

सिद्ध शब्दाला म्हणजेच धातूच्या पूर्वी उपसर्ग किंवा नंतर प्रत्यय लागून 'साधित शब्द' तयार होतो.          

कर यासारख्या सिद्ध धातूपासून करू, करून, कर्ता, करणारा, होकार, प्रतिकार, यासारखे शब्द बनवितात त्यांना साधित शब्द असे म्हणतात.               

साधित शब्दांचे पुढील चार प्रकार पडतात. 

Читать полностью…

मराठी व्याकरण

आज झालेला महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024

पेपर क्रमांक 1


जॉईन @MPSCMaterialKatta

Читать полностью…

मराठी व्याकरण

)🌿🌿 परकीय किंवा विदेशी शब्द🌿🌿

🌷इंग्रजी शब्द –       

टेबल, पेपर, मार्क, नंबर, टीचर, सर, म्याडम, ऑफीस, ट्रेन, रेल्वे, बस, टिकीट, इयव्हर, मोटर, कडक्टर, स्टेशन, पोस्ट, कार्ड, पार्सल, नर्स, डॉक्टर, पेशंट, इंजेक्शन, हॉस्पिटल, शर्ट, पैंट, बटन, बट, बॉल, ड्रेस, ग्लास इत्यादी. 

🌷पोर्तुगीज शब्द –     

बटाटा, तंबाखू, पगार, बिजागरे, कोबी, हापूस, फणस इत्यादी. 

🌷फारसी शब्द –      

खाना, सामान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, सौदागर, कामगार, गुन्हेगार, फडणवीस इत्यादी.                

🌷अरबी शब्द –

अर्ज, इनाम, हुकूम, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, वाद, मदत, बदल इत्यादी           

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌿इ) देशी किंवा देशज शब्द -     

महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्या शब्दांना 'देशी शब्द' असे म्हणतात.    

उदाहरणार्थ       

झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजरी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकुण, कंबर इत्यादी. 

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌿अ) तत्सम शब्द -          

जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना 'तत्सम शब्द' असे म्हणतात. 

उदाहरणार्थ           

कवि, मधु, गुरु, पिता, पुत्र, कन्या, वृक्ष, पुरुष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, पुष्प, जल, प्रीती, कर, ग्रंथ, पृथ्वी, भूगोल, विद्यवान, भगवान, परंतु, यद्यपि, यथामती, कर्ण, पर्ण, अरण्य, हस्त, मस्तक, कर्म, अग्नी, नदी, कमल इत्यादी       

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌿🌿शब्दसिद्धी 🌿🌿

शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच 'शब्दसिद्धी' असे म्हणतात.       

शब्दांचे दोन प्रकार आहेत.      

१) सिद्ध शब्द  

२) साधित शब्द       

Читать полностью…

मराठी व्याकरण

प्राचीन कर्मनी प्रयोग

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌷साकर्मक कर्तरी प्रयोग

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌷🌷५) अव्ययांचे व्याकरण चालवणे :-🌷🌷

🌿अव्यय :- मूळ शब्द, प्रकार, पोटप्रकार, असल्यास काही विशेष माहिती.

उदा.

१) मी व माझा भाऊ रोज देवाला नमस्कार करतो.

🌿व :- मूळ शब्द - व, 

🌿प्रकार - उभयान्वयी अव्यय, 

🌿पोटप्रकार - समुच्चयबोधक, 

🌿'मी' , 'भाऊ' या दोन शब्दांना जोडणारे.

 

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌷🌷३) विशेषणाचे व्याकरण चालवणे :-🌷🌷

🌿विशेषण :- मूळ शब्द, प्रकार, पोटप्रकार, कोणत्या विशेष्याबद्दल (नामाबद्दल) माहिती देते ते विशेष्य.

उदा.  

१) बागेत चार माळी काम करत होते.

🌿चार :- मूळ शब्द - चार, 

🌿प्रकार - विशेषण, 

🌿पोटप्रकार - संख्याविशेषण.  

🌿माळी या विशेष्याबद्दल (नामाबद्दल) विशेष माहिती देते

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌿१) नामाचे व्याकरण चालवणे :-🌿

🌷नाम :- मूळ शब्द, प्रकार, पोटप्रकार, लिंग, वचन, विभक्ती, विभक्तीचा अर्थ, वाक्यातील स्थान.

उदा.

१) त्यांनी घराला रंग दिला.

🌿घराला :- मूळ शब्द - घर, 

🌷प्रकार - नाम, 

🌿 - सामान्यनाम, 

🌿लिंग - नपुंसकलिंग, 

🌿वचन - एकवचन, 

🌿विभक्ती - चतुर्थी, 

🌿विभक्तीचा अर्थ - संप्रदान, 

🌿वाक्यातील स्थान - दिला या क्रियापदाचे अप्रत्यक्ष कर्म.

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌿2) साधीत शब्द🌿

·         सिद्ध शब्दाला म्हणजेच धातूच्या पूर्वी उपसर्ग किंवा नंतर प्रत्यय लागून 'साधित शब्द' तयार होतो.

·         साधित शब्दांचे पुढील 4 प्रकार पडतात

अ)उपसर्गघटित

 

ब) प्रत्ययघटित

 

क) अभ्यस्त  

 

ड) सामासिक

 

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌿5) अरबी शब्द

·         अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, शहर, नजर, खर्च, मनोरा, वाद, मदत, बदल. 

🌿6) कानडी शब्द  

·         हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, अडकित्ता, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, तूप, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ, तांब्या, उडीद, पाट, गाल, काका, टाळू, गादी, खिडकी, गच्ची, बांबू, ताई, गुंडी, कांबळे. 

🌿7) गुजराती शब्द

·         सदरा, दलाल, ढोकळा, घी, डबा, दादर, रिकामटेकडा, इजा, शेट. 

🌿8) हिन्दी शब्द

·         बच्चा, बात, भाई, दिल, दाम, करोड, बेटा, मिलाप, तपास, और, नानी, मंजूर,  इमली. 

🌿9) तेलगू शब्द

·         ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी. 

🌿10) तामिळ शब्द

·         चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा.

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌷देशी/देशीज शब्द :🌷

·         महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्‍या शब्दांना 'देशी शब्द' असे म्हणतात.

·         उदा.    

·         झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजारी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर, पीठ, डोळा, मुलगा, लाजरा, वेढा, गार, लाकूड, ओटी, वेडा, अबोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, आजार, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, डोंगर.      

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌿🌿अ) उपसर्गघटित :- 🌿🌿

मूळ शब्दाच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही साधित शब्द बनवितात. या अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात.  

शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात तसेच अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना 'उपसर्ग घटित शब्द' असे म्हणतात.  

शब्दांच्या पूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्गघटीत शब्द असे म्हणतात. 

उदाहरणार्थ  

आ + हार = आहार, याचप्रमाणे विहार, परिहार, विहार, अपहार, संहार, उपहार, प्रहार, उपाहार इत्यादी  

Читать полностью…

मराठी व्याकरण

▶️ आज झालेला महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024

⭕️ पेपर क्रमांक 1

जॉईन @MPSCMaterialKatta

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌿🌿ब. स्वदेशी शब्द ( परप्रांतीय भारतीय शब्द ) 🌿🌿

🌷कानडी शब्द –    

तूप, कुंची, हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ इत्यादी    

🌷गुजराती शब्द –   

घी, दादर, शेट, दलाल, डबा, रिकामटेकडा इत्यादी     

🌷तामिळी शब्द –

चिल्लीपिल्ली, सार, मठ्ठा इत्यादी    

🌷तेलगु शब्द –

ताळा, शिकेकाई, अनरसा, किडूकमिडूक, बंडी, डबी इत्यादी 

🌷हिंदी शब्द –     

भाई, बेटा, बच्चा, मिलाप, दाम, करोड, बात, दिल, तपास, और, नानी, मंजूर, इमली इत्यादी     

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌿ई) परभाषीय शब्द –  

संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना 'परभाषीय शब्द' असे म्हणतात.

याचे दोन उपप्रकार पडतात.      

अ. परकीय किंवा विदेशी शब्द  

ब. स्वदेशी शब्द (परप्रांतीय भारतीय शब्द)

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌿आ) तद्भव शब्द -    

जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येताना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना ' तद्भव शब्द' असे म्हणतात.

उदाहरणार्थ  

कान, चाक, आग, पान, विनंती, घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दुध, घास, कोवळा, ओठ, घाम, काम, इत्यादी     

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌿🌿१) सिद्ध शब्द :-        

शब्द जसा आहे तसाच त्याचा भाषेत उपयोग केला म्हणजे त्या शब्दाला सिद्ध शब्द म्हणतात.      

सिद्ध, साधित, उपसर्ग, प्रत्यय जा, ये, कर, बस, बोल, पी यासारखे मूळ धातू किंवा शब्द भाषेत असतात त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात.           

उदा.

ये, जा, पी, उठ, कर, गा इ.            

सिद्ध शब्दांचे चार प्रकार पडतात पुढीलप्रमाणे :-   

Читать полностью…

मराठी व्याकरण

प्रधान कर्तुत कर्मनी प्रयोग

Читать полностью…

मराठी व्याकरण

अकर्मक कर्तरी प्रयोग

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌷प्रयोग व त्याचे प्रकार

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌷४) क्रियापदाचे व्याकरण चालवणे :-🌷

🌿क्रियापद :- मूळ धातू, क्रियापदाचा प्रकार, रूप, अर्थ, काळ, लिंग, वचन, पुरुष, वाक्याचा प्रयोग.

उदा.  

१) संतोष अभ्यास करत होता.

🌿करत होता :- मूळ धातू - कर, 

🌿क्रियापदाचा प्रकार - संयुक्त क्रियापद, 

🌿रूप - करुणरूप,

🌿अर्थ - स्वार्थ, 

🌿काळ - अपूर्ण भूतकाळ, 

🌿लिंग - पुल्लिंग, 

🌿वचन - एकवचन, 

🌿पुरुष - तृतीय पुरुष, 

🌿प्रयोग - कर्तरी.

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌷) सर्वनामाचे व्याकरण चालवणे :-

🌿सर्वनाम :- मूळ शब्द, प्रकार, पोटप्रकार, लिंग, वचन, विभक्ती, विभक्तीचा अर्थ, वाक्यातील स्थान.

उदा.  

१) मी स्वत: एक कविता केली आहे.

🌿स्वत: :- मूळ शब्द - स्वत:, 

🌿प्रकार - सर्वनाम, 

🌿पोटप्रकार - आत्मवाचक सर्वनाम, 

🌿लिंग - उभयलिंगी, 

🌿वचन - एकवच, 

🌿विभक्ती - प्रथमा, 

🌿विभक्तीचा अर्थ - कर्ता, 

🌿वाक्यातील स्थान - कर्ता.

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌷🌷पदपरिस्फोट / व्याकरण चालवणे🌷🌷

🌿'शब्दांचे व्याकरण चालविणे’ म्हणजे वाक्यातील प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगणे होय.  

🌿आपण आतापर्यंत शब्दांचे आठ प्रकार, प्रत्येकाचे पोट प्रकार, नाम,किंवा सर्वनाम त्यांना होणा-या लिंग, वचन, विभक्ती या विकारांची, क्रियापदांचे काळ, अर्थ, प्रयोग, यांची संपूर्ण माहिती मिळविली.  

🌿या माहितीच्या ‘शब्दाचे व्याकरण चालविणे’ यासाठी उपयोग होतो. यालाच 'पदपरिस्फोट' असेही कोणी म्हणतात.

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌿 सिद्ध व सधीत शब्द :🌿

1) सिद्ध शब्द

·         भाषेत जे शब्द मुळात धातू असतात त्यांना 'सिद्ध शब्द' असे म्हणतात.

·         उदा. ये, जा, खा, पी, बस, उठ, कर, गा इत्यादी.

·         सिद्ध शब्दांचे 3 प्रकार पडतात.

अ). तत्सम  

 

ब). तदभव

 

क). देशी (यांचा अभ्यास आपण यापूर्वी केला आहे.)

 

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌷🌷परभाषीय शब्द :🌷🌷

संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना 'परभाषीय शब्द' असे म्हणतात.

 

🌿1) तुर्की शब्द

·         कालगी, बंदूक, कजाग

🌿2) इंग्रजी शब्द

·         टी.व्ही., डॉक्टर, कोर्ट, पेन, पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल, स्टॉप, ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, पॅंट, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, नंबर, टीचर, सर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, बटन ड्रेस, ग्लास, इत्यादी. 

🌿3) पोर्तुगीज शब्द

·         बटाटा, तंभाखू, पगार, बिजागरी, कोबी, हापूस, फणस, घमेले, पायरी, लोणचे, मेज, चावी, तुरुंग, तिजोरी, काडतुस.

🌿4) फारशी शब्द

·         रवाना, समान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागार, कामगार, गुन्हेगार, फडवणीस, बाम, लेजीम, शाई, गरीब, खानेसुमारी, हजार, शाहीर, मोहोर, सरकार,  महिना हप्ता. 

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌷तदभव शब्द :🌷

·         जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येतांना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना 'तदभव शब्द' असे म्हणतात.

·         उदा.    

·         घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओळ, काम, घाम, घडा, फुल, आसू, धुर, जुना, चाक, आग, धूळ, दिवा, पान, वीज, चामडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड, अडाणी, उधोग, शेत, पाणी, पेटी, विनंती, ओंजळ, आंधळा, काय, धुर, पंख, ताक, कान, गाय.

Читать полностью…
Subscribe to a channel