chalughadamodi | Education

Telegram-канал chalughadamodi - 🔰 Current Affairs Marathi 🔰

214771

कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.) जॉईन करा @ChaluGhadamodi @eMPSCkatta @MPSCMaterial @MPSCEconomics @Marathi

Subscribe to a channel

🔰 Current Affairs Marathi 🔰

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज कार्यभार स्वीकारला.

- 1994 च्या बॅचचे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असलेले विकास खारगे हे सध्या वन विभागाचे प्रधान सचिव होते.

- भारतीय प्रशासन सेवेत त्यांनी त्यांच्या बॅचमध्ये देशात 34 वा आणि महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळविला होता.

-2014 मध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांचे सचिव म्हणून देखील काम पाहिले होते.
------------------------------------------------
जॉईन करा. @chaluGhadamodi

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔷डोपिंगप्रकरणी रशियाला दणका! २०२० ऑलिम्पिक स्पर्धा, २०२२ विश्वचषक स्पर्धांना मुकणार

- अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच ‘वाडा’ने डोपिंगच्या आरोपाखाली रशियावर ४ वर्षांसाठी बंदी घातली आहे. त्यामुळे आता पुढील चार वर्षे रशियाचा कोणताही खेळाडू कोणत्याही ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. रशियाच्या खेळाडूंबाबत डोपिंगची अनेक प्रकरणे उघडकीस आली होती, त्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोपदेखील झाले.

- ‘वाडा’ने रशियावर चार वर्षांची ऑलिम्पिकबंदी घातली. त्यामुळे पुढची चार वर्षे रशियाचा ध्वज, राष्ट्रगीत आणि संघाचे नाव ऑलिम्पिकमध्ये कुठेही पाहायला किंवा ऐकायला मिळणार नाही.

- रशियाकडून डोपिंगबाबत चुकीची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर लगेच रशियावर चार वर्षांच्या बंदीची शिफारस करण्यात आली होती. रशियन खेळाडूंचा चुकीचा डोपिंग अहवाल ‘वाडा’कडे पाठविला गेला होता. तो आरोप रशियाच्या शासकीय क्रीडा समित्यांसह मान्य करण्यात आला. तेव्हापासून हा वाद क्रीडा जगात चर्चेत होता. या अहवालानंतर २०१४ मध्ये रशियाच्या ऑलिम्पिक कामगिरीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
---------------------------------------------
जॉईन करा.@ ChaluGhadamodi

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔷आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन: 9 डिसेंबर

- दरवर्षी 9 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन (किंवा लाचलुचपत प्रतिबंधक दिन) म्हणून जगभरात साजरा केला जातो.

- यावर्षी, हा दिवस 'युनायटेड अगेन्स्ट करप्शन फॉर डेवलपमेंट, पीस अँड सेक्युरिटी' संकल्पनेखाली साजरा केला गेला. याशिवाय, जगभरात “युनायटेड अगेन्स्ट करप्शन” या नावाने एक जागतिक मोहीम चालवली जात आहे.

▪️भ्रष्टाचार म्हणजे काय?

- भ्रष्टाचार ही एक किचकट सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बाब आहे जी सर्व देशांवर नकारात्मक परिणाम करते. भ्रष्टाचार लोकशाही संस्थेची अधोगती करते, आर्थिक विकास धीमा करते आणि सरकारी अस्थिरतेला हातभार लावते.

- कर्मचाऱ्यांकडून होण्याची शक्यता असलेल्या भ्रष्टाचाराचा उल्लेख कौटिल्याच्या अर्थशास्त्रात करण्यात आला आहे. न्या. पी.बी. सावंत चौकशी आयोगाने सादर केलेल्या चौकशी अहवालात भ्रष्टाचाराच्या व्याख्येत लाचखोरीबरोबर जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीची बेपर्वाई, अपव्यय, पक्षपातीपणा यांचाही समावेश करण्यात आला आहे.

▪️पार्श्वभूमी

- 31 ऑक्टोबर 2003 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने भ्रष्टाचाराच्या विरोधात एक दिवस पाळण्यासाठी यासंबंधीचा ठराव मंजूर केल्यानंतर दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

- प्रत्येक वर्षी एक लक्ष कोटी (महादम / ट्रिलियन) डॉलर एवढी लाच जगभरात दिली जाते, तर अंदाजे 2.6 महादम डॉलरचा भ्रष्ट व्यवहार होतो. ही रक्कम जागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (GDP) 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) याच्यानुसार, विकसनशील देशांमध्ये, भ्रष्टाचाराचा निधी हा अधिकृत विकास सहाय्याच्या 10 पटीने अधिक आहे.

- भारतात ‘भारतीय दंडविधान संहिता 161’ यामध्ये भ्रष्टाचारविरोधी तरतूद आहे. त्याच्या अनुषंगाने ‘भ्रष्टाचारविरोधी कायदा-1988’ तयार करण्यात आला.
-----------------------------------------------
जॉईन करा. @chaluGhadamodi

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

_______________________________
|| eCAD December 2019 ||

|| इ-कॅड डिसेंबर 2019 ||

- Xerox Edition
_______________________________
| True PDF |
| Size: 14.7 MB |

▪️मागील महिन्यांची मासिके डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा: http://empsckatta.blogspot.com/2019/01/ecad-magazine.html?m=1
--------------------------------------------
जॉईन करा @MPSCMaterial

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

_______________________________
|| eCAD December 2019 ||

|| इ-कॅड डिसेंबर 2019 ||
_______________________________

| True PDF |

Download:
/channel/MPSCMaterial/2858

▪️मागील महिन्यांची मासिके डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा: http://empsckatta.blogspot.com/2019/01/ecad-magazine.html?m=1
------------------------------------------------
अधिक मटेरियलसाठी जॉईन करा @MPSCMaterial

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

संपादकीय पान 9 डिसेंबर 2019 By @eMPSCkatta

● लोकसत्ता
● सकाळ
● महाराष्ट्र टाईम्स
● तरुण भारत
● लोकमत
---------------------------------------
जॉईन करा @eMPSCkatta

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔷PMOच्या एकाधिकारशाहीमुळे अर्थव्यवस्थेला खिळ: राजन

- सर्वच अधिकार पंतप्रधान कार्यालयात एकवटल्याने इतर मंत्र्यांकडे अधिकार नाहीत त्यामळे भारतीय झाली असून नजिकच्या काळात ती आणखी खोलात जाईल, अशी भीती रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी व्यक्त केली आहे.

- अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी राजन यांनी काही सूचना केल्या आहेत. भांडवली बाजार आणि गुंतवणूक, जमीन, कामगार कायदा या कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची गरज राजन यांनी व्यक्त केली आहे.

- राजन म्हणतात की भारताने मुक्त व्यापार करारात उत्स्फूर्तपणे सहभागी झालं पाहिजे. यामुळं देशात स्पर्धा निकोप होईल आणि देशांतर्गत कार्यक्षमता वाढेल, असं राजन यांनी म्हटलं आहे.

- अर्थव्यवस्थेचं गणित कुठं बिघडलं हे जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा पंतप्रधान कार्यालयात झालेले अधिकारांचे केंद्रीकरण आहे. इथले निर्णय आणि नवं कल्पना या पंतप्रधान आणि आजूबाजूच्या मोजक्या लोकांकडून घेण्यात येत

- आल्याबद्दल राजन यांनी नाराजी व्यक्त केली. ही यंत्रणा पक्ष आणि राजकारण करण्यासाठी योग्य आहे. मात्र अर्थव्यवस्थेला दिशा देण्यासाठी राज्य पातळीऐवजी राष्ट्रीय पातळीवर व्यापक विचार करणारी दृष्टी आणि तज्ज्ञ आवश्यक्य आहेत, असे राजन यांनी म्हटलं आहे.
--------------------------------------------------
जॉईन करा. @chaluGhadamodi

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔷चौथी ‘भारत जल प्रभाव शिखर परिषद’ नवी दिल्लीत संपन्न

- 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर या काळात 'व्हॅल्यूइंग वॉटर - ट्रान्सफॉर्मिंग गंगा' या विषयाखाली चौथी ‘भारत जल प्रभाव शिखर परिषद’ पार पडली.

- या कार्यक्रमाचे उद्घाटन जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या हस्ते झाले.

- IIT कानपूरच्या नेतृत्वात भारत सरकारचे जल शक्ती मंत्रालय आणि सेंटर फॉर गंगा रिव्हर बेसिन मॅनेजमेंट अँड स्टडीज (cGanga) या संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

▪️कार्यक्रमातल्या ठळक बाबी

- पाणीपुरवठ्याशी संबंधित मुद्द्यांवर आणि त्याच्या संवर्धनाबाबत उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
-कार्यक्रमादरम्यान, 'रिव्हर रिस्टोरेशन अँड कन्झर्वेशन - ए कॉन्सिस मॅन्युअल अँड गाईड' यासंबंधीचा अहवाल तसेच आतापर्यंत विकसित केलेल्या 'गंगा हब' यांचा हवाला जाहीर करण्यात आला.बैठकीत ग्रामीण व शहरी भागातल्या जलसंपत्तीच्या एकात्मिक व्यवस्थापनावर भर देण्यात आला.
--------------------------------------------------जॉईन करा. @chaluGhadamodi

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

चालू घडामोडी 8 डिसेंबर 2019 by @eMPSCkatta

● लोकसत्ता
● सकाळ
● महाराष्ट्र टाईम्स
● तरुण भारत
● लोकमत
---------------------------------------
जॉईन करा @ChaluGhadamodi

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔹मासात्सुगू असाकावा: आशियाई विकास बँकेचे (ADB) नवे अध्यक्ष

जापानचे मासात्सुगू असाकावा ह्यांची आशियाई विकास बँक (ADB) याच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. ताकेहिको नाकाओ ह्यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

मासात्सुगू असाकावा हे आशियाई विकास बँकेचे 10 वे अध्यक्ष असणार. ते 17 जानेवारी 2020 रोजी पदभार सांभाळतील. सध्या ते जापानचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांचे विशेष सल्लागार म्हणून काम करीत आहेत.

▪️आशियाई विकास बँक (ADB)

आशियाई विकास बँक (ADB) ही एक प्रादेशिक विकास बँक आहे, ज्याची स्थापना दि. 19 डिसेंबर 1966 रोजी आशियाई देशांमधल्या आर्थिक विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याच्या हेतूने केली गेली. मंडालुयोंग (मनिला, फिलीपिन्स) येथे त्याचे मुख्यालय आहे.

“फाइटींग पॉव्हर्टी इन एशिया अँड द पॅसिफिक” हे ADB चे घोषवाक्य आहे. त्याचे 68 देश सभासद आहेत.

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔷बायोमेट्रिक माहितीच्या हाताळणीत भारत जगातला पाचव्या क्रमांकाचा सर्वात वाईट देश

- कंपेयरिटेक (ब्रिटन) या संस्थेनी बायोमेट्रिक माहितीची हाताळणी याबाबत आपला एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

- अश्या अभ्यासासाठी, संशोधकांनी बायोमेट्रिक्स माहिती कुठे घेतली जात आहे, ते कशासाठी घेतले जात आहे आणि ते कसे संग्रहित केले जात आहेत, हे शोधण्यासाठी 50 वेगवेगळ्या देशांचे विश्लेषण केले.

- प्रत्येक देशाला 25 पैकी गुण देण्यात आले आहेत, ज्यामध्ये अधिक गुण म्हणजे सर्वात वाईट तर कमी गुण म्हणजे योग्यप्रकारे माहितीचा नियंत्रित वापर असा अर्थ होतो.

▪️ठळक बाबी

-बायोमेट्रिक माहितीचा व्यापकपणे आणि अनियंत्रित वापर करण्याच्या संदर्भात भारत जगातला पाचव्या क्रमांकाचा सर्वात वाईट देश आहे. यादीत, भारत तैवान, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स यांच्यासह पाचव्या क्रमांकावर आहे.

- तर या बाबतीत चीन जगातला सर्वात वाईट देश ठरत आहे. त्याच्या पाठोपाठ मलेशिया, पाकिस्तान आणि अमेरिका या देशांचा क्रम लागतो.

- चीनने 25 पैकी 24 गुण मिळाले आहेत, तर भारताला 19 गुण मिळालेत.

- या बाबतीत सर्वात वाईट देशांच्या यादीमध्ये भारत तुलनेने खाली आहे कारण तो कायद्याच्या अंमलबजावणीला राष्ट्रीय बायोमेट्रिक (आधार) डेटाबेसमध्ये प्रवेश मिळविण्यास परवानगी देत ​​नाही.

- योग्य निर्बंधांमुळे युरोपीय संघातले देश यादीत तळाशी आहेत, ज्यात आयर्लंड, पोर्तुगाल, सायप्रस, ब्रिटन आणि रोमेनिया हे पाच सर्वोत्तम देश म्हणून उदयास आले आहेत.
---------------------------------------------------
जॉईन करा @chaluGhadamodi

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔷पंतप्रधान मोदींनी घेतली मॉरिशसच्या पंतप्रधानांची भेट

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत मॉरिशसचे पंतप्रधान प्रविण जगन्नाथ यांची भेट घेतली. पंतप्रधान जगन्नाथ, पत्नी कविता जगन्नाथ यांच्यासोबत भारताच्या खासगी दौऱ्यावर आले आहेत.

- मोठ्या जनमताने पंतप्रधानपदी फेरनिवड झाल्याबद्दल जगन्नाथ यांचे पंतप्रधान मोदी यांनी अभिनंदन केले. पंतप्रधान जगन्नाथ यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आणि दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरूच्चार केला.

- मॉरिशसमध्ये राबवण्यात येत असलेल्या मेट्रो एक्सप्रेस प्रकल्प, ईएनटी रुग्णालये, सामाजिक गृहनिर्माण प्रकल्प यासारख्या अनेक विकास सहकार्य प्रकल्पांमध्ये भारताने केलेल्या सहाय्याबद्दल पंतप्रधान जगन्नाथ यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

- नवीन कार्यकाळात मॉरिशसच्या सर्वांगीण विकासाला गती देणे आणि भारताबरोबर सहकार्याची व्याप्ती वाढवणे याला आपले प्राधान्य राहील, असे जगन्नाथ यांनी नमूद केले. या प्रयत्नात भारत महत्वाची भूमिका पार पाडेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

- अधिक सुरक्षित, स्थिर आणि समृद्ध मॉरिशसच्या निर्मितीसाठी भारताचा पाठिंबा यापुढेही राहील, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली.

- बहुआयामी द्विपक्षीय संबंध तसेच परस्पर हित आणि प्राधान्याच्या आधारे सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.

--------------------------------------------------
जॉईन करा.@ChaluGhadamodi

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔷राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल’ पुरस्कारांचे वितरण

- भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते 5 डिसेंबर 2019 रोजी एका समारंभात ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल’ पुरस्कार देऊन 36 जणांचा सन्मान करण्यात आला.

- त्यामध्ये, केरळच्या कोझिकोड येथल्या दिवंगत लिनी साजीश ह्यांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला आहे. कर्तव्य बजावत असताना त्यांना निपाह रोगाची लागण होऊन त्या मरण पावल्या.

▪️पुरस्काराविषयी

- ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल’ पुरस्कार भारत सरकारच्या वतीने दिला जातो. हा पुरस्कार देशभरातल्या उत्कृष्ट काम करणार्‍या सहाय्यक नर्स मिडवाइव (सुइणी / ANM), लेडी हेल्थ व्हिजिटर (LHV) आणि परिचारिकांना दिला जातो. हा पुरस्कार फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या स्मृतीत दिला जातो.

- ब्रिटिश फ्लॉरेन्स नाईटिंगेल (1820-1910) ह्यांना आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक तसेच “लेडी विथ द लॅम्प” म्हणून देखील ओळखले जाते.

- 2020 साली फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांची 200 वी जयंती साजरी केली जाणार आहे.
जॉईन करा. @chaluGhadamodi

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

चालू घडामोडी 7 डिसेंबर 2019 by @eMPSCkatta

● लोकसत्ता
● सकाळ
● महाराष्ट्र टाईम्स
● तरुण भारत
● लोकमत
---------------------------------------
जॉईन करा @ChaluGhadamodi

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔷RBI पतधोरणात समितीने रेपो दर 5.15 टक्क्यांवर कायम ठेवला

- गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय रिझर्व्ह बँकेनी द्विमाही पतधोरणात समितीच्या पाचव्या बैठकीत रेपो दर स्थिर म्हणजेच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेपो दर 5.15 टक्क्यांवर कायम राहणार आहे.

- भारतीय रिझर्व्ह बँकेकडून गेल्या बैठकीत 0.35 टक्क्याची म्हणजेच 35 बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आली होती.

▪️बैठकीत स्पष्ट झालेल्या बाबी

- रिव्हर्स रेपो दर 4.90 टक्के आणि बँक दर 5.40 टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे.

- चालू आर्थिक वर्षासाठी विकास दराच्या अंदाजातही रिझर्व्ह बँकेने बदल केला आहे. आधी विकासदर 6.1 टक्के इतका राहणार, असा अंदाज होता. परंतू, सुधारित अंदाजानुसार तो 5 टक्के इतकाच राहणार आहे. आतापर्यंत RBIने गेल्या आठ महिन्यांमध्ये पाच वेळा दरात कपात केलेली होती.

- लक्ष्यित महागाईचा दर 4 टक्के आहे.

- किरकोळ महागाईचा अंदाज वाढवीत तो आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या सहामाहीसाठी 5.1-4.7 टक्के आणि 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीसाठी 4.0-3.8 टक्क्यांपर्यंत केला आहे.

- देशांतर्गत व बाह्य मागणी कमकुवत असल्या कारणाने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी GDP वृद्धीदराचा अंदाज ऑक्टोबरच्या धोरणातल्या 6.1 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी केला.

- मुख्यत्वेकरून कमी उत्पादनामुळे, भारताची आर्थिक वृद्धी चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत गेल्या सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरलेली असून ती त्याचा दर 4.5 टक्के आहे.

- परकीय चलन साठा 3 डिसेंबरपर्यंत 451.7 अब्ज डॉलर एवढ्या उच्चांकी पातळीवर पोहचलेला होता.

- आर्थिक क्रियाकलाप आणखी कमकुवत झाले आहेत आणि उत्पन्नामधील तफावत नकारात्मक असणार. तथापि, सरकारने आधीच उपाययोजना केलेल्या आहेत.

▪️रेपो दर

- रेपो दर म्हणजे ज्या दराने बँकांना RBIकडून कर्ज दिले जाते. बँका याच पैशातून ग्राहकांना कर्ज पुरवठा करत असतात. रेपो दर कमी झाल्यास बँकांना मिळणारे कर्ज स्वस्त होतात. अर्थातच, गृह कर्ज आणि वाहन कर्जासह इतर कर्जांवरील हप्ते स्वस्त किंवा महाग होऊ शकतात.

▪️रिव्हर्स रेपो दर

- रिव्हर्स रेपो दर म्हणजे विविध बँकांच्या RBIमध्ये जमा असलेल्या पैश्यावर बँकांना मिळणारा व्याज होय. रिव्हर्स रेपो दराच्या माध्यमातून RBI बाजारपेठेतल्या कॅश लिक्विडी म्हणजेच रोखच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवू शकते. बाजारात खूप रोख रक्कम असल्यास RBI रिव्हर्स दरामध्ये वाढ करत असते. जेणेकरून बँका जास्त व्याज मिळविण्यासाठी स्वताःकडील जास्तीत-जास्त रोख रक्कम RBIमध्ये जमा करतील.
--------------------------------------------------
जॉईन करा. @chaluGhadamodi

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔷उप-राष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांच्याद्वारे "भारतीय पोषण गाण" जारी

- भारतास 2022 पर्यंत कुपोषणमुक्त करण्यास "भारतीय पोषण गाणं" सहाय्य करील असा विश्वास उपराष्ट्रपतीनी व्यक्त केला.'भारतीय पोषण गाण' गीतकार - प्रसून जोशी

▪️गायक - शंकर महादेवन

- भारतीय पोषण गाण हे 'राष्ट्रीय पोषण मिशन'/ POSHAN या योजनेंतर्गत लाँच
POSHAN योजना 8 मार्च 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केली.
POSHAN - Prime Ministers Overarching Scheme for Holistic Nutrition

▪️उद्देश - भारतास 2022 पर्यंत कुपोषणमुक्त करणे.केंद्रीय महिला व बालविकास विभागाची योजना.
-------------------------------------------------
जॉइन करा.@chaluGhadamodi

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔷54 व्या पोलिस महासंचालकांच्या परिषदेला पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन


- पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या 54 व्या पोलिस महासंचालकांच्या परिषदेला पंतप्रधानांनी आज मार्गदर्शन केले. गेले दोन दिवस या परिषदेमध्ये विविध विषयांवर विचार मंथन करण्यात आले. आज सायंकाळी परिषदेचा समारोप पंतप्रधानांच्या मार्गदर्शनपर भाषणाने झाला.
-यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रपती पदक सन्मान मिळवलेल्या गुप्तचर संस्थेच्या पोलिस अधिका-यांचा गौरव करण्यात आला.

- परिषदेच्या माध्यमातून येत असलेल्या महत्वपूर्ण आणि मौलिक सूचना तसेच विचारांची होणारी देवाण-घेवाण लक्षात घेवून पूर्वी एक दिवसीय होणारी पोलिस महासंचालकांची ही परिषद आता 2015 पासून दोन-तीन दिवसांची होवू लागली आहे.
- तसेच अलिकडे या परिषदेचे आयोजन दिल्लीच्याबाहेर देशात वेगवेगळ्या भागात होवू लागली आहे. तसेच परिषदेच्या आयोजन प्रक्रियेत अतिशय महत्वपूर्ण बदल करण्यात आले असून पंतप्रधान आणि गृहमंत्री यांची उपस्थिती या परिषदेला असते. देशाला असलेला धोका लक्षात घेवून पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या नेतृत्वाखाली या परिषदेत पोलिस महासंचालकांची समिती नियुक्त करण्यात आली. तसेच या परिषदेत काही धोरणात्मक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

- यावर्षी देशांतर्गत दहशतवाद, नक्षलवादी कारवाया, सागरी सुरक्षा, सायबर धोका अशा महत्वपूर्ण विषयावर वेगवेगळ्या 11 गाभा समूह स्थापन करून विचारमंथन करण्यात आले.

- देशभरामध्ये शांतता नांदण्यासाठी पोलिस कर्मचारी करीत असलेल्या अथक परिश्रमाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पोलिस दलाचे कौतुक केले. पोलिसांच्या या कष्टामागे त्यांचा परिवारही आहे, हे आपण कोणीही विसरता कामा नये, असंही मोदी यावेळी म्हणाले. पोलिस दलाच्या आश्वासक कामगिरीमुळे समाजात पोलिसांविषयी विशेषतः महिला आणि मुलांच्या मनात आदराची भावना असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. महिला आणि मुलींना समाजात वावरताना सुरक्षित वाटतं, त्याचे श्रेय पोलिस खात्याला जाते, असंही मोदी यावेळी म्हणाले.

- सामान्य जनतेला नेमके काय वाटते, त्यांच्या पोलिसांकडून आशा-अपेक्षा काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी आजच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाची एखाद्या शस्त्राप्रमाणे मदत होत आहे.

- सरकारने ‘अॅक्ट ईस्ट’ धोरण तयार केले आहे, यासाठी ईशान्येकडील राज्यांमधील पोलिस महासंचालकांनी विशेष मदत करण्याचे आवाहन या परिषदेत करण्यात आले.

- पोलिस अधिकारी वर्गाला सातत्याने तणावपूर्ण परिस्थितीमध्ये कार्यरत रहावं लागत आहे, यातून मार्ग काढण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे प्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी परीक्षा देताना ते उमेदवार येत असलेल्या तणावाचे व्यवस्थापन करतात, तसेच पोलिस अधिकारी वर्गानेही तणाव कमी करण्याचे प्रयत्न करावेत. राष्ट्रहितासाठी समाजातल्या दुर्बल घटकासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.

--------------------------------------------
जॉईन करा. @chaluGhadamodi

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔷मिस युनिव्हर्स 2019: झोजिबिनी टुंझी (दक्षिण आफ्रिका)

- दक्षिण आफ्रिकेच्या झोजिबिनी टुंझी हिने यंदाचा ‘मिस युनिव्हर्स 2019’ म्हणजेच विश्वसुंदरीचा किताब जिंकला आहे. मिस प्युर्टो रिको हिने द्वितीय क्रमांक तर मिस मेक्सिकोने तृतीय क्रमांक पटकावले.

- अमेरिकेच्या अॅटलांटा शहरात 9 डिसेंबर 2019 रोजी 68 वी ‘मिस युनिव्हर्स’ ही सौंदर्य स्पर्धा झाली. गतवर्षीची मिस युनिव्हर्स कॅटरिना ग्रे हिने मानाचा मुकूट विजेतीला चढविला.

-उपांत्य फेरीत पोहचलेली भारताची वर्तिका सिंग शेवटच्या 20 जणींमध्ये होती. मात्र अंतिम 10 जणींमध्ये तिला स्थान मिळवता आले नाही.

▪️स्पर्धेविषयी

- मिस युनिव्हर्स (विश्वसुंदरी) ही दरवर्षी घेतली जाणारी एक जागतिक सौंदर्य स्पर्धा आहे.

- अमेरिकेच्या न्युयॉर्क शहरात मुख्यालय असलेली मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन ह्या स्पर्धेचे आयोजन करते.

-1952 साली कॅलिफोर्नियामध्ये ही सौंदर्य स्पर्धा सर्वप्रथम भरवली गेली होती.

- विश्वसुंदरी ठरलेल्या भारतीय - सुष्मिता सेन (सन 1994) व लारा दत्ता (सन 2000)
-----------------------------------------------
जॉईन करा. @chaluGhadamodi

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

_______________________________
|| eCAD December 2019 ||

|| इ-कॅड डिसेंबर 2019 ||

- Digital Edition
_______________________________

| True PDF |
| Size: 14.9 MB |

▪️मागील महिन्यांची मासिके डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा: http://empsckatta.blogspot.com/2019/01/ecad-magazine.html?m=1
--------------------------------------------
जॉईन करा @MPSCMaterial

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔹दक्षिण आफ्रिकेच्या झोजिबिनी टुंझी हिने यंदाचा 'विश्वसुंदरी' - मिस युनिव्हर्स २०१९ चा किताब जिंकला

अमेरिकेत मिस युनिव्हर्स स्पर्धा झाली. या स्पर्धेत मिस प्युर्टो रिको हिने द्वितीय स्थान तर मिस मेक्सिकोने तृतीय स्थान पटकावले. या स्पर्धेत भारताचे नेतृत्व वर्तिका सिंह हिने केले होते.

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

चालू घडामोडी 9 डिसेंबर 2019 by @eMPSCkatta

● लोकसत्ता
● सकाळ
● महाराष्ट्र टाईम्स
● तरुण भारत
● लोकमत
---------------------------------------
जॉईन करा @ChaluGhadamodi

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔷गिरीश चंद्र चतुर्वेदी: नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) याचे नवे अध्यक्ष

- गिरीश चंद्र चतुर्वेदी ह्यांची नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) याच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.

- जानेवारीत अशोक चावला यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त होते.

▪️नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE)

मुंबई येथे मुख्यालय असलेली नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) भारतामधले आघाडीचे स्टॉक एक्सचेंज आहे.

- 27 नोव्हेंबर 1992 रोजी NSEची स्थापना झाली.

- हे देशातले पहिले डिमॅट्युअलाइज्ड इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज आहे.

- आधुनिक आणि पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने चालणारी इलेक्ट्रॉनिक व्यापार व्यवस्था उपलब्ध करुन देणारे NSE हे देशातले पहिले एक्सचेंज आहे.
--------------------------------------------------
जॉईन करा. @chaluGhadamodi

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

आजच्या वर्तमानपत्रातील काही महत्वाचे रविवार स्पेशल लेख...

● लोकसत्ता
● महाराष्ट्र टाईम्स
● सकाळ
● तरुण भारत
● लोकमत

नक्की वाचा....
-------------------------------------------
जॉईन करा @eMPSCkatta

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔹मुंबई सेंट्रल बनले “ईट राइट स्टेशन” प्रमाणपत्र मिळविणारे देशातले पहिले रेल्वे स्थानक

मुंबई सेंट्रल रेलवे स्थानक हे FSSAI कडून फोर स्टार रेटिंगसह “ईट राइट स्टेशन” प्रमाणपत्र मिळविणारे देशातले पहिले रेल्वे स्थानक ठरले आहे.

▪️‘ईट राइट इंडिया’ चळवळ

भारतीय खाद्यान्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) यांनी सन 2018 मध्ये ‘ईट राइट इंडिया’ चळवळ राबवविण्यास सुरुवात केली. प्रवाश्यांना निरोगी आणि स्वच्छ अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी ही मोहीम चालवली जात आहे.

या कार्यक्रमात खाद्यान्न सुरक्षा व स्वच्छतेसंबंधी नियमांची अंमलबजावणी, निरोगी आहाराची उपलब्धता, पुरवठा केंद्र, खरखट्याचे व्यवस्थापन, अन्नपदार्थांची हाताळणी, स्थानिक आणि हंगामी खाद्यपदार्थाची जाहिरात आणि जनजागृती अश्या विविध मुद्द्यांना लक्षात घेण्यात आले आहेत.

त्यासंदर्भात विभागीय रेल्वे क्षेत्र यांच्या सहयोगाने FSSAI आणि IRCTC यांच्यातर्फे कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

▪️भारतीय खाद्यान्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) 

FSSAI याची स्थापना 2011 साली केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत झाली. भारतात खाद्यान्न सुरक्षा आणि त्याच्या नियमनाशी संबंधित कायदेशीर चौकट प्रदान करणार्‍या ‘खाद्यान्न सुरक्षा आणि मानके अधिनियम-2006’ याच्या अन्वये FSSAIची स्थापना करण्यात आली. ही एक स्वायत्त संस्था आहे. त्याचे नवी दिल्लीत मुख्यालय आहे.

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔷NEFT चे व्यवहार २४ तास करता येणार

-डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना १६ डिसेंबरपासून (एनईएफटी) सेवा २४*७ तास सुरू करण्याचे निर्देश दिले.

-त्यामुळं आता ग्राहकांना कधीही 'एनईएफटी'च्या सहाय्याने आर्थिक व्यवहार करणे शक्य होणार आहे. यातील पहिली सेटलमेंट १६ डिसेंबरच्या मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून कार्यन्वित होणार आहे. याशिवाय सावर्जनिक सुट्टीच्या दिवशीही 'एनईएफटी' सुरू राहणार आहे.

- सध्या 'एनईएफटी' व्यवहारांसाठीची वेळ सकाळी ८ ते संध्याकाळी ७ अशी आहे. पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी अर्धा दिवस म्हणजेच सकाळी ८ ते दुपारी १ हि वेळ दिलेली आहे. मात्र १६ डिसेंबरपासून आठवड्याचे सातही दिवस २४ तास ही सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.

- तशा प्रकारची अधिसूचना रिझर्व्ह बँकेने काढली आहे. 'एनईएफटी' चे व्यवहार विनाअडथळा पूर्ण व्हावेत यासाठी बँकांनी त्यांच्या चालू खात्यात पुरेशा प्रमाणात रोकड सुलभता ठेवावी, असे निर्देश आरबीआयने बँकांना दिले आहेत. त्याचबरोबर 'एनईएफटी' ची वेळ वाढल्याची माहिती ग्राहकांना कळावी यासाठी बँकांनी ती दर्शनी भागात लावावी असं 'आरबीआय'ने म्हटले आहे.

- जास्तीत जास्त ग्राहकांनी ऑनलाईन फंड ट्रान्सफर करावे यासाठी आरबीआय कडून प्रयत्न केले जात आहेत. जुलैपासून 'आरबीआय'ने नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) आणि रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) या दोन ऑनलाईन व्यवहारांवरील शुल्क रद्द केले आहे.
---------------------------------------------------
जॉईन करा. @chaluGhadamodi

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔷महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


- महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. तोपर्यंत पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.

- तथापि, त्रुटी दूर करुन ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईनरित्या घेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी आज दिले.

- महापरीक्षा पोर्टलच्या अनुषंगाने अनेक निवेदने, तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली.

- यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.

- राज्य शासनाच्या विविध विभागांतील भरतीसाठी महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षापद्धतीबाबतच्या तक्रारी, समस्यांबाबत तक्रारधारकांसोबत आठवडाभरात बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल.

- त्यानंतर या पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील.

- पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन पर्यवेक्षक आणि परिचर पदांसाठीची भरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. त्रुटी दूर करुन ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईनरित्या घेण्यात येईल.

- बैठकीमध्ये माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत कार्यवाही सुरू असलेल्या विविध प्रकल्पांबाबत प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी सादरीकरण केले.

- यामध्ये सर्व ग्रामपंचायती फायबर ऑप्टीक नेटवर्कने जोडण्याचा भारतनेट टप्पा २, आपले सरकार सेवा केंद्रे, नागरी महानेट प्रकल्प, थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी), ब्लॉकचेन तंत्रज्ञान आदी प्रकल्पांविषयी माहिती दिली. महाराष्ट्राची ब्लॉकचेन तंत्रज्ञानासाठी सज्जतेच्या दृष्टीने गतीने कार्यवाही सुरू असून देशात सर्वप्रथम आपले राज्य ब्लॉकचेनसाठी सज्ज असल्याची घोषणा करण्याचा मानस आहे, असेही ते म्हणाले.
----------------------------------------------
जॉईन करा . @chaluGhadamodi

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔷खासगी लघू वित्त बँकांसाठी कधीही परवाना मिळावा त्यासाठी RBIची नवी मार्गदर्शके

- भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ‘खासगी क्षेत्रातल्या लघू वित्त बँकांचा (SFB) परवाना’ याच्यासंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

▪️नवीन मार्गदर्शके पुढीलप्रमाणे आहेत,

- सर्व पात्रता निकष पूर्ण केल्यास पेमेंट्स (देयक) बँकांना पाच वर्षांच्या कार्यकाळानंतर लघू वित्त बँकेमध्ये रूपांतरीत होण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

- किमान पेड-अप व्होटिंग इक्विटी कॅपिटल म्हणजेच आवश्यक असलेले भांडवल 200 कोटी रुपये असावे.

- परवाना मिळविण्यासाठी RBI कडील सुविधा मुक्तपणे उघडली जाणार आहे. मुक्तपणाच्या सुविधेमुळे RBI वर्षभर बँकांचे अर्ज स्वीकारू शकणार आणि परवाना देणार आहे.

- याव्यतिरिक्त, विशिष्ट अटी पूर्ण केल्यास इच्छुकांना कोणत्याही वेळी सार्वत्रिक बँकेसाठी परवाना मिळविण्यासाठी अर्ज करण्याची मुभा आहे.

---------------------------------------------------
जॉईन करा . @ChaluGhadamodi

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

संपादकीय पान 7 डिसेंबर 2019 By @eMPSCkatta

● लोकसत्ता
● सकाळ
● महाराष्ट्र टाईम्स
● तरुण भारत
● लोकमत
---------------------------------------
जॉईन करा @eMPSCkatta

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

eMPSCkatta च्या अपडेट्स इन्स्टाग्रामवर मिळवण्यासाठी खालील लिंक वरून eMPSCkatta ला इन्स्टाग्रामवर फॉल्लो करा : https://www.instagram.com/eMPSCkatta

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔷बायोमेट्रिक माहितीच्या हाताळणीत भारत जगातला पाचव्या क्रमांकाचा सर्वात वाईट देश

- कंपेयरिटेक (ब्रिटन) या संस्थेनी बायोमेट्रिक माहितीची हाताळणी याबाबत आपला एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

- अश्या अभ्यासासाठी, संशोधकांनी बायोमेट्रिक्स माहिती कुठे घेतली जात आहे, ते कशासाठी घेतले जात आहे आणि ते कसे संग्रहित केले जात आहेत, हे शोधण्यासाठी 50 वेगवेगळ्या देशांचे विश्लेषण केले.

- प्रत्येक देशाला 25 पैकी गुण देण्यात आले आहेत, ज्यामध्ये अधिक गुण म्हणजे सर्वात वाईट तर कमी गुण म्हणजे योग्यप्रकारे माहितीचा नियंत्रित वापर असा अर्थ होतो.

▪️ठळक बाबी

- बायोमेट्रिक माहितीचा व्यापकपणे आणि अनियंत्रित वापर करण्याच्या संदर्भात भारत जगातला पाचव्या क्रमांकाचा सर्वात वाईट देश आहे. यादीत, भारत तैवान, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स यांच्यासह पाचव्या क्रमांकावर आहे.

- तर या बाबतीत चीन जगातला सर्वात वाईट देश ठरत आहे. त्याच्या पाठोपाठ मलेशिया, पाकिस्तान आणि अमेरिका या देशांचा क्रम लागतो.

- चीनने 25 पैकी 24 गुण मिळाले आहेत, तर भारताला 19 गुण मिळालेत.

- या बाबतीत सर्वात वाईट देशांच्या यादीमध्ये भारत तुलनेने खाली आहे कारण तो कायद्याच्या अंमलबजावणीला राष्ट्रीय बायोमेट्रिक (आधार) डेटाबेसमध्ये प्रवेश मिळविण्यास परवानगी देत ​​नाही.

- योग्य निर्बंधांमुळे युरोपीय संघातले देश यादीत तळाशी आहेत, ज्यात आयर्लंड, पोर्तुगाल, सायप्रस, ब्रिटन आणि रोमेनिया हे पाच सर्वोत्तम देश म्हणून उदयास आले आहेत.
------------------------------------------------
जॉईन करा . @chaluGhadamodi

Читать полностью…
Subscribe to a channel