marathi | Education

Telegram-канал marathi - मराठी व्याकरण

221198

आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi

Subscribe to a channel

मराठी व्याकरण

नाम व त्याचे प्रकार :

प्रत्येक्षात असणार्याव किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात.
 उदा. टेबल, कागद, पेन, साखर, अप्सरा, गाडी, खरेपणा, औदार्थ, देव, स्वर्ग, पुस्तक इ.

नामाचे प्रकार :

नामाचे एकूण 3 मुख्य प्रकार पडतात.

सामान्य नाम

एकाच जातीच्या पदार्थातील समान गुण धर्मामुळे त्या वस्तूचे जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात.
 उदा. मुलगा, मुलगी, घर, शाळा, पुस्तक, नदी, शहर, साखर, पाणी, दूध, सोने, कापड, सैन्य, वर्ग इ.
 (सामान्य नाम हे जातीवाच असते, काही विशिष्ट नामांचेच अनेकवचन होते. मराठीमध्ये पदार्थवाचक, समुहवाचक नाम हे सामान्य नामच समजले जाते.)

विशेष नाम  

ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात.
 उदा. राम, आशा, हिमालय, गंगा, भारत, धुळे, मुंबई, दिल्ली, सचिन, अमेरिका, गोदावरी इ.
 (विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, विशेषनामाचे अनेकवचन होत नाही आल्यास सामान्य नाम समजावे.)
 उदा. या गावात बरेच नारद आहेत.सामान्य नामविशेषनाम      नदीगंगा, सिंधू, तापी, नर्मदा, गोदावरीपर्वतहिमालय, सहयाद्री, सातपुडामुलगास्वाधीन, हिमांशू, लक्ष्मण, कपिल, भैरवमुलगीमधुस्मिता, स्वागता, तारा, आशा, नलिनीशहरनगर, पुणे, दिल्ली, मुंबई, कोल्हापूर

भाववाचक नाम

ज्या नामाने प्राणी किंवा वस्तु यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो. त्याला भाववाचक नाम असे म्हणतात.
 उदा. धैर्य, किर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद इ.
 (पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिति किंवा क्रिया दाखविणार्यां नामांना भाववाचक नाम असे म्हणतात.
 उदा. धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य ही क्रियेला दिलेली नावे आहेत. वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण हे शब्द पदार्थाची स्थिती दाखवितात.)

भाववाचक नामे साधण्याचे प्रकार :

सामान्यनामे व विशेषनामे यांना आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पणा, य, या यासारखे प्रत्यय लावून नामे तयार होतात ती खालीलप्रमाणेशब्दप्रत्ययभाववाचक नामइतर उदाहरणे

 नवल

 श्रीमंत

 पाटील

 गुलाम

 शांत

 मनुष्य

 शहाणा

 सुंदर

 गोड

आई

  ई

  की

  गिरी

  ता

  त्व

  पण, पणा

  य

  वा

नवलाई

 श्रीमंती

 पाटीलकी

 गुलामगिरी

 शांतता

 मनुष्यत्व

 शहाणपण, पणा

 सौदर्य

 गोडवा

खोदाई, चपडाई, दांडगाई, धुलाई

 गरीबी, गोडी, लबाडी, वकिली

 आपुलकी, भिक्षुकी

 फसवेगिरी, लुच्चेगिरी

 क्रूरता, नम्रता, समता

 प्रौढत्व, मित्रत्व, शत्रुत्व

 देवपण, प्रामाणिकपणा, मोठेपण

 गांभीर्य, धैर्य, माधुर्य, शौर्य

 ओलावा, गारवा

नामाचे कार्य करणारे इतर शब्द :

नाम, सर्वनाम, विशेषण, ही जी नावे शब्दांच्या जातीला दिली जातात, ती त्यांच्या त्या त्या वाक्यातील कार्यावरून दिली जातात तीच गोष्ट येथेही लक्षात ठेवावयास हवी, सामान्यनाम, विशेषनाम, भाववाचकनाम ही नावे देखील नामांच्या विशिष्ट कार्यावरून दिली गेली आहेत. अशाच पद्धतीने नामांच्या कार्यावरून त्यांचे काही नियम आहेत ते खालीलप्रमाणे

नियम: 1. केव्हा-केव्हा सामान्यनाम हे विशेषनामांचे कार्य करतात.
उदा.    

आत्ताच मी नगरहून आलो.शेजारची तारा यंदा बी.ए. झाली.वरील वाक्यामध्ये वापरली गेलेली नगर कोणतेही शहर, तारा(नक्षत्र) ही मुळीच सामान्यनामे आहेत परंतु येथे ती विशेषनामे म्हणून वापरली गेलेली आहेत.

नियम: 2. केव्हा-केव्हा विशेषनाम सामान्य नामाचे कार्य करतात.
उदा.    

तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो.आमचे वडील म्हणजे जमदग्नि आहेत.आम्हाला आजच्या विधार्थ्यात सुदाम नकोत भीम हवेत.वरील वाक्यांत कुंभकर्ण, जमदग्नि, सुदाम, भीम गे मुळची विशेषनामे आहेत. पण येथे कुंभकर्ण अतिशय झोपाळू, जमदग्नि =अतिशय रागीट मनुष्य, सुदाम=अशक्त मुलगे व भीम=सशक्त मुलगे या अर्थाने वापरली आहेत. म्हणजे मुळची विशेषनामे वरील वाक्यांत सामान्य नामांचे कार्य करतात.

नियम: 3. केव्हा-केव्हा भाववाचक नामे विशेषनामांचे कार्य करते.
उदा.    

शांती ही माझ्या बहिणीची मुलगी.विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला.माधुरी उधा मुंबईला जाईल.वरील वाक्यात अधोरेखित केलेली शब्दे ही मुळची भाववाचक नामे आहेत. पण याठिकाणी त्यांचा वापर विशेषणामासारखा केला आहे.

नियम: 4. विशेषनामाचे अनेकवचन होत नाही झाल्यास त्यांना सामान्यनाम म्हणतात.
उदा.    

आमच्या वर्गात तीन पाटील आहेत.या गावात बरेच नारद आहेत.माझ्या आईने सोळा सोमवारांचे व्रत केले.विशेषनामाचे अनेकवचन होत नाही पण वरील वाक्यात विशेषनामे अनेकवचनी वापरलेली दिसतील या वाक्यातील विशेषनामे म्हणून वापरली आहेत.

नियम: 5. विशेषण केव्हा-केव्हा नामाचे कार्य करतात.
उदा.    

शहाण्याला शब्दांचा मार.श्रीमंतांना गर्व असतो.जातीच्या सुंदरांना काहीही शोभते.जगात गरीबांना मान मिळत नाही.वरील वाक्यात विशेषण ही नामासारखी वापरली आहेत.

नियम:

Читать полностью…

मराठी व्याकरण

०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी

Читать полностью…

मराठी व्याकरण

भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

MPSC ची तयारी करणाऱ्या परांडा तालुक्यातील (जि. धाराशिव) विद्यार्थी प्रथमेश देशमुख याने पुण्यात आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुःखद आहे.

🙏 स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मनापासून विनंती…

ज्या आईने स्वतः उपाशी राहून आपल्याला घास भरवला, ज्या वडिलांनी स्वतःची सुखं बाजूला ठेवून आपल्याला शिकवलं, त्यांच्या स्वप्नांना कदाचित आज आपण पूर्ण करू शकलो नसलो, तरी त्यांना आपलं यश नाही, सर्वात आधी आपलं आयुष्य हवं आहे.

आयुष्यात दुःख, समस्या आणि आव्हाने प्रत्येकाच्या वाट्याला येतात. वाईट काळ कायम राहत नाही; त्यानंतर चांगला काळ नक्की येतो.

म्हणून कोणत्याही क्षणी संयम सोडू नका. मनात काही असेल तर आई-वडील, मित्र, नातेवाईक, शिक्षक किंवा आमच्याशी मोकळेपणाने बोला.
प्रत्येक समस्येवर मार्ग असतो… पण त्यासाठी तुम्ही असणं गरजेचं आहे.

🙏 कृपया कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका.सदैव तुमच्या सोबत… ❤️

जिस माँ ने आँसू छुपाकर हमें हँसाया,
जिस पिता ने अपना सुख हम पर लुटाया…
उनके जीते-जी खुद को मत हराना...

Читать полностью…

मराठी व्याकरण

PSI मुख्य 2025 Cutoff 🔥

Open General - 278
Open Female - 257.50

Читать полностью…

मराठी व्याकरण

ंवा शब्दांच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून प्रत्यय तयार होतात व तयार होणार्‍या शब्दांना 'प्रत्ययघटित शब्द' असे म्हणतात.*


उदा. जनन, जनक, जननी, जनता इ.

वरील शब्दांना न,क, नी ता ही प्रत्यय लागलेली आपल्याला दिसतात असे प्रत्यय लावून तयार होणार्‍या शब्दांना 'प्रत्ययघटित शब्द' असे म्हणतात.

*क) अभ्यस्त शब्द—*

*एखाधा शब्दांत एका शब्दाची अथवा काही अक्षरांनी पुनरावृत्ती झालेली असते. अशा शब्दांना 'अभ्यस्त शब्द' असे म्हणतात. अभ्यसतचा अर्थ दुप्पट करणे असा होतो.*


उदा. आतल्या आत, शेजरीपाजारी, किरकिर इ.

*अभ्यस्त शब्दांचे खलील 3 प्रकार पडतात.*

*i) पूर्णाभ्यस्त*

*ii) अंशाभ्यस्त*

*iii) अनुकरणवाचक*


*i) पूर्णाभ्यस्त शब्द—*

*एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा येऊन जोडशब्द तयार होतो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात.*

उदा. बारीक बारीक, कळाकाळा, आतल्या आत, हळहळ, वटवट, कळकळ, मळमळ, बडबड, समोरासमोर, हळूहळू, पुढेपुढे, पैसाच पैसा, मजाच मजा, हिरवेहिरवे इ.

*ii) अंशाभ्यस्त शब्द—*

*जेव्हा पूर्ण शब्द हा जोडशब्दात जशाच्या तसा पुन्हा येतो एखादे अक्षर बदलून येतो तेव्हा त्या जोडशब्दांना अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात.*

उदा. अदलाबदल, उलटसुलटा, शेजारीपाजारी, बारीकसारीक, लाडीगोडी, सोक्षमोक्ष, जिकडेतिकडे, गोडधोड, गडबड, जाळपोळ, दगडबिगड, किडूकमिडूक, घरबीर इ.

*iii) अनुकरणवाचक शब्द—*

*ज्या शब्दांमध्ये एखाधा ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते, अशा शब्दांना अनुकरणवाचक/नादानुकारी शब्द असे म्हणतात.*

उदा. किरकिर, खडखडाट, रिमझिम, गुणगुण, घणघण, कडकडाट, टिकटिक, गडगड इ.

*ड) सामासिक शब्द—*

*जेव्हा दोन किंवा अधिक शब्द एकमेकांमधील परस्पर संबंधामुळे एकत्र येऊन तयार होणार्‍या शब्दाला 'सामासिक शब्द' असे म्हणतात.*

उदा. पोळपाट, देवघर, दारोदार इ.

Читать полностью…

मराठी व्याकरण

1. स्पर्श व्यंजन : एकूण व्यंजन 25 आहेत. 
                ज्याचा उच्चार करतांना फुफुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडतांना टाळू, कंठ, मुर्धा, दात, व ओठ यांचा स्पर्श 
                करून बाहेर निघते म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन म्हणतात.
                उदा. क, ख, ग, घ, ड
                    च, छ, ज, झ, त्र
                    ट, ठ, ड, द, ण
                    त, थ, द, ध, न
                    प, फ, ब, भ, म
     स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
1. कठोर वर्ण 
2. मृदु वर्ण 
3. अनुनासिक वर्ण 

1. कठोर वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.
              उदा. क, ख
                  च, छ
                  ट, ठ 
                  त, थ 
                  प, फ

2. मृद वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात. 
            उदा. ग, घ
                ज, झ
                ड, ढ
                द, ध
                ब ,भ

3. अनुनासिक वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात. 
                  उदा. ड, त्र, ण, न, म      

Читать полностью…

मराठी व्याकरण

उत्तरे:
249)-3
250)-2
251)-2
252)-4

Читать полностью…

मराठी व्याकरण

उत्तरे:

241)-1

242)-1

243)-1

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔹अर्थावरून पडणारे प्रकार-
1)विधानार्थी वाक्य

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌷🌷वर्णमाला🌷🌷

तोंडावाटे निघणार्‍या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. बोलतांना आपले मूलध्वनी हवेत विरू नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो. ज्या सांकेतिक खुणांनी आपण मूलध्वनी लिहून ठेवतो त्या संकेतिक खुणेला ध्वनीचिन्हे किंवा अक्षर असे म्हणतात. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. मराठी भाषेत एकूण 48 वर्ण आहेत. या वर्णाच्या मालीकेलाच वर्णमाला किंवा मुळाक्षरे असे म्हणतात.

Читать полностью…

मराठी व्याकरण

📍 राज्यसेवा Cutoff

General:- 942
Female :- 959

Читать полностью…

मराठी व्याकरण

उत्तरे:
226)-2
227)-1
228)-1

Читать полностью…

मराठी व्याकरण

उत्तरे
221)-1
222)-2
223)-2
224)-3
225)-2

Читать полностью…

मराठी व्याकरण

उत्तरे
215)-3
216)-2
217)-1
218)-3
219)-3
220)-2

Читать полностью…

मराठी व्याकरण

सामान्य नामे व विशेषणापासून तयार झालेली भाववाचक नामे

Читать полностью…

मराठी व्याकरण

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक✅

Читать полностью…

मराठी व्याकरण

#मराठी_साहीत्यातील_महत्वाच्या_कादंबऱ्या
.
1.ययाती------- वि.स.खांडेकर
2.गारंबीचा बापू--श्री ना पेंडसे
3. रथचक्र------श्री ना पेंडसे
4. शितू-------- गो.नी.दांडेकर
5. बनगरवाडी-- व्यंकटेश मांडगूळकर
6. फकिरा------अण्णाभाऊ साठे
7. स्वांमी ------रणजित देसाई
8. श्रीमान योगी-रणजित देसाई
9. कोसला------भालचंद्र नेमाडे
10. कोंडूरा-----शिवाजीराव सावंत
11. झुंज-------ना.स.इनामदार
12. आनंदी गोपाळ--श्री.ज.जोशी
13. माहीमची खाडी--मधु
मंगेश कर्णिक
14. गोतावळा-------आनंद य़ादव
15. पाचोळा--------रा.रं.बोराडे
16. मुंबई दिनांक----अरुण साधु
17. सिंहासन-------अरुण साधु
18. गांधारी---------ना.धो.महानोर
19.वस्ती वाढते आहे-भा.ल.पाटील
20. थँक यू मिस्टर ग्लाड---अनिल बर्वे
21. घर गंगेच्या काठी------ज्योत्स्ना देवध
रे22. वस्ती--------------- महादेव मोरे
23. पवनाकाठचा धोंडी ----गो.नी.दांडेकर
24. सावित्री------------- पु.शी.रेगे
25. बॅरिस्टर------------ जयवंत दळवी
26. श्यामची आई---------सानेगुरुजी
27. आस्तीक ----------- साने गुरुजी
28. अकुलिना------------पु.भा.भावे
29. आकाशाची फळे------ग.दि.मांडगूळकर
30. काळेपाणी-----------वि.दा.सावरकर
31. मृण्मयी-------------गो.नी.दांडेकर
32. पडघवली-----------गो.नी.दांडेकर
33. अमृतवेल-----------वि.स.खांडेकर.

Читать полностью…

मराठी व्याकरण

मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६ - प्रश्नपत्रिका

Paper 1 ✅ मराठी व इंग्रजी

Читать полностью…

मराठी व्याकरण

जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - पोलीस उप निरीक्षक मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी.

Читать полностью…

मराठी व्याकरण

*मराठी व्याकरण*

*शब्दसिद्धी व त्याचे प्रकार*

*शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच 'शब्दसिद्धी' असे म्हणतात.*

*शब्दांचे खालील प्रकार पडतात.*

*तत्सम शब्द :*

जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बादल न होता आले आहेत त्यांना *'तत्सम शब्द'* असे म्हणतात.

*उदा.*

राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, अधापि, मति, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, उमेश, स्वामि, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प, घृणा, पिंड, कलश, प्रात:क, दंड, पत्र, ग्रंथ, उत्तम, आकाश पाप, मंत्र, शिखर, सूत्र, कार्य, होम, गणेश, सभ्य, कन्या, देवर्षि, वृद्ध, संसार, प्रीत्यर्थ, कविता, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद, अब्ज, राजा, संमती, घंटा, पुण्य, बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा, प्रकाश, सत्कार, देवालय, तारा, समर्थन, नयन, उत्सव, दुष्परिणाम, नैवेध.


*तदभव शब्द :*

*जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येतांना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना 'तदभव शब्द' असे म्हणतात.*

*उदा.*

घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओळ, काम, घाम, घडा, फुल, आसू, धुर, जुना, चाक, आग, धूळ, दिवा, पान, वीज, चामडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड, अडाणी, उधोग, शेत, पाणी, पेटी, विनंती, ओंजळ, आंधळा, काय, धुर, पंख, ताक, कान, गाय.

*देशी/देशीज शब्द :*

*महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्‍या शब्दांना 'देशी शब्द' असे म्हणतात.*

*उदा.*

झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजारी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर, पीठ, डोळा, मुलगा, लाजरा, वेढा, गार, लाकूड, ओटी, वेडा, अबोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, आजार, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, डोंगर.

*परभाषीय शब्द :*

*संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना 'परभाषीय शब्द' असे म्हणतात.*

*1) तुर्की शब्द*
कालगी, बंदूक, कजाग

*2) इंग्रजी शब्द*
टी.व्ही., डॉक्टर, कोर्ट, पेन, पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल, स्टॉप, ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, पॅंट, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, नंबर, टीचर, सर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, बटन ड्रेस, ग्लास, इत्यादी.

*3) पोर्तुगीज शब्द*
बटाटा, तंभाखू, पगार, बिजागरी, कोबी, हापूस, फणस, घमेले, पायरी, लोणचे, मेज, चावी, तुरुंग, तिजोरी, काडतुस.

*4) फारशी शब्द*
रवाना, समान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागार, कामगार, गुन्हेगार, फडवणीस, बाम, लेजीम, शाई, गरीब, खानेसुमारी, हजार, शाहीर, मोहोर, सरकार, महिना हप्ता.

*5) अरबी शब्द*
अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, शहर, नजर, खर्च, मनोरा, वाद, मदत, बदल.

*6) कानडी शब्द*
हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, अडकित्ता, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, तूप, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ, तांब्या, उडीद, पाट, गाल, काका, टाळू, गादी, खिडकी, गच्ची, बांबू, ताई, गुंडी, कांबळे.

*7) गुजराती शब्द*
सदरा, दलाल, ढोकळा, घी, डबा, दादर, रिकामटेकडा, इजा, शेट.

*8) हिन्दी शब्द*
बच्चा, बात, भाई, दिल, दाम, करोड, बेटा, मिलाप, तपास, और, नानी, मंजूर, इमली.

*9) तेलगू शब्द*
ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी.

*10) तामिळ शब्द*
चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा.


*सिद्ध व सधीत शब्द :*

*1) सिद्ध शब्द—*

*भाषेत जे शब्द मुळात धातू असतात त्यांना 'सिद्ध शब्द' असे म्हणतात.*

उदा. ये, जा, खा, पी, बस, उठ, कर, गा इत्यादी.

*सिद्ध शब्दांचे 3 प्रकार पडतात.*

*अ) तत्सम*

*ब) तदभव*

*क) देशी (यांचा अभ्यास आपण यापूर्वी केला आहे)*

*2) साधीत शब्द—*

*सिद्ध शब्दाला म्हणजेच धातूच्या पूर्वी उपसर्ग किंवा नंतर प्रत्यय लागून 'साधित शब्द' तयार होतो.*

*साधित शब्दांचे पुढील 4 प्रकार पडतात*

*अ)उपसर्गघटित*

*ब) प्रत्ययघटित*

*क) अभ्यस्त*

*ड) सामासिक*

*अ) उपसर्गघटित शब्द—*

*शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात. तसेच अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना 'उपसर्ग घटित शब्द' असे म्हणतात.*


उदा. अनुभव, अपयश, अधिकार, अवगुण अधिपती, उपहार, आकार, साकार, प्रतिकार, प्रकार इ.

वरील शब्दांमध्ये अनु. अप, अधि, अव, अधि, उप, आ, सा, प्रति,प्रइ. उपसर्ग लागलेली आपल्याला दिसतात. असे उपसर्ग लागून तयार होणार्‍या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे
म्हणतात


*ब) प्रत्ययघटित शब्द—*

*धातूच्या कि

Читать полностью…

मराठी व्याकरण

उत्तरे:
253)-4
254)-2
255)-3
256)-3
257)-4

Читать полностью…

मराठी व्याकरण

उत्तरे:
244)-2
245)-3
246)-4
247)-4
248)-2

Читать полностью…

मराठी व्याकरण

2)प्रश्नार्थी वाक्य
3)उद्गारार्थी वाक्य

Читать полностью…

मराठी व्याकरण

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ, अं, अ:
क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ

मराठीत एकूण 48 वर्ण आहेत.

🌷स्वर

🌷स्वरादी

🌷व्यंजन

📌📌📌📌📌📌📌
Join
/channel/marathi

Читать полностью…

मराठी व्याकरण

@Marathi

🔹अध्याक्षर अ पासून समानार्थी शब्द:

अनाथ = पोरका
अनर्थ = संकट
अपघात = दुर्घटना
अपेक्षाभंग = हिरमोड
अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
अभिनंदन = गौरव
अभिमान = गर्व
अभिनेता = नट
अरण्य = वन, जंगल, कानन
अवघड = कठीण
अवचित = एकदम
अवर्षण = दुष्काळ
अविरत = सतत, अखंड
अडचण = समस्या
अभ्यास = सराव
अन्न = आहार, खाद्य
अग्नी = आग
अचल = शांत, स्थिर
अचंबा = आश्चर्य, नवल
अतिथी = पाहुणा
अत्याचार = अन्याय
अपराध = गुन्हा, दोष
अपमान = मानभंग
अपाय = इजा
अश्रू = आसू
अंबर = वस्त्र
अमृत = पीयूष
अहंकार = गर्व
अंक = आकडा
_________________________
जॉईन करा आमचे @marathi चॅनेल

Читать полностью…

मराठी व्याकरण

उत्तरे:
229)-1
230)-1
231)-4
232)-4
233)-2
234)-4

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔹समानार्थी शब्द🔹
---------------------------------------------
📌पय- पाणी ,दूध

📌प्रकाश -उजेड ,आलोक

📌फिदा- खुश , आसक्त

📌 पत्नी - भार्या, बायको, अर्धांगी, अस्तुरी
 
📌 पान - पर्ण, पत्र, दल
 
📌 परंपरा - प्रथा, पद्धत, चाल, रीत
 
📌 प्रभात - उषा, पहाट, प्रात:काल
 
📌 पाठ - नियम, धडा, पुन्हा-पुन्हा म्हणने, पार्श्वभाग
 
📌 पार्वती - उमा, दुर्गा, गौरी, भवानी
 
📌पुष्प - कुसुम, सुमन, फूल
 
📌पिता - जनक, तीर्थरुप, बाप, वडील
 
📌प्रताप - शौर्य, बहादुरी, पराक्रम, सामर्थ्य
 
📌पुरुष - मर्द, नर, मनुष्य
 
📌पाखरू - पक्षी, खग, द्विज, विहंग
 
📌पुरातन - जुनाट, प्राचीन, पूर्वीचा
 
📌प्रख्यात - ख्यातनाम, प्रसिद्ध,

Читать полностью…

मराठी व्याकरण

📕 *मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द*

https://whatsapp.com/channel/0029VamWGCWAYlUDpeXe5c3s

● रसिक x अरसिक

● उंच x सखल

● आवक x जावक

● कमाल x किमान

● उच्च x नीच

● आस्तिक x नास्तिक

● अल्पायुषी x दीर्घायुषी

● अर्वाचीन x प्राचीन

● उगवती x मावळती

● अपराधी x निरपराधी

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 *स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा....*
https://whatsapp.com/channel/0029VamWGCWAYlUDpeXe5c3s
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Читать полностью…

मराठी व्याकरण

उत्तरे
211)-4
212)-4
213)-1
214)-2

Читать полностью…

मराठी व्याकरण

उत्तरे
206)-2
207)-2
208)-3
209)-4
210)-4

Читать полностью…
Subscribe to a channel