आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi
🌿अ) तत्सम शब्द -
जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना 'तत्सम शब्द' असे म्हणतात.
उदाहरणार्थ
कवि, मधु, गुरु, पिता, पुत्र, कन्या, वृक्ष, पुरुष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, पुष्प, जल, प्रीती, कर, ग्रंथ, पृथ्वी, भूगोल, विद्यवान, भगवान, परंतु, यद्यपि, यथामती, कर्ण, पर्ण, अरण्य, हस्त, मस्तक, कर्म, अग्नी, नदी, कमल इत्यादी
🌿🌿शब्दसिद्धी 🌿🌿
शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच 'शब्दसिद्धी' असे म्हणतात.
शब्दांचे दोन प्रकार आहेत.
१) सिद्ध शब्द
२) साधित शब्द
🌷🌷५) अव्ययांचे व्याकरण चालवणे :-🌷🌷
🌿अव्यय :- मूळ शब्द, प्रकार, पोटप्रकार, असल्यास काही विशेष माहिती.
उदा.
१) मी व माझा भाऊ रोज देवाला नमस्कार करतो.
🌿व :- मूळ शब्द - व,
🌿प्रकार - उभयान्वयी अव्यय,
🌿पोटप्रकार - समुच्चयबोधक,
🌿'मी' , 'भाऊ' या दोन शब्दांना जोडणारे.
🌷🌷३) विशेषणाचे व्याकरण चालवणे :-🌷🌷
🌿विशेषण :- मूळ शब्द, प्रकार, पोटप्रकार, कोणत्या विशेष्याबद्दल (नामाबद्दल) माहिती देते ते विशेष्य.
उदा.
१) बागेत चार माळी काम करत होते.
🌿चार :- मूळ शब्द - चार,
🌿प्रकार - विशेषण,
🌿पोटप्रकार - संख्याविशेषण.
🌿माळी या विशेष्याबद्दल (नामाबद्दल) विशेष माहिती देते
🌿१) नामाचे व्याकरण चालवणे :-🌿
🌷नाम :- मूळ शब्द, प्रकार, पोटप्रकार, लिंग, वचन, विभक्ती, विभक्तीचा अर्थ, वाक्यातील स्थान.
उदा.
१) त्यांनी घराला रंग दिला.
🌿घराला :- मूळ शब्द - घर,
🌷प्रकार - नाम,
🌿 - सामान्यनाम,
🌿लिंग - नपुंसकलिंग,
🌿वचन - एकवचन,
🌿विभक्ती - चतुर्थी,
🌿विभक्तीचा अर्थ - संप्रदान,
🌿वाक्यातील स्थान - दिला या क्रियापदाचे अप्रत्यक्ष कर्म.
🌿2) साधीत शब्द🌿
· सिद्ध शब्दाला म्हणजेच धातूच्या पूर्वी उपसर्ग किंवा नंतर प्रत्यय लागून 'साधित शब्द' तयार होतो.
· साधित शब्दांचे पुढील 4 प्रकार पडतात
अ)उपसर्गघटित
ब) प्रत्ययघटित
क) अभ्यस्त
ड) सामासिक
🌿5) अरबी शब्द
· अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, शहर, नजर, खर्च, मनोरा, वाद, मदत, बदल.
🌿6) कानडी शब्द
· हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, अडकित्ता, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, तूप, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ, तांब्या, उडीद, पाट, गाल, काका, टाळू, गादी, खिडकी, गच्ची, बांबू, ताई, गुंडी, कांबळे.
🌿7) गुजराती शब्द
· सदरा, दलाल, ढोकळा, घी, डबा, दादर, रिकामटेकडा, इजा, शेट.
🌿8) हिन्दी शब्द
· बच्चा, बात, भाई, दिल, दाम, करोड, बेटा, मिलाप, तपास, और, नानी, मंजूर, इमली.
🌿9) तेलगू शब्द
· ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी.
🌿10) तामिळ शब्द
· चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा.
🌷देशी/देशीज शब्द :🌷
· महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्या शब्दांना 'देशी शब्द' असे म्हणतात.
· उदा.
· झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजारी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर, पीठ, डोळा, मुलगा, लाजरा, वेढा, गार, लाकूड, ओटी, वेडा, अबोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, आजार, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, डोंगर.
🌷🌷शब्दसिद्धी व त्याचे प्रकार🌷🌷
· शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच 'शब्दसिद्धी' असे म्हणतात.
· 🌿 शब्दांचे खालील प्रकार पडतात.
🍀तत्सम शब्द :
· जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बादल न होता आले आहेत त्यांना 'तत्सम शब्द' असे म्हणतात.
· उदा.
· राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, अधापि, मति, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, उमेश, स्वामि, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प, घृणा, पिंड, कलश, प्रात:क, दंड, पत्र, ग्रंथ, उत्तम, आकाश पाप, मंत्र, शिखर, सूत्र, कार्य, होम, गणेश, सभ्य, कन्या, देवर्षि, वृद्ध, संसार, प्रीत्यर्थ, कविता, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद, अब्ज, राजा, संमती, घंटा, पुण्य, बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा, प्रकाश, सत्कार, देवालय, तारा, समर्थन, नयन, उत्सव, दुष्परिणाम, नैवेध.
अपसरणचिन्ह (_) :-
बोलताना विचारमाला तुटल्यास व स्पष्टीकरण द्यायचे असल्यास या चिन्हाचा वापर करतात.
उदा.
मी त्याला सांगितले होते पण_
🌿अपसरण चिन्ह🌿
अवतरणचिन्ह ("-") :-
बोलणाऱ्याचे उद्गार जसेच्या तसे देताना या चिन्हाचा वापर करतात. एखाद्या वाक्यावर जोर द्यावयाचा असल्यास किंवा दुसऱ्याचे विचार अप्रत्यक्षपणे सांगायचे असल्यास ‘ ’ एकेरी अवतरण चिन्ह वापरतात.
एखाद्याच्या व्यक्तीचे तोंडचे शब्द जसेच्या तसे घेतले असता " " दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर होतो.
उदा.
१. तो म्हणाला, “मी शाळेत येईन”.
२. अहमदनगर हे ‘ऐतिहासिक’ शहर आहे.
🌿अवतरणचिन्ह🌿
🌷🌷प्रश्नचिन्ह (?) :- 🌷🌷
याचा वापर प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी करण्यात येतो. वाक्यात प्रश्न आला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येते. प्रश्न विचारताना या चिन्हाचा वापर करतात.
उदा.
१. तुम्ही जेवलात का ?
२. रमाची परीक्षा कधी आहे?
३. सुरेशचे लग्न कधी होणार?
🌿प्रशचिन्ह🌿
🌷🌷स्वल्पविराम (,) :- 🌷🌷
एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास प्रत्येक शब्दाच्या पुढे या चिन्हाचा वापर करतात.
वाक्यातील शब्द, विभाग किंवा वाक्याचा अंश यांचा वेगळेपणा दाखविण्यासाठी, मोठे वाक्यांश वेगळे दर्शविण्यासाठी, समान वाक्ये निराळी दाखविण्याकरता. वाक्यात आरंभी संबोधन आल्यास संबोधनवाचक शब्दापुढे स्वल्पविराम या चिन्हाचा वापर केला जातो. एकाच वाक्यात दोन पेक्षा अधिक शब्द आले असता.
उदा.
१. जेवायला डाळ, भात, भाजी केली आहे.
२. आम्ही संग्रहालयातील प्राणी, पक्षी, चित्रे, नाणी, ताम्रपट, लिपिप्रकार पहिले.
🌿स्वल्पविराम🌿
🌿🌿१) सिद्ध शब्द :-
शब्द जसा आहे तसाच त्याचा भाषेत उपयोग केला म्हणजे त्या शब्दाला सिद्ध शब्द म्हणतात.
सिद्ध, साधित, उपसर्ग, प्रत्यय जा, ये, कर, बस, बोल, पी यासारखे मूळ धातू किंवा शब्द भाषेत असतात त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात.
उदा.
ये, जा, पी, उठ, कर, गा इ.
सिद्ध शब्दांचे चार प्रकार पडतात पुढीलप्रमाणे :-
🌷४) क्रियापदाचे व्याकरण चालवणे :-🌷
🌿क्रियापद :- मूळ धातू, क्रियापदाचा प्रकार, रूप, अर्थ, काळ, लिंग, वचन, पुरुष, वाक्याचा प्रयोग.
उदा.
१) संतोष अभ्यास करत होता.
🌿करत होता :- मूळ धातू - कर,
🌿क्रियापदाचा प्रकार - संयुक्त क्रियापद,
🌿रूप - करुणरूप,
🌿अर्थ - स्वार्थ,
🌿काळ - अपूर्ण भूतकाळ,
🌿लिंग - पुल्लिंग,
🌿वचन - एकवचन,
🌿पुरुष - तृतीय पुरुष,
🌿प्रयोग - कर्तरी.
🌷) सर्वनामाचे व्याकरण चालवणे :-
🌿सर्वनाम :- मूळ शब्द, प्रकार, पोटप्रकार, लिंग, वचन, विभक्ती, विभक्तीचा अर्थ, वाक्यातील स्थान.
उदा.
१) मी स्वत: एक कविता केली आहे.
🌿स्वत: :- मूळ शब्द - स्वत:,
🌿प्रकार - सर्वनाम,
🌿पोटप्रकार - आत्मवाचक सर्वनाम,
🌿लिंग - उभयलिंगी,
🌿वचन - एकवच,
🌿विभक्ती - प्रथमा,
🌿विभक्तीचा अर्थ - कर्ता,
🌿वाक्यातील स्थान - कर्ता.
🌷🌷पदपरिस्फोट / व्याकरण चालवणे🌷🌷
🌿'शब्दांचे व्याकरण चालविणे’ म्हणजे वाक्यातील प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगणे होय.
🌿आपण आतापर्यंत शब्दांचे आठ प्रकार, प्रत्येकाचे पोट प्रकार, नाम,किंवा सर्वनाम त्यांना होणा-या लिंग, वचन, विभक्ती या विकारांची, क्रियापदांचे काळ, अर्थ, प्रयोग, यांची संपूर्ण माहिती मिळविली.
🌿या माहितीच्या ‘शब्दाचे व्याकरण चालविणे’ यासाठी उपयोग होतो. यालाच 'पदपरिस्फोट' असेही कोणी म्हणतात.
🌿 सिद्ध व सधीत शब्द :🌿
1) सिद्ध शब्द
· भाषेत जे शब्द मुळात धातू असतात त्यांना 'सिद्ध शब्द' असे म्हणतात.
· उदा. ये, जा, खा, पी, बस, उठ, कर, गा इत्यादी.
· सिद्ध शब्दांचे 3 प्रकार पडतात.
अ). तत्सम
ब). तदभव
क). देशी (यांचा अभ्यास आपण यापूर्वी केला आहे.)
🌷🌷परभाषीय शब्द :🌷🌷
संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना 'परभाषीय शब्द' असे म्हणतात.
🌿1) तुर्की शब्द
· कालगी, बंदूक, कजाग
🌿2) इंग्रजी शब्द
· टी.व्ही., डॉक्टर, कोर्ट, पेन, पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल, स्टॉप, ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, पॅंट, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, नंबर, टीचर, सर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, बटन ड्रेस, ग्लास, इत्यादी.
🌿3) पोर्तुगीज शब्द
· बटाटा, तंभाखू, पगार, बिजागरी, कोबी, हापूस, फणस, घमेले, पायरी, लोणचे, मेज, चावी, तुरुंग, तिजोरी, काडतुस.
🌿4) फारशी शब्द
· रवाना, समान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागार, कामगार, गुन्हेगार, फडवणीस, बाम, लेजीम, शाई, गरीब, खानेसुमारी, हजार, शाहीर, मोहोर, सरकार, महिना हप्ता.
🌷तदभव शब्द :🌷
· जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येतांना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना 'तदभव शब्द' असे म्हणतात.
· उदा.
· घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओळ, काम, घाम, घडा, फुल, आसू, धुर, जुना, चाक, आग, धूळ, दिवा, पान, वीज, चामडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड, अडाणी, उधोग, शेत, पाणी, पेटी, विनंती, ओंजळ, आंधळा, काय, धुर, पंख, ताक, कान, गाय.
🌷🌷विकल्प चिन्ह (/) :- 🌷🌷
एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखविण्यासाठी या चिन्हाचा वापर करतात.
उदा.
मी बस/रिक्षाने घरी जाईन.
🌿विकल्प चिन्ह🌿
संयोगचिन्ह (-) :-
दोन शब्द जोडताना व ओळ संपल्यावर शब्द अपुरे राहिल्यास या चिन्हाचा वापर करतात.
उदा.
१. प्रेम-विवाह
२. रिक्षा-टॅक्सी
🌿 संयोगचिन्ह 🌿
🌷🌷उद्गारवाचक (!) :- 🌷🌷
मनातील उत्कट भावना व्यक्त करताना शब्दाच्या शेवटी या चिन्हाचा वापर करतात. उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापर होतो.
उदा.
१. शाब्बास, असाच अभ्यास कर!
२. छान, हीच खरी देशसेवा आहे!
३. अरे वा ! किती सुंदर दिसतेस तू.
🌿उद्गाररवाचक🌿
🌷🌷अपूर्णविराम (:) :- 🌷🌷
वाक्यातील गोष्टी वाक्यानंतर सांगायच्या असतील तेव्हा या चिन्हाचा वापर होतो. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास.
उदा.
हा पदार्थ करण्याच्या तीन पद्धती आहेत : उकडून, तळून, भाजून.
🌿अर्धंविराम🌿
🌷🌷अर्धविराम (;) :- 🌷🌷
दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडताना या चिन्हाचा वापर करतात.
ज्यांचा परस्पर संबंध नाही असे वाक्यांश जेव्हा मोठ्या वाक्यात येतात तेव्हा त्या निरनिराळ्या वाक्यांशामध्ये अर्धविराम वापरतात. संयुक्त वाक्यातील समान वाक्ये वेगवेगळी दाखविण्यासाठी.
उदा.
मी तिला कॅाल केला ; पण तिने उचला नाही.
🌿अर्ध विराम🌿